Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Reel पुरत्या नव्हे, Real भावना नातेसंबंधांच्या…
    फिल्मी

    Reel पुरत्या नव्हे, Real भावना नातेसंबंधांच्या…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 2, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठी कथा, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, भावभावना, इमोशनल फुल्ल, वास्तव आणि आभास, मालिकांचे जग, अतिसंवेदनशीलता, मन भरून येणे, भावनिक होणे,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.

    तशी मी लढाऊ प्रवृत्तीची बाई. आयुष्यात आलेली वाईट परिस्थिती म्हणा किंवा अजून काही… दोन हात करून लढून पुढे जात राहिले. पण एका गोष्टीत मला कधीच लढता आलं नाही… इमोशनशी (Emotion) म्हणजेच भावनांशी. बरेचदा मला ‘इमोशनल फुल्ल’ म्हटलं गेलंय. म्हणजे कसं आहे ना, मी कथा-कादंबऱ्या वाचताना भावनाप्रधान कथानक आलं की, मला रडू येतं. लहान असताना आकाशवाणीवर होणाऱ्या श्रुतिका ऐकताना पण मी रडायचे. नाटक पाहताना, सिनेमा पाहताना पण गंगा, यमुना हव्यातच! त्यामुळे झालं असं की, “ए, ही रडूबाई नको आपल्या सोबत…” असं ऐकायला मिळतं.

    एक वेळ अशी आली की, नवराही म्हणाला, “आता तुला थिएटरमध्ये सिनेमा बघायला नेणार नाही. लोक बघत राहतात. मला लोकांची भीती वाटते. उगाच मी काहीतरी केलं समजून मला मारायचे!” झालं थिएटरचा संबंध संपला…

    हेही वाचा – …अन् कुटुंबप्रेमाला आसुसलेल्या बबलीची कळी खुलली!

    एकदा घरात सीरियल बघत होते. सावत्र आई तरुण हीरोवर खूप अत्याचार, दादागिरी करत असते. त्याने तिचं ऐकावं म्हणून त्याला खूप मारते काठीने… आणि ते सगळं बघत मी रडत होते. तेवढ्यात माझा मुलगा आला. त्याने एकंदरीत आढावा घेतला. माझ्या शेजारी बसून मला समजवायला सुरुवात केली. “आई, अगं ती सीरियल आहे. नाट्य आहे. खोटं असतं सगळं… आणि माते त्या टीव्ही सीरियलमधल्या बिचाऱ्या हीरोवर अत्याचार करतेय ती जी बाई आहे ना, ती तू आहेस! तूच तो रोल करतेयस आणि टीव्ही बघताना रडतेयस कसली?” झालं हसावं की रडावं, काही सुचेना आणि अजून रडायला लागले…

    हेही वाचा – आठवणींचा जागर…

    माझी मुले सगळ्यांना सांगतात की, “आई तर ‘सिंग इज किंग’ बघताना सुद्धा रडते!”

    पण मला असे चिडवणारा माझा मुलगा मात्र सिद्धार्थ जाधवचे कोणतेही काम पाहताना नेहमीच हळवा व्हायचा. सिद्धू जरा जरी रडवेला झाला की, याला नेहमीच वाईट वाटून रडवेला व्हायचा. कारण, मात्र त्याला कधीच कळायचं नाही. नेमका मला एक सिनेमा ऑफर झाला, ‘माणूस एक माती’. त्या सिनेमामध्ये सिद्धार्थ जाधव माझा मुलगा झाला होता. आता हे दोघे रिअल नसले तरी, रिल भाऊ झालेच की… एका भावाला दुःख झालं की, त्याचं दुसऱ्याला वाईट वाटणारच नं! तर, हे असं त्रांगड आहे, नात्याचं आणि भावभावनांचं.


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com/ या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026 फिल्मी

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026 फिल्मी

    माझं बालपण… गिरगाव ते बदलापूर व्हाया कॉटनग्रीन!

    March 3, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    By हर्षा गुप्तेMarch 24, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. ‘सावधान इंडिया’ ही जोरदार चाललेली सीरियल.…

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    माझं बालपण… गिरगाव ते बदलापूर व्हाया कॉटनग्रीन!

    March 3, 2026

    एक अकेला इस शहर में…

    February 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn