Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » घरघंटीची उपयुक्तता नेमकी किती?
    अवांतर

    घरघंटीची उपयुक्तता नेमकी किती?

    माधवी जोशी माहुलकरBy माधवी जोशी माहुलकरJanuary 2, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, घरगुती उपकरणे, आटाचक्की, घरघंटी, आटाचक्कीची उपयुक्तता, घरघंटीची उपयुक्तता, घरघंटीची निगा, आटाचक्कीची निगा
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वॉशिंग मशीन, भांडी धुवायचे मशीन यासोबत आटाचक्की किंवा जिला ‘घरघंटी’ म्हणूनही संबोधले जाते, ते मशीन घरामधे असणे अगदी अनिवार्य झाले आहे. या मशीनला ‘घरघंटी’ का म्हटले जात असावे, याबाबतीत काही माहिती नाही. ही घरघंटी किंवा आटाचक्की मी जेव्हा पुण्यात माझ्या भाच्याकडे पहिल्यांदा पाहिली, तेव्हा मला जरा नवल वाटले, पण ही वस्तू किती उपयोगी आहे, हे नंतर समजले. त्याच्याकडे तर सर्व काम या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटनेच होतात. त्याच्या घराची फरशी पण त्याची ‘गंगाबाई’ नावाची फ्लोअर क्लिनर मशीन किंवा ‘रोबोट’ म्हणू हवं तर ती झाडून पुसून स्वच्छ करते. ही गंगाबाई आकाराने लहान आणि गोल असल्याने प्रत्येक रूममध्ये गरागरा फिरत कानाकोपऱ्यात जाऊन कचरा साफ करते. फरशीवर पाणी स्प्रे करून फरशीपण साफ करते. फक्त तिच रोजचे प्रोग्रॅमिंग सेट करावे लागते.

    आजकाल आयटी कंपन्यांमध्ये किंवा कॉर्पोरेट सेक्टरला काम करणारे सकाळीच घराबाहेर पडतात. त्यांची मुलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकतर डे केअर सेंटरला ठेवतात किंवा घरामध्ये त्यांचे आजी-आजोबा असतील तर, ते नातवंडांकडे लक्ष ठेवतात. मेट्रो सिटीजमध्ये राहणाऱ्या अशा परिवारांमध्ये आटाचक्कीसारखी उपकरणे गरजेची आहे. घरघंटी ही जरी आवश्यक बाब असली तरी तिची निगा राखणे आणि स्वच्छता करणे वेळोवेळी जमायला हवे नाहीतर, अशा वस्तू खराब व्हायला वेळ लागत नाही.

    माझी एक मैत्रीण आहे, ती घरातील वॉशिंग मशीन, मिक्सर, फूड प्रोसेसर, फ्रीज, ओव्हन यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दर तीन-चार वर्षांत बदलते, परंतु याचा अर्थ असा नाही की, तिचा या वस्तूंचा वापर योग्य किंवा नीटनेटका नाही, ती चांगली स्वच्छता राखत असते. अशा वेळी मला तिचं वागणे सयुक्तिक वाटत नाही. आपल्याकडे सहसा कुठल्याही महाग वस्तू आपण इतक्या लवकर विकत नाही. मी तिला तू असं का करतेस, असं विचारलं तर तिचं असं म्हणण होतं की, एक तर तिला या वस्तूंची मुळातच आवड आहे, बाजारात नवनवीन कंपन्यांच्या या वस्तू दिसल्या की, तिला त्या वापरून बघायची हौसच आहे! दुसरं तिचं मत असं आहे की, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा वापर जास्तीत जास्त चार ते पाच वर्षं करावा, त्यानंतर ते बदलावेत… का ते माहीत नाही! कमाल आहे नाही? काही लोक असे असतात की, ते आपल्या लहानपणाच्या वस्तूपण आयुष्यभर जपून ठेवतात आणि काही लोक असे माझ्या मैत्रिणीसारखेही असतात. तरीही, माझ्या मते वस्तूची उपयुक्तता त्या वस्तूच्या गॅरन्टीवर आणि टिकाऊपणावर अवलंबून असते!

    हेही वाचा – Nostalgia : निगाहें मिलाने को जी चाहता हैं…

    काही वेळेस असं वाटतं की, आपण विनाकारण काही वस्तू गरज नसताना केवळ हव्यास म्हणून जमा करतो. आता आटाचक्कीचेच उदाहरण घ्या ना! आमच्या विदर्भात आजही गावागावात शहरांमध्ये दळणाच्या चक्क्या आहेत. बहुतांश लोक या चक्क्यांवरूनच महिन्याचे धान्य दळून आणतात. महिन्याकाठी दळणाचे मुख्य काम करणे, हा घराघरातील अविभाज्य घटक आहे. काही ठिकाणी अजूनही गिरणीवर दळणाकरिता लाइन लागते आणि त्याकरिता नंबर लावावा लागतो.

    जोपर्यंत आमच्या गावागावात या गिरण्या आहेत, तोपर्यंत तरी तेथील स्थानिक लोक गिरणीवरून दळण आणणेच पसंत करतील, असं माझं मत आहे. याचा अर्थ असा नाही की, आमच्या भागातील लोक घरघंटी किंवा आटाचक्की वापरतच नसतील. आमच्या नागपूरमध्ये ही घरघंटी आता बहुतांश घरात दिसायला लागली आहे, परंतु मुंबई, पुण्याच्या तुलनेत कमीच आहे.

    माझ्या माहितीतल्या काही लोकांना घरी आटाचक्की ठेवणे काही दिवसांनी नकोसं वाटतं, कारण मुंबई-पुण्यातील सतत ओलसर आणि दमट हवामान! त्यांचं असं म्हणणं आहे की, या आटाचक्कीची कितीही साफसफाई केली, निगा राखली तरी याच्या बारीकसारीक जागांमध्ये पीठाचे, धान्याचे बारीक कण अडकून असतात, त्यामुळे त्या ठिकाणी सोंडे किंवा टोस / टोके तयार होतात. तसेच, या हवामानात घरातील वाणसामानाची जर नीट काळजी घेतली नाही तर, ते किडण्याची शक्यता जास्त असते. याउलट, आमच्याकडील हवामान उष्ण आणि कोरडे असल्यामुळे आमच्या भागात या घरगुती आटाचक्की व्यवस्थित कार्यरत राहतील. दळण काढल्यानंतर आटाचक्की जर व्यवस्थित स्वच्छ केली गेली नाही तर, त्याच्या आतील ब्लेड्स, जाळ्या खराब होतात. अशा वेळेस ते पाण्याने धुतले तर स्वच्छ कापडाने पुसून, पंख्याखाली कोरडे करून, शक्य झाल्यास उन्हात वाळवून मगच पुन्हा वापरात आणावे. परंतु, वेळेच्या अभावामुळे हे नियमितपणे करणे काहीजणांना शक्य होत नाही किंवा कंटाळा हे देखील एक कारण असू शकतं.

    हेही वाचा – गोष्ट एका ‘व्हेज अंडाकरी’ची!

    दरवेळी दळण झाल्यावर आटाचक्क्की कोरड्या कॉटनच्या कपड्याने आतून बाहेरून स्वच्छ पुसून काढावी तरचं तिच मशीन व्यवस्थित काम करेल. थोडक्यात काय तर घरगुती वस्तूंची नियमितपणे स्वच्छता आणि काळजी घेतली तर, त्या वर्षानुवर्षे चांगल्या राहतात. अशा वस्तूंना अधूनमधून ऊन दाखवणे पण गरजेचे असते. काही लोक असेही पाहाण्यात आहेत की, त्यांच्याकडे या आटाचक्की दहा-बारा वर्ष झाली तरी ती निटनेटक्या परिस्थितीत वापरात आहेत. याची जितकी उपयुक्तता आहे, तितकीच ती टिकवणे देखील आपल्या हातात आहे. घरातच आटाचक्की असल्यामुळे पीठ संपले तरी, वेळेवर पटकन पीठ दळता येतं. गिरणीत जाऊन लाइनमध्ये नंबर लावून पीठ दळून आणायची कटकट नसते. गिरणीत काही वेळेस पीठ मिक्स व्हायची, किंवा एकतर जाड नाहीतर एकदम बारीक देण्याच्या तक्रारी असतात, परंतु घरघंटीवर आपण आपल्या मनासारखे हवी ती पिठं तयार करू शकतो. अशी ही आटाचक्की काही तोटे सोडले तर, फायदेशीर आहे. परंतु ती आमच्याकडे अजून इतकी चलनात नाहीये.

    चक्कीवाला म्हणतो की, “तुमच्या दळणांवर माझी गिरणी अवलंबून आहे. ज्यावर माझं कुटुंब मी पोसतो, जर तुम्ही सगळ्यांनीच या अशा मशिन्स घरोघरी आणल्या तर आमच्यासारख्यांनी काय कमवायचं?” त्यांचेही म्हणणे योग्य आहे. आटाचक्की जर घरोघरी आल्या तर त्या कंपन्यांचाच फायदा होईल आणि या छोट्यामोठ्या दुकानदारांचे नुकसान होईल. त्यामुळे शक्य होईल तोपर्यंत गिरणीवर जाऊन दळण आणायचा शिरस्ता आम्ही कायम राखला आहे. ‘जगा आणि जगू द्या!’ इतकंच काय ते आपण लक्षात ठेवायचं बाकी काही नाही. उरलंसुरलं ज्याचं त्याच्याजवळ!

    Avatar photo
    माधवी जोशी माहुलकर

    एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.

    Related Posts

    …तर पोटगी मिळत नाही!

    July 29, 2026 अवांतर

    आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची…

    July 22, 2026 अवांतर

    संत जनाबाई… प्रत्यक्ष जगताना विठूरायाची साथ!

    July 17, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    …तर पोटगी मिळत नाही!

    By Team AvaantarJuly 29, 2026

    ॲड. अमोल दोरवट हिंदू विवाह अधिनियम, 1955चे कलम 24 (खटला चालू असताना पोटगी) आणि कलम…

    आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची…

    July 22, 2026

    संत जनाबाई… प्रत्यक्ष जगताना विठूरायाची साथ!

    July 17, 2026

    पंढरीची वारी… कपडे अन् अंतरंग दोन्ही पांढरं शुभ्र!

    July 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026

    ज्योतिषशास्त्र… तुमच्या नावात दडला आहे तुमचा ग्रहाधिदेवता!

    August 1, 2026

    हर्निया (आंत्रवृद्धी) विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गुरु क्षेत्र गुरु देवता, गुरु माय गुरु पिता

    August 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 380
    • अवांतर 200
    • आरोग्य 135
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 515
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 244
    • मैत्रीण 24
    • ललित 821
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 02 ऑगस्ट 2026

    August 2, 2026

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    August 1, 2026

    स्कूटी, बायको आणि मी…

    August 1, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.