Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » या सुखांनो या… गदिमांची अलौकिक प्रतिभा!
    अवांतर

    या सुखांनो या… गदिमांची अलौकिक प्रतिभा!

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 12, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, या सुखांनो या, गदिमा गीत, ग दि माडगुळकर गीत, आयुष्याचा जोडीदार, समंजस जोडीदार, विरह मिलन, कृतकृत्य मातृत्व, संसाराच्या आठवणी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मानसी देशपांडे

    गदिमा अर्थात ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून साकारलेले अप्रतिम गीत म्हणजे ‘या सुखांनो या…’! गीतकाराचं, कवीचं वैशिष्ट्यच हे असतं की, अशा पद्धतीने लिखाण करणं, जे वाचताना, ऐकताना समोरच्या व्यक्तीला फक्त आणि फक्त सुखाची अनुभूती प्राप्त व्हावी… नेमकं हेच गदिमांनी या गीतातून मांडलं आहे. लेखाची सुरुवात करण्यापूर्वी मला प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांचा हा विचार मनात येतो, “आनंदाच्या ओंजळी कधीच रिकाम्या होत नाहीत, कारण, परत परत भरण्याचे वरदान त्यांना मिळालेले असते…” आपल्या आयुष्यात दु:ख कितीही असले तरी सुखाला निमंत्रण हे प्रत्येकजण देतच असतं. म्हणून गदिमांनी ओळ लिहिली आहे,

    या सुखांनो या…

    सुख हे वाटलं की, जास्त आनंद मनाला मिळतो. हे सुख कधी आपण आईसोबत, वडिलांसोबत वाटतो; पण जोडीदाराच्या सोबत जेव्हा भावी आयुष्य काढायचे असते, तेव्हा ते एकत्रितपणे अनुभवण्याचा आनंद काही निराळाच… कारण, जी व्यक्ती विरह अनुभवते, तिला जेव्हा समंजस जोडीदार मिळतो, तेव्हा तो अंधारात केलेला प्रवास, तिथल्या कटू आठवणी यांचा क्षणार्धात विसर पडतो. म्हणून इथे ओळ अशी आहे,

    एकटी पथ चालले, दोघांस आता हात द्या, साथ द्या…

    हेही वाचा – बाळा होऊ कशी उतराई…

    म्हणून जोडीदाराचं महत्त्व पटवताना मी अजून एक विचार व.पुं.चा इथे मांडते, “अंधारातील प्रवासासाठी आपण कायम कोणाचा ना कोणाचा हात शोधत असतो, तसंच आपलाही हात कोणाला तरी हवा असतो…” खरं आहे हो… विरहाची चव घेतल्यानंतर जेव्हा आयुष्यात सुखाची चाहूल लागते, तेव्हा ते नाते विरहातून मिलनाकडे जाताना आता एकांत संपला आहे, तेव्हा सुखांनो माझ्या आयुष्यात येऊन मला साथ द्या, असं नायिका सांगत आहे.

    एखाद्या स्त्रीला काय हवे असते? तर जोडीदाराचे भरभरून मिळणारे प्रेम आणि साथ… या प्रेमातून जे नवीन रोप जन्माला येते, तेव्हा आयुष्य खऱ्या अर्थाने कृतार्थ झाल्यासारखे वाटते. कारण, पुढची वाट कितीही काट्यांनी भरलेली असली तरी, हात न सोडणारा साथीदार आणि चिमुकली पावलं ती वाट चालायला बळ देतात. हे व.पुं.नी विचारांतून तर, गदिमांनी नायिकेच्या मनातली ती भावना व्यक्त केली आहे. व. पु. म्हणतात, “आयुष्यात समंजस जोडीदार आणि गुणी संतती लाभली की, धकाधकीची वाट पण सरळ वाटते. निखारे सौम्य होतात. काट्यांची टोकं बोथट होतात आणि सारं सोपं होऊन जातं…” सहजीवन देखील सुखाने भरून जावे आणि जाई-जुईच्या फुलांप्रमाणे त्यात सुगंध दरवळून चिमुकल्या पावलांनी अंगण देखील नांदते व्हावे, ही इच्छा गदिमांनी काव्याच्या रूपात फार सुंदर रीतीने मांडली आहे,

    जोडप्याचे गुज जुईचे, चिमुकल्यांचे रांगणे…

    हेही वाचा – वेगवान मुंबईचा लागतो लळा!

    वैवाहिक सुखाची अभिलाषा ही प्रत्येक स्त्रीला असतेच. संसार म्हटला की, अनेक कटू-गोड आठवणी या आल्याच. परंतु, दोन मनांचं एक होणं म्हणजे देखील सुखच, नाही का!! गदिमा जेव्हा थकले, त्यावेळी सुचलेलं हे सकारात्मक गीत. लेखणी शेवटपर्यंत थांबली नाही… सुमधुर गीतांचा मधुघट हा तमाम श्रोत्यांना सुपूर्द करून केवळ सुखाला आमंत्रण करणारे गदिमा, संगीत दिलेले बाबुजी अर्थात सुधीर फडके आणि स्वरसाज ज्यांनी चढवला त्या आशा भोसले म्हणजे खरंच अलौकिक प्रतिभा!!!


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com/ या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    ब्रँडी… उरल्या फक्त आठवणी!

    April 6, 2026 अवांतर

    स्वयंपाक म्हणजे उत्तम कला आणि निखळ आनंद!

    March 31, 2026 अवांतर

    World Idli Day… इडलीकुमारीची कहाणी!

    March 30, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    ब्रँडी… उरल्या फक्त आठवणी!

    By हर्षा गुप्तेApril 6, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… 3 जानेवारी 2011ला आमच्या सोसायटीमध्ये बेबी…

    स्वयंपाक म्हणजे उत्तम कला आणि निखळ आनंद!

    March 31, 2026

    World Idli Day… इडलीकुमारीची कहाणी!

    March 30, 2026

    वो भी क्या दिन थे…

    March 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 एप्रिल 2026

    April 10, 2026

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    April 9, 2026

    समाजात मिसळलो तरच… रवीला मिळाला धडा!

    April 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 263
    • अवांतर 180
    • आरोग्य 99
    • थर्ड अंपायर 2
    • पंचांग आणि भविष्य 379
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 192
    • मैत्रीण 17
    • ललित 546
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेक... आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    - मनोज शरद जोशी
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    मायक्रोवेव्ह येई घरा…!!

    April 10, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026
    Most Popular

    गंधीत आयुष्य… सुगंधीत आयुष्य

    April 10, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.