Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मानखुर्द फलाट अन् सनी म्हणजेच ‘हृतिक’!
    ललित

    मानखुर्द फलाट अन् सनी म्हणजेच ‘हृतिक’!

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 4, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मानखुर्द फलाट, मानखुर्द स्टेशन, मानखुर्द प्लॅटफॉर्म, भिकारी सनी, विद्यार्थी सनी, सनी म्हणजे हृतिक, सनीचा वाढदिवस, सनीची आजी,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    राजीव जोशी

    ‘ए हीरो! शुक शुक…’ हे शब्द ऐकले मी, पण लक्ष न देता चाललो होतो. ‘अरे ए दादा, बघ ना माझ्याकडे. थोडी खिचडी आहे का? पोट नाही रे भरलं अजून… भूक आहे मला…’ हे ऐकलं आणि मागे वळून बघितलं. तर सनी! साधारण पाच वर्षांचा असेल, शाळेची अर्धी चड्डी आणि वरती कोणताही आणि कोणाचाही शर्ट, तोही कायम  कुठेतरी फाटलेला. आडवा भांग आणि डाव्या नाकपुडीतून कायम बाहेर डोकावणारा शेम्बुड… दिसायला सावळा, पण स्वतःला हृतिक रोशन समजणारा नव्हे, तोच माझ्यासारखा दिसतो, असं बोलणारा.

    मी मागे वळून बघितलं खरं, पण का माहीत नाही, मला खूप झोप येत होती. कदाचित, जास्त जेवलो असेन. “काय रे पोट नाही का भरलं?” मी विचारलं. “दादा, खाऊवाली मावशी आली आणि येवढूशी खिचडी देऊन गेली. मी एवढा मोठा, माझं पोट कसं भरणार.” शेम्बुड पुसत पुसत तो बोलला.

    मी म्हटलं की, “अरे येवढूसा रे तू! तू कसला मोठा…?” तर बोलतो कसा, “ओ मानखुर्दवरून एकटा येतो शाळेत… आंडू पांडू वाटलो का?” हे बोलताना एका पायावर जोर देऊन उभा होता…

    हे ऐकलं आणि माझी झोपच उडाली.

    सनीचे आई-वडील हे मानखुर्द स्टेशनला भीक मागायचे आणि सनी सुद्धा. पण सनी शाळेत पण यायचा. खूप हुशार होता म्हणून सगळ्यांचा खूप लाडका होता. त्याचे आई-वडील एकाच दिवशी ट्रेन अपघातात गेले. म्हातारी आजी होती. वय अंदाजे असेल पंचात्तर. कंबरेत पूर्ण वाकलेली. पावसाचं पाणी शिंपल्यात पडलं की, मोती होतो, असं ऐकलंय… पण या म्हाताऱ्या आजीच्या डोळ्यातल्याच पाण्याने मोती तयार झाला होता एका डोळ्यात! तरी पण बिचारी दर शनिवारी सनीला न्यायला शाळेत यायची. एकदा मी तिला विचारलं की, काय गं आजी रोज का नाही येत न्यायला? फक्त शनिवारीच का? तर मला बोलली की, “बाळा, अरे शनिवारी तुमच्या शाळेच्या समोरच्या देवळात दोन वेळचं जेवण मिळतं म्हणून मी येते आणि जाताना थोडं बरोबर घेऊन जाते; म्हणजे कसं की, रविवारी नको भीक मागायला… एक दिवस आम्हा दोघांना पण सुट्टी.” हे बोलताना तिच्या दोन्ही डोळ्यांतून पाणी येत होतं आणि मी ऐकताना तिचा डोळा चुकवून आवंढा गिळत होतो.

    तोपर्यंत वाटायचं की, भिकारी म्हणजे किती ना आराम! फक्त हात पसरले की मिळतं. कसली काळजी नाही, टॅक्स नाही. भरपूर पैसे… त्या दिवशी त्या आजीच्या यातना समजल्या. “याचे आई-बाप दोघं बी मेले गाडी खाली. जीव दिला त्यांनी, मला ठाव हाय…” आजी बोलता बोलता बोलून गेली. डोकं सुन्न झालं ऐकून! आणि तेवढ्यात आले सनी महाराज. त्याला आम्ही सगळेच ‘हृतिक’ अशी हाक मारायचो.

    असेच काही आठवडे गेले… दर शनिवारी आजी यायची जेवायची आणि जाताना घेऊन जायची. आम्ही सुद्धा सगळे शाळेतले काहीना काही द्यायचो. अशाच एका शनिवारी आजी माझ्या घरी आली. तेव्हा मी शाळेच्या जवळच राहायचो. दाराची कडी वाजली मी दार उघडलं तर, समोर आजी. मी म्हटलं “काय आजी आज इकडे कुठे?” माझं बोलणं आजीने ऐकलं की नाही माहीत नाही आणि तिने माझ्या हातावर लिमलेटची गोळी ठेवली आणि बोलली, “तुझा वाढदिवस होता ना काल? सनी बोलला मला…” काल माझा वाढदिवस माझ्या शाळेतल्या स्टाफने साजरा केला होता, हे सनीने पाहिलं असणार. त्याला नव्हता मी केक दिलेला. जेव्हा आजीने हातात लिमलेटची गोळी ठेवून बोलली ना माझ्या वाढदिवसाबद्दल, तेव्हा मला अपराधी असल्यासारखं वाटत होतं आणि लाज वाटत होती.

    हेही वाचा – सेम टू सेम!

    अशीच काही वर्षे गेली. सनी आता चौथीत गेला होता आणि मी ‘शुक शुक’चा ‘दादा’ झालो होतो, पण त्याच्या नाकातला शेम्बुड काही केल्या जात नव्हता.

    एक दिवस मला बोलला की, “दादा, तुमच्या सगळ्यांचे वाढदिवस होतात, माझा कोणीच करत नाही…” त्यावर मी बोललो की, “तुझा पण करेन की, त्यात काय?” एवढं बोलून मी माझ्या कामाला निघून गेलो. त्यानंतर सनी रोज न चुकता शाळेत यायला लागला आणि एक दिवस मला बोलला “काय रे दादा, नुसती बोलबच्चन ना?” मला आधी काही समजलंच नाही, मी बोललो, “का, काय झालं?” त्यावर बोलला की, “माझा वाढदिवस साजरा करणार होतास ना?” त्या दिवशी मी सहज बोलून गेलो आणि विसरलो पण होतो… पण बिचारा सनी रोज वाट बघायचा. मलाच लाज आणि वाईट वाटलं. मनात विचार आला की, “च्यायला आपण बोलताना बोलून जातो काहीपण, पण समोरच्याच्या मनावर किती आणि काय परिणाम होतो, याचा आपण विचारच करत नाही.” असो…

    मला बोलला की “दादा, उद्या आहे माझा हॅपी बर्डे येशील का माझ्या घरी?” मी बोललो की “हो, येईन दे तुझ्या घरचा पत्ता.” त्यावर मला बोलतो कसा, “अरे कोणालाबी विचार हृतिक कुठे राहतो, कोणिबी तुला घरी आणून सोडंल.” मी हसलो, ‘नक्की येईन’ असं सांगून निघून गेलो. पण या वेळेस ठरवलं होतं की, आता त्याचा अपेक्षाभंग करायचा नाही… आणि त्या दिवशी त्याचे डोळे भरले होते, पण एवढ्या लहान वयात पण त्याने डोळ्यातून थेंब खाली येऊन दिला नाही.

     दुसऱ्या दिवशी उठलो आणि निघालो हृतिककडे. जायची खरी म्हणजे अजिबात इच्छा नव्हती. शेवटी भिकच मागणार, हा असा विचार डोक्यात तरळून पण गेलो. मानखुर्द स्टेशनला उतरलो आणि एका टीसीला विचारलं की, “हा सनी कुठे सापडेल?” त्यावर तो टीसी बोलला की “आहो, सनी नाही, हृतिक! आज त्याचा बर्थडे आहे ना? तुम्ही त्याच्या शाळेत काम करता ना? कालपासून सगळ्यांना सांगत सुटलाय की, उद्या माझ्याकडे मला भेटायला दादा येणार आहे.” मग टीसी मला बोलला की “जा, एक नंबर फलाटावर असतील थे दोघं.” मी निघालो जाताना केक घेतला नव्हताच. एक दहा रुपयाचा बिस्कीटचा पुडा घेतला होता बरोबर…

    एक नंबरला मी जाईपर्यंत त्याला समजलं होतं की कोणीतरी त्याच्याकडे येतंय. एक नंबरला उतरलो  आणि तिथेच त्याचं घर. फलाटाच्या बाजूला जे लोखंडी रॉड असतात त्याला एक फाटलेली निळ्या रंगाची ताडपत्री तिरकी करून लावली होती, हेच त्याचं घर!

    बारीक पाऊस पडत होता. काही थेंब अंगावर पडत होते. आजी बाहेरच उभी होती. मला आलेला बघून सनी जोरात ओरडत सगळ्यांना सांगत सुटला होता की, ‘दादा आला, दादा आला.’ मला बघून आजी बोलली “आलास! मला नव्हतं वाटलं की, येशील…” आणि टचकन तिच्या डोळ्यात पाणी आलं. मला बोलली थांब बसू नको, इथं बसायला काही नाही, असं बोलून बाजूला असलेल्या बूट पॉलिशवाल्याकडून त्याचं स्टूल घेऊन आली आणि मला बोलली, “बस याच्यावर तुझी कापडं नाय खराब होणार…” मला माझीच लाज वाटत होती. मनात आलं की, किती ही गरीब! गरीब काय भिकारीच!! पण माझा आदर किती करत होती. त्या स्टुलावर बसलो मी.

    घरात तसा काळोख. त्या फाटलेल्या ताडपत्रीमधून काय येईल तो प्रकाश. समोर सहा विटांची चूल त्यावर एक पातेलं. बाकी भांडी नाहीत. “बस हा बाळा मी येतंय,” अस सांगून आजी गेली आणि कुठून तरी एक कटिंग चहा घेऊन आली. अजून सनीचा पत्ता नव्हता.

    तो आणलेला बिस्किटचा पुडा द्यायला मला लाज वाटत होती. मी चहा पित असताना एक मुलगी आली आणि आजीला बोलली की, “दादी कौन है ये चु…?” मग आजीने माझ्याबद्दल सांगितलं तर, मला बोलली, “केक नहीं लाया? आप स्कूल में काम करते हो? कितना कमाते? हमरा स्कूल रात को होता है…“ असं बोलून निघून गेली. जाता जाता एक शिवी पण देऊन गेली. आजी बोलली, “बाळा नको लक्ष देऊस… तू घे चाय. मजबुरी हाय बाबा तिची… ती तरी काय करणार आणि मी बी काय करणार!” तेवढ्यात सनी आला मला बोलला “दादा केक नाय ना आनलास?” मी बोललो की, “उद्या शाळेत, नक्की प्रॉमिस.” मला बघायला खूप गर्दी. सगळेच आले होते, सनीचे मित्र पण… माझ्या डोक्यात एकच की, केक आणायला हवा होता. चहा पिऊन मी निघालो. निघताना त्या आजीच्या पाया पडायला विसरलो नाही. जसा खाली वाकून तिच्या पायाला हात लावला एवढ्या जोरात हंबरडा फोडला. खूप रडली, खूप… उलट आजीने पण मला नमस्कार केला. मला पण आलं होतं रडायला. कसंतरी कंट्रोल केलं आणि निघालो. आता डोक्यात एकाच विचार की, सनीचा वाढदिवस उद्या शाळेत करायचा!

    ठरल्याप्रमाणे त्याचा वाढदिवस साजरा केला मी… कदाचित लाजेखातर.

    हेही वाचा – थिंक पॉझिटिव्ह

    काही दिवसांनी अचानक सनी शाळेत यायचा बंद झाला. आता जवळजवळ महिना झाला होता सनी शाळेत आला नव्हता. मला घर माहीत होतं म्हणून गेलो मी मानखुर्द स्टेशनला. एक नंबर फलाटावर गेलो तर, तिथे काम चालू होतं… ना तो बूट पॉलिशवाला होता, ना ती फाटलेली निळी ताडपत्री. तसाच स्टेशन मास्तरकडे गेलो आणि त्याला सांगितलं की, मी कोण कुठून आलोय ते. स्टेशन मास्तर बोलला की, “अच्छा ती म्हातारी? सनीची आजी ना?” मी “हो” बोललो. “आहो मेली की ती, खूप दिवस झाले! इथले पोलीस घेऊन गेले बॉडी… आणि सनी कुठे गेला काय माहीत? झाला महिना म्हातारीला मरून. त्यानंतर सनी इथे भीक मागत फिरायचा, आता कुठे माहीत नाही.” असं बोलून स्टेशन मास्तर त्याचं काम करायला लागला. ‘काय यार शीट…’ एवढंच बडबडलो आणि आलो शाळेत. नंतर काही दिवसांनी सनीच नाव आम्ही शाळेतून कमी केले.

    या गोष्टीला आज अठरा वर्ष झाली… आणि आज अठरा वर्षांनी माझ्या नवीन नंबरवर एक कॉल आला आणि त्यावर नाव होतं… Rutik Roshan calling…

    बाकी स्टोरी पुन्हा केव्हा तरी…


    मोबाइल – 9004101589

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026 ललित

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026 ललित

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    By प्रणाली वैद्यMay 8, 2026

    भाग – 24 समोर स्क्रीनवर प्रेझेंटेशन सुरू होतं आणि आराध्या ते लक्षपूर्वक ऐकत होती… कृत्तिकाने…

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    सरकता जिना… दोन भावांच्या प्रगतीचा

    May 7, 2026

    सहेला रे…

    May 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    Recipe : हिरवी मूगडाळ, बाजरी अन् तांदळाचे खमंग डोसे आणि इडल्या!

    May 8, 2026

    Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 291
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 412
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 610
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.