Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरRecipe :  कारल्याची भाजी अन् कारल्याच्या चकत्या!

Recipe :  कारल्याची भाजी अन् कारल्याच्या चकत्या!

कारल्याच्या भाजीसाठी साहित्य

  • कारली – अर्धा किलो
  • दाण्याचे कूट – अर्धी वाटी
  • तिळाचे कूट – अर्धी वाटी
  • सुक्या खोबऱ्याचा कीस – अर्धी वाटी
  • तिखट – दोन चमचे
  • मीठ – चवीनुसार
  • गोडा मसाला – एक चमचा
  • चिंच – लहान लिंबाएवढी
  • गूळ – चिंचेच्या दुप्पट
  • फोडणीचे साहित्य

कृती

  1. कारल्याच्या पातळ चकत्या करून, त्यांना मीठ लावून, त्या एका फडक्यात बांधून ठेवाव्यात आणि त्यावर वजन ठेवावे.
  2. या चकत्या किमान अर्धा तास ठेवाव्यात, म्हणजे कडू पाणी निघून जाईल.
  3. चिंच कोळून पाणी काढून घ्यावे. त्या पाण्यात गूळ, तिखट, मीठ, दाण्याचे कूट, तिळाचे कूट, खोबऱ्याचा कीस (भाजून) आणि गोडा मसाला घालून पाणी तयार करावे.
  4. नंतर जास्त फोडणी करून ती या पाण्याला द्यावी.
  5. नंतर कारल्याच्या चकत्या त्यात घालाव्यात. कारल्याच्या चकत्या बुडतील, इतके पाणी असावे आणि कमी पडल्यास साधे पाणी घालावे.
  6. नंतर ती भाजी एका मोठ्या पातेल्यात घालून, मंद आचेवर शिजत ठेवावी. भांड्यावर झाकण ठेवावे आणि भाजी पूर्ण शिजवावी.
  7. अंदाजे अर्धा तास शिजावयास लागेल. शिजल्यावर झाकणासकट पातेले खाली उतरवून ठेवावे. गार झाल्यावरच झाकण काढावे, म्हणजे भाजी कडू होत नाही.

हेही वाचा – Recipe : व्हेज ऑयस्टर मोमोज… सोबत टोमॅटोची चटणी!


कारल्याच्या चकत्यांसाठी साहित्य

  • कारली – अर्धा किलो
  • तिखट – दोन टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • साखर – चवीनुसार
  • लिंबाचा रस – एक टीस्पून
  • सुक्या खोबऱ्याचा कीस – अर्धी वाटी
  • कोथिंबीर – बारीक चिरलेला मुठभर
  • फोडणीचे साहित्य

हेही वाचा – Recipe : असा सुरती उंधियू करून पाहिला आहे का?

कृती

  1. कारल्यांच्या पातळ चकत्या करून, त्यांना मीठ लावून चकत्या एका फडक्यात बांधून ठेवाव्यात व त्यावर वजन ठेवावे.
  2. चकत्या साधारण अर्धा तास ठेवाव्यात, म्हणजे त्यांचे कडू पाणी निघून जाईल.
  3. नंतर जरा जास्त फोडणी करून त्यावर त्या चकत्या टाकून कुरकरीत होईपर्यंत परताव्यात.
  4. मग त्यावर चवीनुसार मीठ, तिखट आणि साखर घालून, लिंबाचा रस घालावा.
  5. खोबऱ्याचा कीस घालून भाजी चांगली मिसळावी आणि वर कोथिंबीर घालावी.
  6. यात काजू आणि बेदाणाही घालतात.

(‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)


तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

avaantar.recipe@gmail.com

या ईमेलवर किंवा

9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकाव

तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!