Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : व्हेज ऑयस्टर मोमोज… सोबत टोमॅटोची चटणी!
    फूड काॅर्नर

    Recipe : व्हेज ऑयस्टर मोमोज… सोबत टोमॅटोची चटणी!

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 22, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, मोमोज, तिबेट खाद्यपदार्थ, तिबेटीयन खाद्यपदार्थ, व्हेज ऑयस्टर मोमोज, टोमॅटोची चटणी, ऑयस्टर मोमोज
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    गरमागरम वाफाळलेले ऑयस्टर मोमोज, सोबत टोमॅटोची तीळ आणि लसूण घातलेली चटणी ही डिश माझ्या मुलीने आमच्या समोर ठेवली, तेव्हा मला खरंच तिला शाबासकी द्यावी लागली. इतके सुंदर टेस्टी व्हेज-मोमोज तिने स्वतःची पद्धत आणि प्रमाण वापरून तयार केले म्हणून तिचे कौतुक करणे आवश्यक होते. तिची स्वतःची ही ऑयस्टर मोमोजची रेसीपी मी खाली दिलीच आहे आणि सोबत मोमोज बद्दलची थोडी माहिती सुद्धा!

    मोमोज ही भारताची डिश नाही. ती तिबेटची डिश आहे. नेपाळवरून आलेल्या या डिशने भारतातील स्ट्रीट फूडमध्ये आपली जागा तयार केली. असं म्हणतात की, तिबेटच्याही आधी मोमोज चीनमध्ये बनवले जायचे. मात्र, हे बनविण्याची पद्धत वेगळी होती. मोमोजचा खरा अर्थ वाफेवर बनवलेली चपाती. मोमोज ही डिश सर्वात आधी तिबेटच्या लहासा येथे बनवली गेली. मोमोज हे व्हेज आणि नॉन-व्हेज अशा दोन्ही प्रकारात असते. याशिवाय, मोमोज तळून किंवा उकडून बनविले जातात. बाहेरचं आवरण हे कणिक किंवा मैद्यापासून तयार केलेले असतं तर, आतलं सारण हे कोबी, गाजर, सिमला मिरची आणि आपल्या आवडीच्या भाज्यांचं असतं. नॉन-व्हेज मोमोजमध्ये चिकन, मटण, अंडं आणि काही ठिकाणी मासे सारण म्हणून भरतात.

    जेव्हा तिबेटमधील लोक भारतात आले, तेव्हा खऱ्या अर्थाने भारतात मोमोज आले आणि हळूहळू ही भारतातील लोकप्रिय डिश झाली. व्हेज-ऑयस्टर मोमोज प्रामुख्याने तिबेट आणि नेपाळ या देशांतील लोकप्रिय डिश आहे. पारंपरिक मोमोज जरी तिबेटी संस्कृतीचा भाग असले, तरी कालांतराने ‘इंडो-चायनीज’ चवीनुसार त्यात बदल झाले आहेत. यामध्ये वापरला जाणारा ‘ऑयस्टर सॉस’ हा मूळचा चीनमधील आहे, जो या मोमोजला एक वेगळी चव देतो. आजकाल हे मोमोज भारत, भूतान आणि नेपाळमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. आता हे ऑयस्टर मोमोज माझ्या मुलीने तिच्या पद्धतीने कसे केले ते पाहुया!

    साहित्य

    • ऑयस्टर मशरुम्स – 125 ग्रॅम
    • बारीक चिरलेला पान कोबी – मध्यम आकाराची एक वाटी
    • गाजर – अर्धी वाटी (बारीक चिरलला)
    • पातीचा कांदा – अर्धी वाटी
    • लसूण – 12 पाकळ्यांची पेस्ट
    • आल्याची पेस्ट – दोन चमचे
    • चिली फ्लेक्स – दोन चमचे
    • सो/e सॉस – एक चमचा
    • व्हेज ऑयस्टर सॉस – दोन चमचे
    • कोथिंबीर – चवीपुरती
    • मीठ – चवीनुसार
    • मैदा – एक वाटी
    • तेल – चार टेबलस्पून

    मॅरिनेशन सॉस कृती

    • दोन टेबल स्पून व्हेज ऑयस्टर सॉस, दोन चमचे आले-लसणाची पेस्ट हे एक टेबलस्पून तेलात मिक्स करून हा सॉस तयार करावा.

    मोमोज् कृती

    1. ऑयस्टर मशरुम्स धुऊन स्वच्छ कापडावर वाळवून घ्यावेत.
    2. हे मशरुम्स कोरडे सुकले की, एकदम बारीक चिरून घ्यावेत, नंतर मॅरिनेशन सॉसमध्ये 20 मिनिटे मॅरिनेट करून ठेवावेत.
    3. वीस मिनिटांनंतर एका कढईत एक टेबल स्पून तेल टाकून ते तापले की, मॅरिनेट केलेले ऑयस्टर मशरूम्स त्यात टाकावे.
    4. मशरूम्स शिजत आले की, थोडे पाणी सुटेल तेव्हाच त्यामध्ये एक चमचा आले-लसणाची पेस्ट, बारीक चिरलेला कोबी, गाजर, कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स टाकावे.
    5. त्यानंतर लगेच एक चमचा सोया सॉस टाकून सर्व मिश्रण मंद आचेवर शिजू द्यावे.
    6. सर्व मिश्रण कोरडे झाल्यावर थंड करून घ्यावे.
    7. मैद्यामध्ये दोन टेबल स्पून तेल टाकून मैदा नीट मळून घ्यावा. हाताने त्याची मूठ बांधून पाहावी, ती जर पक्की बांधली गेली तर, तेल मैद्याला व्यवस्थित लागले आहे, असे समजावे.
    8. नंतर हवे तेवढे पाणी टाकून घट्ट मैद्याचा गोळा भिजवून घ्यावा आणि तो ओल्या फडक्याने दहा मिनिटे झाकून ठेवावा.
    9. दहा मिनिटांनी मैद्याच्या पातळ पातळ करंजी सारख्या पात्या लाटून त्यामध्ये वरील सारण भरावे आणि करंजीला जशी मुरड घालतो त्याप्रमाणे मुरड घालून सर्व मोमोज तयार करून घ्यावेत.
    10. इडली पात्राला तेल लावून हे मोमोज 20 मिनिटे वाफवून घ्यावे. स्टिमर असेल तर त्यामध्ये हे मोमोज वाफवून घ्यावेत.
    11. मोमोजचे कव्हर ट्रान्सलुसन्ट होईपर्यंत ते वाफवून घ्यावेत. (ट्रान्सलुस्न्ट आणि ट्रान्सपरन्ट दिसणे यामध्येही फरक आहे, असं माझ्या मुलीने मला सांगितले.)

    टिप्स

    • मोमोजच्या मैद्याच्या पारीच्या जाडीवर मोमोज वाफवण्याचा वेळ अवलंबून असतो. पारी जर जाड असेल तर मोमोज वाफवायला वेळ लागतो त्यामुळे शक्यतोवर मोमोजच्या सारणासाठी मैद्याची पारी पातळ असावी.
    • मोमोजसोबत बहुतेक वेळा शेजवान चटणी किंवा सॉस दिलेला असतो. परंतु माझ्या मुलीने ही टोमॅटोची तीळ घातलेली चटणी मोमोजसोबत सर्व्ह करून त्यात आपला एक देशी चवीचा ट्विस्ट आणला, ज्यामुळे हे मोमोज अफलातून चवीचे झाले होते.

    या मोमोजसोबत पारंपरीक चटणी न करता टोमॅटो आणि तिळाची लाल सुक्या मिरच्या आणि लसूण घातलेली चटणी तयार करावी.

    कृती

    टोमॅटो चटणी करण्याकरिता तीन टोमॅटो बारीक चिरून ते कढईत अगदी थोडे तेल टाकून शिजायला ठेवावे, ते अर्धवट शिजले की, त्यात चार ते पाच लसूण पाकळ्या, चार ते पाच लाल सुक्या मिरच्या आणि एक चमचा तीळ टाकून हे सर्व मिश्रण टोमॅटोमधील पाणी जिरेपर्यंत शिजवून घ्यावे. नंतर त्यात एक चमचा मीठ टाकून मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरवर वाटून घ्यावे, की झाली तुमची टोमॅटो चटणी तयार.


    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 22, 2026

    मध्यंतरी माझ्या वाचनात असे आले की, सुप्रसिद्ध चरित्रअभिनेत्री दिवंगत लीला मिश्रा या जेवताना पक्की रसोईतील…

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn