Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » त्याच्या मदतीने तिने मनात रुतलेला काटा उपसून टाकला…
    ललित

    त्याच्या मदतीने तिने मनात रुतलेला काटा उपसून टाकला…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 16, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, व्हर्जिन, प्राध्यापकाची अमानुषता, तिचा प्रामाणिकपणा, त्याचा समजूतदारपणा, तिच्या मनातील सल, तिच्यावरील अत्याचार, त्याची तिला साथ, त्याचा आश्वासकपणा, तिचे त्याचे प्रेम, प्रेमकथा, अनोखी प्रेमकथा, जोडीदाराची साथ, जोडीदाराचा समजूतदारपणा,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पराग गोडबोले

    तो सत्तावीस वर्षांचा झाला आणि घरचे मागे लागले लग्नासाठी. खरोखर काहीच हरकत नव्हती बोहल्यावर चढायला आता. घरच्यांच्या मते, बंधनात अडकण्याचं हेच योग्य वय होतं. उगाचच उशीर करण्यात काहीच  हशील नव्हतं. त्यानं कुठं काही जमवलंय का? याची आडून आडून चाचपणी सुरू होती, पण तसं काही नाही, यावर तो ठाम होता. त्याच्या मते अजून दोन वर्ष थांबायला हवं होतं, पण शेवटी आई आणि आजी, दोघी खनपटीला बसल्यावर त्याचा नाईलाज झाला आणि तो नाव नोंदवायला तयार झाला.

    सगळे सोपस्कार करून, पैसे भरून एका नामांकित संस्थेत नाव नोंदवल्यावर पटापट स्थळं यायला लागली. त्याचं शिक्षण, पगार, कुटुंबाची पार्श्वभूमी बघता, यात काही विशेष नव्हतंच म्हणा. लाखात एक म्हणावा, असाच होता तो. पत्रिका जुळली पाहिजे आणि त्यानंतरच पुढचं पाऊल, यावर सगळ्यांचं एकमत होतं. तेवढं याला ते पटत नव्हतं, पण पर्याय नव्हता… स्वतःच जमवलं असतंस, तर ही वेळ आलीच नसती, अशी त्यावर आईची मल्लिनाथी होती. तुकवली मान त्याने.

    चार पत्रिका जुळल्या, फोटो आवडले आणि एक पाऊल पुढे पडलं. चारही मुली तोडीस तोड होत्या, डावं उजवं करणं खूप कठीण होतं, पण निवड एकीचीच करायची होती शेवटी! मुलगी बघणं वगैरे हल्ली काळाच्या ओघात पार विस्मृतीत गेलेली संकल्पना. त्याच्या आईबाबांचं लग्न असंच स्थळ बघून, चहा-पोहे खाऊन, जमलेलं. त्याच्या आईच्या मते ती मौजच निराळी होती. काळ बदलला तशा प्रथाही बदलल्या… कालाय तस्मै नमः।

    हेही वाचा – माझ्यातल्या ‘मी’ची कथा

    नवल म्हणजे, त्याला भावलेल्या चारही मुलींना तो आवडला होता. त्याही भेटीसाठी तयार होत्या. भेटणं कुठे आणि कधी हे ठरवलं गेलं… आणि यथावकाश चारही मुलींशी भेटी झाल्या. एकमेकांना जोखलं आणि परखलं गेलं. छंद, आवडीनिवडी, शिक्षण, नोकरी, यावर चर्चा झाल्या… तीन ठिकाणी नाही जुळली मतं आणि मनं, पण एका ठिकाणी मात्र ‘दिलकी घंटी बज गयी‘ असं जाणवलं त्याला! तरंगत घरी आला आणि आईला म्हणाला, ‘ही मुलगी आपल्याला साजेशी आहे, असं पहिल्या भेटीत तरी वाटतंय.’ तिचं शिक्षण, तिची नोकरी, तिचं दिसणं, तिचं हसणं, मनमोकळा स्वभाव, सगळंच आवडून गेलं त्याला… बघू काय आणि कसं होतंय ते. मी तर नांगर टाकलाय इथे!

    दोघांच्या गप्पा सुरू झाल्या व्हॉट्सॲपवर… भेटीगाठी सुरू झाल्या आणि वसंत फुलायला लागला जणू. स्वभाव कळायला लागले, भाव उलगडायला लागले आणि त्याच्यासोबत घरचेही सुखावले. आता पुढचं पाऊल उचलायला काहीच हरकत नव्हती. तो तिला एकदा घरी घेऊन आला आणि होणाऱ्या सुनेला बघून आईबाबा आणि नातसुनेला बघून आजीआजोबा हरखून गेले. आवडली ती सगळ्यांनाच!

    आधुनिक, जीन्स टॉप घातलेली, उत्तम प्रतीचा सुगंध ल्यालेली, हलकासा मेकअप केलेली, आत्मविश्वासाने ओतप्रोत ती. अवघडली थोडीशी सुरवातीला, पण नंतर मनमोकळी बोलली. स्वतःबद्दल, आईबाबांबद्दल, नोकरीबद्दल आणि तिच्या अपेक्षांबद्दल सुद्धा… आजीची पाचवारी, आईचा पंजाबी ड्रेस आणि तिची जीन्स. प्रत्येक पिढीचं स्थित्यंतर एकत्र बसलं होतं, एकमेकांशी बोलत.

    तो सुद्धा तिच्या घरी जाऊन आला. होणारा जावई आवडला सगळ्यांनाच. आपली लेक सुस्थळी जाणार याची खात्रीच पटली सगळ्यांना. दोघांची कुटुंबं भेटली, रमली एकमेकांत. जुळत चालले होते ऋणानुबंध नात्यांचे, हळूवार. गाठी बांधल्या जात होत्या, न सुटण्यासाठी. साखरपुडा कधी करायचा, कुठे करायचा यावर चर्चा सुरू झाली आणि या सगळ्यालाच मूर्त रूप येऊ लागलं…

    एकदा अशीच भेटली दोघं, थोडासा एकांत होता आणि त्याने पुसटसं चुंबन घेतलं तिचं… मोहरली त्या नाजूक स्पर्शाने, पण थोडी लांब सरकली ती आणि म्हणाली, “थांब. मला तुला काहीतरी सांगायचंय.”

    त्याच्या चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह, भलं थोरलं. सोबत चिंता, सतावणारी…

    पिशवीतून पाण्याची बाटली काढून तिनं एक घोट घेतला, जुळवाजुळव केली शब्दांची आणि मान खाली घालून म्हणाली, ‘Sorry to tell you, but I am not virgin.‘ पाणी तरळलं तिच्या डोळ्यांत…

    “बारावीत असताना, कॉलेजच्या एका सरांनी…” अश्रूंचा बांध फुटला आणि ठसठस बाहेर पडली सगळी, साचून राहिलेली… “कधीच बोलले नाही रे कोणाशी, अगदी आईशी सुद्धा नाही. सहन करत राहिले सगळ्या यातना, इतकी वर्षं… काय भोगलंय मी, माझं मलाच ठाऊक. मुखवटे घालून वावरत राहिले, प्रत्येक क्षणी वेदना दडवत, मनाच्या तळाशी. किती रात्री मी जागून काढल्यात, माझं मलाच ठाऊक. शिसारी बसलीय मनात, पुरुषांची. नसतं सांगितलं तुला, तर आयुष्यभर मन खात राहिलं असतं माझं. कसं सांगावं कळत नव्हतं, पण न सांगणंही पटत नव्हतं, म्हणून धीर एकवटून आज सांगितलं. आता काय निर्णय घ्यायचा, हे सर्वस्वी तुझ्या हातात. नाही म्हणालास, तरी ते स्वीकारण्याची तयारी केलीय मी. इतकं सगळं भोगलंय, त्यात आणखी एक भोग…”

    हेही वाचा – ऋचा… आयुष्याच्या नव्या डावाची सिद्धता!

    तो सुन्न. नभ फाटून वीज पडावी, तसा कल्लोळ त्याच्या मनात! हे काहीतरी अचानक, ध्यानीमनी नसताना… मस्त विहरत चाललेला पतंग, मांजा तुटून हेलकावत जावा तसं काहीतरी… काय प्रतिक्रिया द्यावी, कळेच ना त्याला!!

    “आत्ता लगेच निर्णय नाही दिलास तरी चालेल. वेळ घे विचार करायला हवा तेवढा, पण मी अडकलेय आता तुझ्यात, ही मात्र काळ्या दगडावरची रेघ आहे.”

    क्षण दोन क्षण, असेच गेले शांततेत आणि तिच्या गालाला हलकेच स्पर्श करत तो म्हणाला, “जे घडलं त्यात तुझा दोष काहीच नाही. तुझा दोष एकच, तो म्हणजे त्या नराधमाला तू मोकळं सोडलंस आणि कुढत राहिलीस आतल्या आत. किती खोल परिणाम झाला असेल तुझ्या मनावर, कल्पना आहे तुला?”

    हलकेच तिचा हात हातात घेतला त्यानं आणि म्हणाला, “आता लग्न करेन तर तुझ्याशीच. तुझा प्रामाणिकपणा खूप आवडला मला… माझं फक्त एक ऐकायचं. माझा एक जवळचा मित्र चांगला मानसोपचार तज्ज्ञ आहे. मनातलं सारं त्याच्यापाशी व्यक्त करायचं आणि त्याच्याकडून योग्य ते उपचार घेऊन, ही तगमग शांत करायची. आहे मान्य? हे फक्त तुझ्या माझ्यातच राहील, अगदी काहीही झालं तरी. हा शब्द आहे माझा, तुला दिलेला. आणखी एक लक्षात ठेव, मी कुठलेही उपकार करत नाहीये तुझ्यावर. मनावर कुठलंही ओझं बाळगू नकोस तू.”

    तिचा विश्वासच बसेना! पुरुष असाही असू शकतो? एवढा समजूतदार, एवढा विश्वासू, एवढा नितळ?

    पार दूर झाली तिच्या मनातली जळमटं. एक नवा अध्याय सुरू होऊ पहात होता तिच्या आयुष्यात, एका सुंदर, सुशील जोडीदारासोबत.

    योग्य ते उपचार घेऊन, मनात रुतलेला काटा उपसून काढल्यावर, बोहोल्यावर चढताना, पालवी फुटलेली, एक नवी ती, आणि आश्वासक असा तो, यांची जोडी अगदी साजरी दिसत होती…


    मोबाइल – 9323277620

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026 ललित

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026 ललित

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    By प्रणाली मंगेश महाशब्देApril 10, 2026

    “ए आई कसला मस्त वास येतोय गं भाजीचा!” कालच माहेरी आलेली मीना स्वयंपाकघरात आली. “ए…

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    ऑफिस मीटिंगमध्ये स्वत:लाच चिमटा काढला…

    April 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    April 9, 2026

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 263
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 379
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 17
    • ललित 546
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026
    Most Popular

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.