Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    June 17, 2026

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    June 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : गुजरात स्पेशल उंधियू!
    फूड काॅर्नर

    Recipe : गुजरात स्पेशल उंधियू!

    Team AvaantarBy Team AvaantarDecember 29, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, गुजरात स्पेशल, उंधियो, वांग्याची भाजी, वांग्याची मिक्स भाजी, गुजरात स्पेशल उंधियो, खमंग उंधियो
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सायली कान्हेरे

    साहित्य

    • वालाचे दाणे – पाव किलो
    • सुरती पापडी – पाव किलो
    • तूर शेंगा – पाव किलो
    • कंद (जांभळा) – पाव किलो
    • छोटी वांगी – पाव किलो
    • छोटे बटाटे – पाव किलो
    • सांबारासाठी वापरतात ते छोटे कांदे – पाव किलो
    • मटार – पाव किलो
    • नारळ – 1
    • लसूण पात – 1 जुडी
    • मिरच्या – 5 (लवंगी असल्यास 3)
    • चिरलेली कोथिंबीर – वाटीभर
    • गोडा मसाला – अर्धी वाटी
    • गूळ – अर्धी वाटी
    • तिखट – 4 टेबलस्पून
    • मीठ – चवीनुसार

    भज्यांसाठी साहित्य

    • मेथी – 1 जुडी
    • बेसन – 1 वाटी
    • तांदूळ पीठ – अर्धी वाटी
    • मीठ – चवीनुसार
    • तिखट – 2 टेबलस्पून
    • ओवा – अर्धा टीस्पून
    • हिंग – 1 टीस्पून
    • हळद- 1 टीस्पून
    • तेल- तळण्यासाठी

    पुरवठा संख्या – 8 ते 10 व्यक्तींसाठी

    तयारीसाठी लागणार वेळ – 

    सगळ्या शेंगा सोलणे; वांग्याच्या फोडी करणे; कंद, बटाटे चौकोनी तुकडे करणे; कांदा बारीक चिरून घेणे; नारळ खोवून घेणे; लसूण पात, मेथी निवडणे; मेथी बारीक चिरून घेणे – दीड ते दोन तास

    पाककृती करण्यासाठी – 30 मिनिटे

    एकूण वेळ – दोन ते अडीच तास

    हेही वाचा – Recipe : एकदम टेस्टी कुळीथ सूप

    मेथी भजीची कृती

    1. प्रथम चिरून स्वच्छ धुवून घेतलेल्या मेथीमध्ये बेसन, तांदूळ पीठ, मीठ, हिंग, हळद, तिखट, ओवा घालून भज्यांप्रमाणे भिजवावे.
    2. आता तेल कढईत व्यवस्थित तापवून घ्या.
    3. तापलेल्या तेलात वरील मिश्रणाचे छोटे गोळे करून भजी तळून घ्या आणि बाजूला ठेवा.

    भाजीची कृती

    1. मिक्सरच्या भांड्यात नारळ (पाव वाटी नारळ बाजूला काढून ठेवा), लसूण पात, मिरच्या, कोथिंबीर बारीक वाटून घ्या.
    2. आता मोठ्या कढईत मेथी भजी तळून घेतल्यानंतर जे तेल उरेल त्यातले साधारण 2 वाट्या तेल घ्या.
    3. गॅसच्या मध्यम आचेवर तेल तापल्यावर त्यात कांदा घालावा आणि मऊ होईपर्यंत परतावा, मग त्यात वाटलेले मिश्रण घालावे.
    4. मिश्रणाला तेल सुटायला लागले की, त्यात अनुक्रमे कंद, सुरती पापडी, वालाचे दाणे, तुरीचे दाणे, मटार, बटाटे, वांगी हे सगळे घालून छान परतून घ्या.
    5. परतून झाले की, त्यात पाणी घालून शिजवायला ठेवावे. शिजवताना त्यात गूळ, गोडा मसाला, तिखट घालावे.
    6. ही भाजी शिजायला अर्धा तास लागतो, त्यामुळे मधेमधे हे मिश्रण ढवळावे. सगळ्या भाज्या नीट शिजल्या पाहिजेत.
    7. सगळी भाजी छान शिजली की, मग त्यात तळून ठेवलेली भजी घालावी आणि परत हलक्या हाताने ढवळून गॅस बंद करावा. वाफ छान मुरू द्यावी.
    8. साधारणपणे पाच मिनिटांनी भजी तळून उरलेल्या तेलातील 1 डाव तेल भाजीवर घालावे. अतिशय चविष्ट आणि कमी तिखट असलेला उंधियो तयार.
    9. सर्व्ह करताना बाजूला काढून ठेवलेला नारळ आणि कोथिंबीर घालावी.

    हेही वाचा – Recipe : लज्जतदार टोमॅटो सूप

    विशेष टीप

    • उंधियोमध्ये सुरण, कच्ची केळी, रताळं पण घालतात.
    • काही कारणांनी लसूणपात नाही मिळाली तर, त्याऐवजी नुसता लसूण वापरला तरी चालेल.
    • सांबारासाठी वापरतात ते लहान कांदे उपलब्ध नसतील तर आपले नेहमीचे कांदे चिरून ते वापरलेत तरी चालेल.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026 फूड काॅर्नर

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    June 14, 2026 फूड काॅर्नर

    सुदाम्याकडून मित्रप्रेमाच्या पोह्याची ‘पुरचुंडी’ ते नागपूरचे तर्री पोहे!

    June 14, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    By Team AvaantarJune 17, 2026

    काकडीचे सांदण साहित्य तांदळाचा रवा – चार वाट्या चिरलेला गूळ – तीन वाट्या चांगली जून…

    शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”

    June 14, 2026

    सुदाम्याकडून मित्रप्रेमाच्या पोह्याची ‘पुरचुंडी’ ते नागपूरचे तर्री पोहे!

    June 14, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल लबाड वांगी किंवा फसवी वांगी!

    June 12, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    June 17, 2026

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    June 17, 2026

    Recipe : काकडीचे स्वादिष्ट सांदण अन् खमंग घावन!

    June 17, 2026

    Dnyaneshwari : खडकीं जैसें वर्षलें, कां आगीमाजीं पेरिलें 

    June 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 जून 2026

    June 17, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 331
    • अवांतर 190
    • आरोग्य 121
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 457
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 224
    • मैत्रीण 21
    • ललित 711
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    बंधनं… आयुष्याचं ऑक्सिजन!

    June 17, 2026

    हिरव्या बांगड्या

    June 17, 2026

    स्मोकर्स कफ… शरीराने दिलेली वॉर्निंग बेल!

    June 17, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.