Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, March 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : मलई कोफ्ता आणि शिंगाड्याची भजी…
    फूड काॅर्नर

    Recipe : मलई कोफ्ता आणि शिंगाड्याची भजी…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 5, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, शिंगाड्याची भजी, मलाई कोफ्ता, स्वादिष्ट कोफ्ता, टेस्टी मलाई कोफ्ता, मलाई कोफ्ता रेसिपी, शिंगाड्याची भजी रेसिपी, शिंगाड्याच्या पिठाची भजी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    कोफ्तासाठी साहित्य

    • पनीर – अर्धी वाटी
    • मैदा – 8 चमचे
    • बेकिंग पावडर – 1 छोटा चमचा
    • हिरव्या मिरच्या – 4
    • कोथिंबीर – बारीक चिरलेली मूठभर
    • मीठ – चवीनुसार
    • तूप – तळणासाठी

    सारासाठी मसाला साहित्य

    • मोठा कांदा – एक
    • ओले खोबरे – अर्धी वाटी
    • लसूण – 7-8 पाकळ्या
    • हिरव्या मिरच्या – 2
    • लाल सुक्या मिरच्या – 2
    • धणे – 2 चमचे
    • जिरे – 1 चमचा
    • दालचिनी – 2 (बोटभर लांब कांड्या)
    • चारोळी – 5 टीस्पून (ऐच्छिक)
    • खसखस – 2 चमचे
    • आले – 1 इंच
    • कोथिंबीर – बारीक चिरलेली मूठभर
    • टोमॅटो – 3

    हेही वाचा – Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो

    कृती

    1. पनीर, मैदा, बेकिंग पावडर, चिरून घेतलेल्या मिरच्या, चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिसळावे आणि चांगले मळावे.
    2. या मिश्रणाचे बोराएवढे गोळे तयार करून बदामी रंगावर तळून घ्यावेत.
    3. हे तुमचे कोफ्ते तयार झाले.
    4. लसूण, कांदा आणि टोमॅटो चिरून, चार वाट्या पाणी घालून शिजवावेत.
    5. नंतर हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्या.
    6. मसाल्याचे सर्व जिन्नस एकत्र करून, वाटून गोळी करावी.
    7. पातेल्यात तूप घालून तापल्यावर मसाल्याची गोळी घालून परतून घ्यावी.
    8. त्यावर लाल तिखट घालून पुन्हा परतावे आणि त्यात टोमॅटो-कांद्याचे मिश्रण आणि पाणी घालून उकळी आणावी. आवडत असल्यास उकळत असताना दोन चमचे क्रीम किंवा लोणी घालावे. चवीप्रमाणे मीठ घालावे.
    9. या सारामध्ये तळून ठेवलेले कोफ्ते सोडावेत.

    टिप्स

    • पाहिजे असल्यास वाफवलेले एक वाटी मटाराचे दाणे सार बनविताना घालावेत.

    हेही वाचा – Recipe : बटाट्याचा बदामी हलवा


    शिंगाड्याची भजी

    साहित्य

    • शिंगाड्याचे पीठ – 1 वाटी
    • जिरे पावडर – 1 टीस्पून
    • मीठ – चवीनुसार
    • हिरव्या मिरच्या – 3
    • कोथिंबीर – अर्धी वाटी (बारीक चिरलेली)
    • दाण्यांचे कूट – अर्धी वाटी
    • सोडा – चिमटीभर
    • तूप – तळण्याकरिता
    • ताक – पाव वाटी

    कृती

    1. शिंगाड्याच्या पिठात दाण्याचे कूट आणि जिऱ्याची पावडर घालावी.
    2. चवीप्रमाणे मीठ आणि मिरच्या वाटून त्यात घालाव्या. बारीक चिरलेली कोथिंबीरही घालावी.
    3. तसेच ताक, चिमटीभर सोडा आणि गरम तुपाचे मोहन दोन चमचे घालावे.
    4. भज्याच्या पिठाप्रमाणे हे पीठ भिजवून, तुपामध्ये भजी तळून काढावीत.

    टिप्स

    • हवे असल्यास या भज्यांत बटाट्याचे अगर केळ्याचे कापही घालावेत.
    • शिंगाड्याच्या पिठाच्या भज्याप्रमाणेच केळ्याच्या पिठाचीही भजी करावीत. इतर साहित्य व कृती वरीलप्रमाणेच.

    (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)


    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026 फूड काॅर्नर

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    By Team AvaantarMarch 24, 2026

    रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही…

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    रामनवमी विशेष… कौसल्येचा राम!

    March 26, 2026

    Dnyaneshwari : पैं गा भक्तासि माझें कोड….

    March 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 मार्च 2026

    March 26, 2026

    नीरजचा निर्णय ऐकून राजेश अन् जयूला धक्काच बसला!

    March 26, 2026

    …अन् यमुनाकाकीच्या लक्षात आले, ‘शेवटी आहे कोण?’

    March 25, 2026

    आयुष्यात संवादाचा सेतू खूपच महत्त्वाचा, अन्यथा…

    March 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 248
    • अवांतर 175
    • आरोग्य 91
    • पंचांग आणि भविष्य 362
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 17
    • ललित 513
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn