Monday, March 2, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 08 फेब्रुवारी 2026

Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 08 फेब्रुवारी 2026

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 08 फेब्रुवारी 2026; वार : रविवार
  • भारतीय सौर : 19 माघ शके 1947; तिथि : सप्तमी 29:01; नक्षत्र : स्वाती 29:02
  • योग : गंड 24:07; करण : विष्टी 15:53
  • सूर्य : मकर; चंद्र : तुळ; सूर्योदय : 07:11; सूर्यास्त : 18:34
  • पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

भानुसप्तमी

वेद कन्सल्टन्सी / 9987433660

हेही वाचा – गण गण गणात बोते… मंत्र समजून आचरणात आणण्याची गरज


दिनविशेष

प्रतिभावंत गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर

टीम अवांतर

हिंदुस्थानी संगीतपरंपरेतील एक थोर, प्रतिभावंत गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म 7 सप्टेंबर 1849 रोजी मिरजजवळील बेगड गावी जन्म झाला. त्यांचे घराणे भिक्षुकांचे होते. वयाच्या पाचव्या वर्षी आईचे निधन झाल्यावर बाळकृष्ण यांना इचलकरंजी येथील त्यांचे चुलते विष्णुभट यांच्याकडे भिक्षुकी शिकण्यासाठी पाठविण्यात आले. पण त्यांना भिक्षुकीची गोडी नसल्यामुळे गायन शिकण्यासाठी तो वयाच्या दहाव्या वर्षी घर सोडून बाहेर पडले. फिरत फिरत तो धार येथे देवजीबुवांकडे गाणे शिकण्यास राहिले. तीन वर्षे त्यांच्याकडे शिक्षण घेतल्यानंतर गुरुपत्नीच्या त्रासामुळे बाळकृष्ण गाणे शिकण्यासाठी ग्वाल्हेरले गेले. तेथील हस्सूखाँचे शिष्य वासुदेवराव जोशी यांच्याकडे गायन शिकण्यास त्यांनी सुरुवात केली. पुढे सहा वर्षे त्यांना चांगले शिक्षण दिले.

कालांतराने बाळकृष्णबुवा महाराष्ट्रात आले. काही दिवस मुंबईस राहून ते सातारा-औंधकडे वळले. त्यांना दम्याचा विकार जडला. मिरज संस्थानचे अधिपति बाळासाहेब पटवर्धन यांनी औषध देऊन त्यांचा दमा पूर्णपणे बरा केला आणि दरबार-गवई म्हणून त्यांना मिरजेस नोकरीही दिली. तद्नंतर दहा – बारा वर्षांनी ते श्रीमंत बाबासाहेब घोपरडे, इचलकरंजीकर यांच्याकडे जवळजवळ 30 वर्षे दरबार-गवई म्हणून राहिले. पंडित बाळकृष्णबुवा यांची गायकी साधी, निर्मळ, भारदस्त तसेच सौंदर्यपूर्ण होती. खास ग्वाल्हेर गायकीचा प्रचार महाराष्ट्रात बाळकृष्णबुवांनीच केला.

हेही वाचा – योगाभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

मिरज आणि इचलकरंजी येथे त्यांच्याकडे पुष्कळ लोक शिकू लागले. बाळकृष्णबुवांच्या आधीही महाराष्ट्रात ख्याल गायकी रूढ होतीच, पण तिच्या विस्तृत प्रसाराचे श्रेय बाळकृष्णबुवांनाच दिले जाते. त्यांच्या दोन शिष्य-शाखा सर्वश्रुत आहेत. पहिल्या शाखेत पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर आणि त्यांच्या गांधर्व महाविद्यालयातून शिकून तयार झालेले विनायकबुवा पटवर्धन, नारायणराव आणि शंकरराव व्यास, ओंकारनाथ ठाकूर, वामनराव पाध्ये, प्रा. बा. र. देवधर इत्यादी नामवंत गायकांचा समावेश होतो तर, दुसऱ्या शाखेत मिराशीबुवा, अनंत मनोहर जोशी, त्यांचे चिरंजीव गजाननराव, तसेच शिष्य बापूराव गोखले आणि त्यांचे शिष्य राजारामबुवा पराडकर इत्यादी प्रसिद्ध गायक होते. 1925मध्ये त्यांचे चिरंजीव तरुण, सिद्धहस्त गायक अण्णाबुवा यांचा मृत्यू झाला. या घटनेचा त्यांच्यावर जबरदस्त आघात झाला. 8 फेब्रुवारी 1927 रोजी पंडित बाळकृष्णबुवा यांचे इचलकरंजी येथे निधन झाले. संगीतातील ‘भीष्माचार्य’, ‘गायनाचार्य’ या पदव्या रसिकांनी त्यांना बहाल केल्या होत्या.


विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!