Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 20 जानेवारी 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 20 जानेवारी 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 20, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 20 जानेवारी 2026; वार : मंगळवार
    • भारतीय सौर : 30 पौष शके 1947; तिथि : द्वितीया 26:42; नक्षत्र : श्रवण 13:06
    • योग : सिद्धी 20:00; करण : बालव 14:31
    • सूर्य : मकर; चंद्र : मकर 25:34; सूर्योदय : 07:14; सूर्यास्त : 18:22
    • पक्ष : शुक्ल; मास : माघ; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – आजचा दिवस यशाने भरलेला असेल. नोकरीच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील. कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल. वडिलधाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. कोणतेही काम संयमाने करा. जोखीम घेण्याचे टाळा, कारण त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. आर्थिक आणि व्यावसायिक परिस्थिती चांगली राहील.

    वृषभ – आजचा दिवस आनंददायी असेल. कौटुंबिक जीवन अधिक चांगले असेल. उत्पन्नाचे काही नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. तरीही उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. आज एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या व्यवसायाची परिस्थिती मजबूत होईल.

    मिथुन – आजचा दिवस फायदेशीर असेल. नशीब तुमच्या बाजूने असेल. कष्टाचे फळ मिळेल. वरिष्ठांच्या पाठिंब्याने एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात यश मिळू शकते. संततीच्या आरोग्याकडे मात्र लक्ष ठेवा. सामाजिक कार्यात आवड वाढेल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल.

    कर्क – आजचा दिवस शुभ आहे. तुम्हाला आनंद होईल, अशा अनेक गोष्टी घडतील. एखादी चांगली बातमी मिळू शकते. आज कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. भावंडांकडून तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. व्यवसाय विस्ताराची शक्यता आहे.

    सिंह – ज्यांना भेटण्याची इच्छा असेल अशा व्यक्तींशी आज सिंह राशीच्या जातकांची भेट होऊ शकते. शारीरिक समस्या दूर होतील. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील. बचतीवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. रागावर ताबा ठेवा, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात.

    कन्या – कन्या राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस भाग्याचा ठरणार आहे. भौतिक संपत्तीत वाढ होईल. विद्यार्थ्यांसाठी हा चांगला काळ आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. आज बरीच मोठी रक्कम दान देखील करू शकता.

    तुळ – आज कौटुंबिक जीवन आनंदी राहील. मानसिक ताण कमी होईल. एखाद्या सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. व्यवसायाचा समाधानकार विस्तार होईल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

    वृश्चिक – वृश्चिक राशीच्या जातकांनी आज नशिबावर अवलंबून राहणे टाळावे. मालमत्तेशी संबंधित सगळे  वाद मिटू शकतात. अडकलेले पैसे आज परत मिळतील. मुलांची चांगली प्रगती होईल, त्याने समाधान मिळेल. आज धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

    हेही वाचा – पडद्यावर न झळकलेली ‘त्या’ हीरोची आई…

    धनु – धनु राशीच्या जातकांना आज एखादी चांगली बातमी मिळू शकते. प्रलंबित कामे पूर्ण होतील. प्रवासाचा योग आहे. कौटुंबिक जीवनात सुधारणा होईल. आदर आणि सन्मानात वाढ होईल. आज वाहन आणि आरोग्य या दोन बाबींवर खर्च करावा लागू शकतो, त्यामुळे बजेटवर लक्ष ठेवा.

    मकर – आज एखादी महागडी भेटवस्तू मिळू शकते. भावंडांना आर्थिक मदत करावी लागू शकते. काही जातकांना परदेशातून चांगल्या नोकरीच्या ऑफर येईल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. जोडीदाराकडून भक्कम पाठिंबा मिळेल. व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल.

    कुंभ – आज सरकारी व्यवस्थेचा पूर्ण फायदा होईल. राजकीय लाभही शक्य आहे. सहकारी तुमची प्रशंसा करतील. एखाद्या प्रकल्पात नवीन टप्पे गाठू शकाल. आज तुमच्या कामावर वरिष्ठ खूश होतील आणि बक्षीस देतील. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. व्यावसायिकदृष्ट्याही बऱ्याच सुधारणा होतील.

    मीन – आज कामात प्रगती करण्याची संधी मिळेल. घाईघाईने कोणताही निर्णय घेण्याआधी पूर्ण विचार करा, गरज पडली तर ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुमचे बोलणे लोकांना आकर्षित करेल. कुटुंबासोबत एक उत्तम संध्याकाळ घालवाल. जोडीदाराच्या तब्येतीकडे लक्ष द्या, अन्यथा परिस्थिती बिघडू शकते.


    दिनविशेष

    राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

    टीम अवांतर

    भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत असणाऱ्या अजित डोवाल यांचा जन्म  20 जानेवारी 1945 रोजी उत्तराखंडच्या पौरी गढवाल येथे झाला. सुरुवातीला त्यांचे शिक्षण राजस्थानमधील अजमेर मिलिट्री स्कूलमध्ये झाले. 1967 मध्ये त्यांनी आग्रा विद्यापीठातून अर्थशास्त्राचे पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी भारतीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. भारताचे ‘जेम्स बाँड’ म्हणून त्यांची ओळख आहे. गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अशी अजित डोवाल यांची प्रदीर्घ कारकीर्द अनेक आव्हानांनी भरलेली होती. चित्रपट कथेला साजेशे असे त्यांचे आयुष्य आहे.

    गुप्तहेर म्हणून डोवाल 7 वर्षे पाकिस्तानात होते. तिथे राहून त्यांनी पाकिस्तानची अनेक स्तरांवरील गुप्त माहिती गोळा केली.  भारतात परत आल्यावर  ईशान्य भारत आणि पंजाबमधील बंडखोरांसोबत त्यांचा लढा सुरू झाला. मिझोरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांना प्रतिष्ठित असे कीर्तिचक्र देऊन सन्मानित करण्यात आले. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पोलीस अधिकाऱ्याला हा  पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तोपर्यंत लष्करातील अधिकाऱ्यांना हा पुरस्कार दिला जात होता. याशिवाय 1999 साली कंदहार विमान अपहरण प्रकरणी देखील त्यांनीच मध्यस्थी केली होती.

    हेही वाचा – अब्रह्मण्यम्… गुळचट ते झणझणीत!

    पुढे Intelligence Bureau मध्ये (IB) काम करत असताना देखील त्यांनी विविध मोहिमा पार पाडल्या. 2004 मध्ये त्यांची IB च्या संचालकपदी नेमणूक झाली. 2009 मध्ये ते निवृत्त झाले. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे भारतासाठी धोरणात्मक निर्णय घेताना त्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरू लागला.

    2016 मधील सर्जिकल स्ट्राइक असो वा 2019 मधील धाडसी एअरस्ट्राइक यामुळे नव्या भारताची ओळख जगाला झाली. अर्थात, या दोन्ही घटनांमागे डोवाल यांचीच रणनीती होती. याशिवाय, इराणमधील भारतीय नर्सेसची सुटका, पाकिस्तानमधील भारतीय मच्छीमारांची सुटका, चीनबरोबर 2020 मध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर वाटाघाटी करण्यासाठी झालेली त्यांची निवड यामुळे डोवाल यांची ओळख प्रत्येकाला झाली.

    वयाच्या 81 व्या वर्षी देखील त्यांची अचंबित करणारी निर्णयक्षमता आणि कामावरील श्रद्धा यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी झालेली आपली निवड कशी योग्य आहे, याचीच चुणूक दाखवणारी आहे.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    May 7, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    By Team AvaantarMay 9, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 मे 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 19…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 मे 2026

    May 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 07 मे 2026

    May 7, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 06 मे 2026

    May 6, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 मे 2026

    May 9, 2026

    माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!

    May 8, 2026

    दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद

    May 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 292
    • अवांतर 185
    • आरोग्य 108
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 412
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 204
    • मैत्रीण 18
    • ललित 612
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026

    बालपणीचा मैतर पांडूची गोष्ट

    May 9, 2026

    Dnyaneshwari : ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे

    May 9, 2026
    Most Popular

    वाढत चाललेला गुंता अन्…

    May 9, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.