साहित्य
- बटाट्याचे सत्व – अर्धी वाटी
- साखर – दोन वाट्या
- तूप – पाऊण वाटी
- लिंबाचा रस – दोन चमचे
- बदामाचे काप अगर काजूचे तुकडे – अर्धी वाटी
- केशर अगर खाण्याचा आवडत असेल तो रंग – एक लहान चमचा
हेही वाचा – Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो
कृती
- बटाटे किसून, तो किस पाण्यात घालून, चांगला कुस्करून, पिळून काढावा.
- राहिलेले पाणी बारीक जाळीच्या गाळण्याने अगर पातळ फडक्याने गाळून घ्यावे.
- पाणी तसेच ठेवून दिल्यावर साधारणपणे अर्ध्या तासाने सत्व खाली बसते.
- सत्व खाली बसल्यावर वरचे पाणी काढून टाकून द्यावे. हे सत्व लगेच अगर वाळवून ठेवून पुढे केव्हाही उपयोगात आणता येते.
- बटाट्याचा किस करावयाच्या वेळीच हे सत्त्व काढून घेतले, तर किसाचा उपयोग होतो आणि सत्वही मिळते.
- प्रथम अर्धी वाटी सत्व घेऊन त्यात अर्धी वाटी पाणी घालावे. दीड वाटी साखर घालावी. लिंबाचा रस दोन चमचे घालावा. पाव वाटी तूप घालावे. सर्व एकत्र कालवून पातेल्यात शिजत ठेवावे.
- हे मिश्रण सारखे ढवळत राहावे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. शिजून गोळा तयार होईल.
- नंतर त्यावर चमचा चमचा तूप घालून, तो गोळा परतून परतून शिजवावा.
- खाली लागावयास लागल्यास पुन्हा चमचाभर तूप घालावे.
- गोळा शिजून झाल्यावर तूप सुटायला लागून गोळ्याला चमक येते.
- नंतर त्यात काजूचे तुकडे अगर बदामाचे काप (थोडे वगळून) घालावेत, पुन्हा थोडे शिजवावे.
- गोळा पारदर्शक होऊन, आतील काप अगर तुकडे दिसू लागतात, तेव्हा गॅसवरून खाली उतरवावे.
- एका थाळीत तो गोळा घालावा आणि उरलेले काप अगर तुकडे त्यावर घालावेत.
- गार झाल्यावर वड्या कापाव्यात.
हेही वाचा – Recipe : कारल्याची भाजी अन् कारल्याच्या चकत्या!
(‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


