मेष
या आठवड्यात नवीन वर्षाची सुरुवात आनंदात होईल. नोकरदारांच्या अंगावर नवीन जबाबदारी पडेल; अचानक लाभ होईल. मनाप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकेल. व्यावसायिक वर्गाची वसुली वाढेल; आर्थिक प्रश्न सुटतील. कुणी भागीदार असल्यास त्याच्या मतांचा विचार जरूर करा; फायदा होईल. महिलांच्या बाबतीत कुटुंबात आनंदी वातावरण राहील; आनंदवार्ता समजतील. विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवू नये; उगाच मित्र–मैत्रिणींबरोबर भटकू नका; नियोजित कामे पूर्ण करावीत.
वृषभ
या आठवड्यात सकारात्मक घटना घडतील. महत्त्वाचे काम मार्गी लागेल; उत्साह वाढेल. नोकरदारांना पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे; अनपेक्षित घटना घडतील. व्यावसायिक वर्गाकरिता आनंदाची बाब म्हणजे, धंद्यात वृद्धी होईल; स्थिती समाधानकारक राहील; नवीन करार होतील. महिलांनी वेळेचे नियोजन करावे; घरात पाहुणे येतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल; शिक्षक खूश राहतील; कौतुक होईल.
मिथुन
या आठवड्यात हितशत्रूंचा त्रास होऊ शकतो. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. नोकरदारांच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल; सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन उपक्रम यशस्वी होतील. व्यावसायिक वर्ग नवीन करार करेल; परदेशात व्यवसाय करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल आणि त्यानिमित्ताने परदेशी प्रवास होईल. महिलांची साहित्यिक क्षेत्रात प्रगती होईल; त्यांच्या कथा-कवितेची मासिकासाठी निवड होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करता येईल; सांघिक खेळात चमकू शकाल.
कर्क
या आठवड्यात कौटुंबिक जीवन आनंदी राहील; विवाहयोग्य तरुण, तरुणींचे विवाह ठरतील. नोकरदारांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे; आधी दिलेल्या मुलाखतीचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल. व्यावसायिक वर्गाला नवीन गुंतवणूक करता येईल; भागीदाराबरोबर गैरसमज होण्याची शक्यता आहे. तुमची बाजू स्पष्ट बोला. महिलांचा कुटुंबाबरोबर प्रवास होईल; परिवारासोबत छान वेळ घालवाल. विद्यार्थ्यांनी वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे; स्पर्धा करू नका.
सिंह
येता आठवडा मिश्र घटनांचा काळ आहे. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे; वैयक्तिक मोठे लाभ संभवतात. व्यवसायिक वर्गाला परदेशी जाण्याची संधी मिळेल; नवीन प्रोजेक्ट मिळतील; जुने संबंध नव्याने प्रस्थापित होतील. मात्र, कोणत्याही करारातील कायदेशीर बाबी नीट तपासून घ्या. महिलांनी संवाद साधून प्रश्न व्यवस्थित मांडावा आणि त्यातून मार्ग काढावा. विद्यार्थ्यांनी काम नीटनेटकेपणाने करावीत; प्रोजेक्ट वेळेवर सबमिट करावा.
हेही वाचा – Thanks… कोणी कोणाला म्हणायचं!
कन्या
या नवीन वर्षात मित्र- मैत्रिणी आणि कुटुंबासोबत लांबच्या सहलीचे नियोजन कराल. चैन आणि करमणुकीवर खर्च होईल. नोकरदारांनी कुठल्याही कागदपत्रांवर डोळे बंद करून सही करू नये; सर्व नीट वाचून, समजून कार्यवाही करावी. व्यावसायिक वर्गाला खरेदी, विक्रीतून चांगला लाभ होईल; अधिकाराची कक्षा वाढेल; सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान देऊ शकाल. महिलांना माहेरची मंडळी भेटतील; लग्नकार्यात सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांचे कौतुक होईल; जनसंपर्क वाढेल.
तुळ
या आठवड्यात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ नोकरदारांना मिळेल; अनपेक्षित घटना घडतील; कदाचित सहकाऱ्यांचे काम करावे लागू शकते. व्यावसायिक वर्गाकडून प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविला जाण्याची शक्यता आहे; नवीन ऑर्डर मिळतील; हाताखालील लोक खूश राहतील; तुमच्या प्रभावी बोलण्याने कामे पूर्ण होतील. महिलांच्या बाबतीत कुटुंबातील तरुण, तरुणींचे प्रश्न सुटतील. मेहनतीशिवाय पर्याय नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे.
वृश्चिक
हा आठवडा अतिशय अनुकूल आहे. अडकलेले पैसे मिळतील. नोकरदारांनी अतिआत्मविश्वास टाळावा; बेपर्वाईने उत्तर देऊ नका, अडचणीत येऊ शकता. व्यावसायिक वर्गाने वेगावर नियंत्रण ठेवावे; लाभाचे सौदे होतील; आनंदी राहाल. महिलांना मैत्रिणींसोबत सहलीला जाता येईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे; कुसंगत टाळावी.
धनु
या आठवड्यात शुभग्रहाची साथ मिळेल; दिलासा मिळेल. नोकरदार अपुरी राहिलेली कामे पूर्ण करू शकतील; वेळेचे नियोजन करा. राहत्या घरासंबंधित प्रश्न सुटतील. व्यावसायिक वर्गाला अडकलेले पैसे मिळतील; बिघडलेली नाती पूर्वीसारखी होतील. महिलांना घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल; काही कामे अपूर्ण राहू शकतात. विद्यार्थ्यांनी स्वतःची कामे स्वतः करावीत; कोणावर अवलंबून राहू नये.
मकर
या आठवड्यात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांच्या कामावर वरिष्ठ खूश राहतील; कार्यक्षेत्रात सर्वांशी विनयाने वागा; अतिरेक टाळा. व्यावसायिक वर्गाने हाताखालच्या लोकांशी सांभाळून वागावे; कोणतीही बेधडक आश्वासने देऊ नयेत. महिलांना परदेशी जाण्याचा योग आहे; नवीन ओळखी होतील. विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्याची संधी मिळेल.
कुंभ
हा आठवडा आरामदायक आहे. राहिलेली कामे पूर्ण करू शकाल. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी उपलब्ध होतील; त्याचा उपयोग करावा, आर्थिक लाभ होईल. व्यावसायिक वर्गाला समाजात मान, सन्मान मिळेल; नवीन राजकीय ओळखी होतील; या ओळखीचा व्यवसायात उपयोग होईल. महिलांना कला क्षेत्रात काम करता येईल; आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात संधी मिळतील; त्याचा फायदा घ्या.
हेही वाचा – योग आणि आयुर्वेद या एकाच वैदिक ज्ञानाच्या शाखा
मीन
या आठवड्यात निर्णय अचूक ठरतील. नोकरदारांना रूटीन कामाचा कंटाळा येईल; इतरांना मदत कराल. नवीन मित्र जोडाल. व्यावसायिक वर्गाने व्यवस्थापनविषयक प्रदर्शनात सहभागी व्हावे, नक्की फायदा होईल; व्यवसाय वाढेल. महिलांनी वाद–विवाद टाळावेत; आर्थिक व्यवहार जपून करावेत. विद्यार्थ्यांनी स्वतःला न समजणाऱ्या गोष्टींपासून दूर राहावे; अनावश्यक जोखीम घेऊ नये.


