Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeललितआंब्याचा मधुर रस अन् अप्रतिम शीर खुर्मा…

आंब्याचा मधुर रस अन् अप्रतिम शीर खुर्मा…

डॉ. विवेक वैद्य

दुपारीच जड जेवण झाले होते… पुरणपोळी, आंब्याचा रस! त्यामुळे रात्री जेवणाची इच्छा नव्हती. तरीपण  फ्रीजमध्ये ठेवलेला वाटीभर आंब्याचा रस घेतला, त्याची मधुर चव जिभेवर राहिली. घड्याळाचा काटा अकराच्या पुढे गेला आणि डोळे जड होऊ लागले. अंथरुणावर पाठ टाकली तेवढयात…

“डॉक्टरसाब… डॉक्टरसाब” अशा हाका ऐकू आल्या. येणारी गुंगी झटकून उठलो. आजकाल पूर्वीसारखे रात्री येणार पेशंट खूप कमी झाले आहेत, (Thanks to Multispeciality Hospitals) तरीही कुणीतरी कधीतरी येत…

खिडकी उघडून विचारले, “कोण?”

“दादा, मैं सत्तार…”

सत्तार माझा जुना पेशंट. गोरा, हसमुख, सुदृढ…. सफाचट दाढी असलेला… त्याच्या वडिलांपासून ओळख. माझ्या वडिलांशीही त्यांची ओळख असल्याने मी सत्तारच्या वडिलांना चाचा म्हणायचो.

“क्या रे सत्तार, किसको लाया?”

“दरवाजा खोलो फिर बताता हूँ.”

दरवाजा उघडला तर सत्तार एकटाच!

हेही वाचा – सुख सुख म्हणजे काय असतं?

“क्या रे? तू बिमार है?”

“नहीं दादा. उपरवाले की दुवा है… बस्स! ये आपको देने आया…”

त्याने हातातला कडीचा स्टीलचा डबा मला दिला आणि माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. तो शीर खुर्मा द्यायला आला होता… आज ईद होती!

सकाळी आणि नंतरही एकदा त्याचा फोन आला होता… शीर खुर्मा खाण्यासाठी बोलावले होते.

“आप को फोन किया दादा, पर आप आये नहीं.”

“हां, मुझे वक्त नहीं मिला.” मी काहीतरी कारण द्यायचे म्हणून दिले.

“अम्मा वोहीच बोली. अभी दस बजे तक आप की राह देखी, फिर अम्मा बोली विवेक को टाइम नहीं मिला होंगा (ती मला सुरुवातीपासून नावानेच बोलावते) तू जाके देके आ.”

मी अगदी खजील झालो. मला भरपूर रिकामा वेळ होता. खरंतर, मी त्याच्या घरी जाऊ शकलो असतो, पण डोक्यात ‘भोंगे’ वाजत होते… मी जायचे टाळले.

हेही वाचा – ॲडिक्शनचा ‘गेम’!

“आ, अंदर तो आ…” मी काहीसा शरमून म्हणालो.

“नै दादा, रात हो गयी. आप आराम करो. डिब्बा लेने मैं कल आऊंगा,” असं म्हणत त्याने माझा निरोप घेतला.

काहीशा अपराधी भावनेने मी आत आलो, सत्तारने दिलेला डबा उघडला. घट्ट मलईदार दुधात शेवया, काजू बदामाचे तुकडे टाकले होते. मी एक चमचा शीर खुर्मा तोंडात टाकला. जिभेवरील मधुर आंब्याच्या रसाच्या चवीत अप्रतिम चवीचा शीर खुर्मा सहज मिसळून गेला…


विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!