दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 11 जानेवारी 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 21 पौष शके 1947; तिथि : अष्टमी 10:19; नक्षत्र : चित्रा 18:10
- योग : सुकर्मा 17:25; करण : तैतिल 23:28
- सूर्य : धनु; चंद्र : तुळ; सूर्योदय : 07:13; सूर्यास्त : 18:17
- पक्ष : कृष्ण; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – कथा शिवदासची, रंगली मुंबईत!
दिनविशेष
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स.खांडेकर
टीम अवांतर
मराठीतील प्रसिद्ध कथा-कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक म्हणून ओळखले जाणारे वि. स. खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1998 रोजी सांगली येथे झाला. खांडेकरांचे लेखन 1919 पासून प्रकाशित होऊ लागले. त्यांनी ‘कुमार’ या टोपण नावाने कविता तर ‘आदर्श’ या टोपण नावाने विनोदी लेख प्रसिद्ध केले. वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिलेले रमणीरत्न हे त्यांचे नाटक अप्रकाशित आहे. ‘घर कुणाचे’ ही त्यांची पहिली लघुकथा 1923मध्ये महाराष्ट्र साहित्य या मासिकात प्रसिद्ध झाली. नवमल्लिका हा त्यांचा पहिला कथासंग्रह तर, हृदयाची हाक ही त्यांची पहिली कादंबरी. 1936 साली प्रकाशित झालेला वायुलहरी हा त्यांचा पहिला लघुनिबंधसंग्रह होता.
खांडेकरांचे लेखन बहुविध स्वरूपाचे असून त्यात 15 कादंबऱ्या, 31 लघुकथासंग्रह, 10 लघुनिबंधसंग्रह, 6 रूपककथासंग्रह, 1 नाटक याशिवाय काही चरित्रात्मक / समीक्षात्मक ग्रंथ आणि संकीर्ण लेखसंग्रह यांचा समावेश होतो. तसेच, त्यांनी मराठी, हिंदी आणि तेलुगू चित्रपटांसाठी एकूण 18 पटकथा लिहिल्या.
हेही वाचा – निनादच्या कंपनीची औषधं कोहिनूर हॉस्पिटलकडे का नव्हती?
त्यांच्या बहुतेक साहित्यकृतींच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. अनेक कादंबऱ्यांचे भारतातील अन्य भाषांमध्ये, विशेषत: गुजराती, तमिळ, हिंदी या भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. त्यांच्या काही कथांची भाषांतरे इंग्रजी, रशियन तसेच अन्य विदेशी भाषांमध्ये देखील झाली आहेत. त्यांनी अनेक पुस्तकांचे संपादन केले आहे. अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. जीवन आणि कला यांना वाहिलेल्या ज्योत्स्ना या मासिकाचे ते संपादक होते.
1961 मध्ये त्यांच्या ‘ययाति’ या कादंबरीस महाराष्ट्र सरकारने कादंबरी विभागाचे पहिले पारितोषिक दिले. त्याच वर्षी या कादंबरीला साहित्य अकादमीचे पारितोषिकदेखील मिळाले. 1941 मध्ये सोलापूर येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 1957 मध्ये मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांस मिळाले. 1968 मध्ये भारत सरकारने त्यांस ‘पद्मभूषण’ हा किताब दिला. 1970 मध्ये साहित्य अकादमीचे फेलो म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्या ययाति कादंबरीसाठी 1974-75 चे भारतीय ज्ञानपीठाचे एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. 2 सप्टेंबर 1976 रोजी त्यांचे निधन झाले. मात्र मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी अखंडपणे कार्यरत असलेले एक श्रेष्ठ समर्पित साहित्यिक म्हणून त्यांचे मराठीतील स्थान कायम राहील.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


