Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : हें असो आणिक कांहीं, तया सर्वत्र मीवांचूनि नाहीं…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : हें असो आणिक कांहीं, तया सर्वत्र मीवांचूनि नाहीं…

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 2, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय सातवा

    एर्‍हवीं ज्ञानिया जो म्हणिजे । तो चैतन्यचि केवळ माझें । हें न म्हणावें परि काय कीजे । न बोलणे बोलों ॥126॥

    बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते । वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥19॥

    जे तो विषयांची मोट झाडी- । माजीं कामक्रोधांचीं सांकडीं । चुकावूनि आला पाडी । सद्वासनेचिया ॥127॥ मग साधुसंगें सुभटा । उजू सत्कर्माचिया वाटा । अप्रवृत्तीचा अव्हांटा । डावलूनि ॥128॥ आणि जन्मशतांचा वाहतवणा । तेविंची आस्थेचिया न लेचि वाहणा । तेथ फलहेतूचा उगाणा । कवणु चाळी ॥129॥ ऐसा शरीरसंयोगाचिये राती- । माजीं धांवतां सडिया आयती । तंव कर्मक्षयाची पाहती । पाहांट जाली ॥130 ॥ तैसी गुरुकृपाउखा उजळली । ज्ञानाची वोतपली पडली । तेथ साम्याची ऋद्धि उघडली । तयाचिये दिठी ॥131॥ ते वेळी जयाकडे वास पाहे । तेउता मीचि तया एक आहे । अथवा निवांत जरी राहे । तरी मीचि तया ॥132॥ हें असो आणिक कांहीं । तया सर्वत्र मीवांचूनि नाहीं । जैसें सबाह्य जळ डोहीं । बुडालिया घटा ॥133॥ तैसा तो मजभीतरीं । मी तया आंतुबाहेरीं । हें सांगिजे बोलवरी । तैसें नव्हे ॥134॥ म्हणोनि असो हें यापरी । तो देखे ज्ञानाची वाखारी । तेणें संसरलेनि करी । आपु विश्व ॥135॥ हें समस्तही श्रीवासुदेवो । ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो । म्हणोनि भक्तांमाजीं रावो । आणि ज्ञानिया तोचि ॥136॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : दुःखशोकांचां घाईं, मारिलियाची सेचि नाहीं…

    अर्थ

    वास्तविक पाहिले तर ज्ञानी म्हणून जो म्हणतात, तो माझा केवळ आत्माच आहे, ही गोष्ट शब्दांनी सांगण्यासारखी नाही. परंतु काय करावे? ही न बोलण्यासारखी गोष्ट पण तुला सांगितली. ॥126॥

    अनेक जन्म घेतल्यानंतर ‘सर्व (विश्व) वासुदेव होय’ असे ज्ञान प्राप्त होऊन, तो ज्ञानी मला शरण येतो (मला येऊन पोहोचतो). असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. ॥19॥

    कारण तो विषयांच्या दाट झाडीतून काम, क्रोध यांची संकटे टाळून, चांगल्या वासनारूपी डोंगरावर आला. ॥127॥ अर्जुना, मग संतांच्या संगतीने, विहित कर्मांच्या सरळ मार्गाने, निषिद्ध आचरणाचा आडमार्ग टाकून ॥128॥ आणि शेकडो जन्मांचा (कर्ममार्गाने) प्रवास करत असता, तो फलाशेच्या वहाणा (अंत:करणरूपी) पायात घालत नाही. अशा स्थितीत (स्वर्गादी) फलांच्या हेतूंचा हिशेब कोणी करावा? ॥129॥  याप्रमाणे देहतादात्म्यरूप रात्रीत सर्वसंग परित्यागरूपी तयारीने धावत असताना, कर्माच्या क्षयाची उजाडती पहाट झाली ॥130॥ त्याचप्रमाणे गुरुकृपारूप उष:काल झाला आणि ज्ञानरूपी कोवळे ऊन पडले, तेव्हा त्या प्रसंगी त्याच्या दृष्टीला ब्रह्मैक्याचे ऐश्वर्य दिसू लागले. ॥131॥ त्यावेळी तो जिकडे तिकडे पाहील, तिकडे तिकडे त्याला मीच एक आहे अथवा तो जरी निवांत राहिला तरीही त्याला मीच आहे. ॥132॥ हे बोलणे असो, त्याला सर्व ठिकाणी माझ्याहून दुसरे काही एक नाही. ज्याप्रमाणे डोहात घट बुडाला असता त्याच्या आत-बाहेर जसे पाणीच असते ॥133॥ त्याप्रमाणे तो माझ्यामध्ये असतो आणि मी त्याच्या आत-बाहेर असतो. ही स्थिती शब्दाने सांगता येईल, अशी नाही. ॥134॥ म्हणून ते राहू दे, याप्रमाणे तो ज्ञानाचे भांडार पाहातो आणि त्या योगाने सावरल्यामुळे सर्व जग आत्मरूप पाहातो. ॥135॥ हे संपूर्णाविश्व श्रीवासुदेव आहे, अशा अनुभवरूपी रसाचा त्याचा भाव ओतलेला असतो, म्हणून सर्व भक्तांमध्ये तो राजा आहे आणि ज्ञानीही तोच आहे. ॥136॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : जैसा वारा कां गगनीं विरे, मग वारेपण वेगळें नुरे…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    April 15, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    By Team AvaantarApril 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा देवा गंधर्वनगरीची वस्ती । सोडूनि निघालों लक्ष्मीपती । होतों उदकाचिया आर्ती…

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    April 15, 2026

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 269
    • अवांतर 182
    • आरोग्य 101
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 386
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 195
    • मैत्रीण 18
    • ललित 558
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026
    Most Popular

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.