Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » पायाचे मनोगत!
    ललित

    पायाचे मनोगत!

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 19, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, पाय_आत्मकथा, कळस,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    शैलजा पुरोहित

    “आधी कळस मग पाया रे।” गाण्यातील ही उफराटी रीत पाहून मला खरंतर हसूच आलं. त्या कवीचं तरी काय चुकलं? सध्याच्या युगाची हीच रीत आहे, सर्वजण दिमाखात उभ्या असलेल्या, चमचमणाऱ्या कळसाला भुलतात. ज्या भक्कम पायावर तो कळस उभा असतो, तो मात्र त्यांच्या खिजगणतीतही नसतो. कळस डळमळू लागला की, प्रत्येकाला वाटतं याचा पाया पक्का असायला हवा होता.

    ज्याच्यावर एखादी गोष्ट स्थिरपणे उभी राहते तो पाया! आपल्या शरीराचा भार नि तोल सांभाळतात ते पाय! आम्हां दोघांमध्ये एका कानाचा फरक आहे. आमचं स्वरूपही वेगळं आहे, तरी आम्हा दोघांचे कार्य एकच आहे. आधारभूत होणं आणि स्थैर्य देणे!

    आपण ज्या घरात राहतो त्याचंच बघा ना. जेवढी इमारत उंच, तेवढा पाया आधी खोल खणला जातो. त्यात खडी, गिट्टीचा भराव घालून तो पक्का केला जातो. मग त्यावर इमारत बांधली जाते, म्हणजेच इमारत बांधण्याची ठराविक पद्धत आहे. तद्वतच ज्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व घडणार असतं, जीवनाला आकार येणार असतो, प्रगती होणार असते, त्या शिक्षणाचा पाया देखील मजबूत असायलाच हवा. तो पाया भरायचा असतो जिद्द, मेहनत नि अभ्यासू वृत्तीने. निरंतर शिक्षण साधनेने तुमच्या यशाच्या कळसाचा मार्ग सुलभ होतो. पूर्वी घोटून घेतलेल्या परवच्यामुळे आजही तोंडी गणितं पटकन सुटतात. घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या युगात घोकंपट्टीला वेळ आहेच कुठे? मग कॅलक्युलेटरचा उपयोग केला जातो. कधी रेडीरेकनरची मदत घेतली जाते, धडा स्वत: समजून, जाणून घेऊन उत्तर स्वतःच्या भाषेत लिहितो, त्याचं समाधान काही औरच असतं. समजा कधी पाय दुखावला गेला, कुबड्या घेऊन काही काळ चालण्याशी वेळ आली तर, ते नकोस होतं. स्वतःच्या पायावर सहजपणे चालणं, धावणं याचं समाधानही तसंच असतं.

    खडतर परिस्थितीतून एखादा मुलगा स्वकर्तृत्वावर मोठा होतो, तेव्हा त्याचे माता-पिता अभिमानाने सांगतात, “स्वतःच्या पायावर तो उभा राहिला. लाथ मारेन तिथे पाणी काढेन, असा त्यांचा बाणेदारपणा आहे.” आपल्याला आदरणीय असणारी व्यक्ती आपल्या घरी आली तर, आपण सहजपणे म्हणून जातो, “आपल्या चरणधुळीने माझं घर पावन झालं.” श्रीरामासारख्या अवतारी पुरुषाची कथाच न्यारी। त्याने पदस्पर्शाने उद्धरली अहिल्या नारी। असं म्हणतात की, स्त्रिच्या लत्ताप्रहराने अशोक वृक्ष बहरून येतो. किती रसिक हा वृक्ष नि किती नाजूक असावा तो प्रहार!

    राजकारण्यांची बाचाबाची असो नाहीतर, मुलांची मारामारी, सगळेच उपहासाने म्हणतात, कसली ही गद्धेलाथाळी! गाढव ओझेवाहू, मान्य. पण त्याच्या पायाची अशी थट्टा का? त्याचे पाय स्थिर, ठाम नसतील तर, लडखडत्या पायांनी का तो तुमची ओझी वाहू शकणार आहे? पूर्वी राजे-महाराजे देशद्रोह्याला, राजद्रोह्याला हत्तीच्या पायाखाली देण्याची शिक्षा फर्मावत. अशा कामासाठी माझा उपयोग व्हावा, याची मला खंत वाटायची. माझा मीच विचार करू लागलो तेव्हा आणवलं की, गुन्हेगाराला शासन करण्याचं कर्तव्यच करत होतो मी. ती बाब खेदजनक नाहीत मुळी,

    यशाच्या पायऱ्या भराभर चढून सुद्धा मनुष्य जेव्हा निगर्वी राहतो, सर्वाशी मिळून-मिसळून असतो, तेव्हा लोक कौतुकाने म्हणतात, यशाचा कळस त्याच्या हाती आहे, पण त्याचे पाय मात्र जमिनीवर स्थिर आहेत. त्याच्या पायाबद्दल एकापरीने माझेच ते कौतुक ऐकताना मी मनोमनी तृप्त होतो. संस्कृतात एक सुभाषित आहे, त्याचा गोषवारा असा आहे की – हाताचं भूषण दान आहे. चांगली वचनं ऐकणं हे कानाचं भूषण आहे. त्याला जोडून मी म्हणेन, काळाच्या गतीबरोबर चालताना ठाम चालणं, वाकडी वाट न करणं, हे पायाचं भूषण आहे.

    आपला पाय चुकून दुसऱ्याला लागला तर, आपण चटकन त्या व्यक्तीला नमस्कार करतो. मग जी धरित्री आपला भार सोसते, पायावर स्थिर उभं राहण्यासाठी मदत करते तिला सकाळीच उठून उभे राहण्याआधी, “पादस्पर्श क्षमस्व मे।” असं म्हणून तिला वंदन करणे ही आपली संस्कृती आहे. भावपूर्ण श्रद्धेने देवाच्या चरणावर आपण नतमस्तक होतो, त्यावेळी वेगळीच अनुभूती आपल्याला आपली स्थिती “अंगी रोमांच उठे। लोचनी नीर दाटे।” अशी होते.

    असं आहे हे पद महात्म्य!

    रसिक हो, माझं मनोगत मी मोकळेपणाने तुम्हाला सांगितलं. माझं हे मनोगत तुम्हाला कसं वाटलं? तुमचं मत ऐकायला उत्सुक असणारा –

    तुमचा नि सर्वांचाच आवडता, सदैव असणारा

    पाय!

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026 ललित

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026 ललित

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    By सतीश बर्वेMarch 23, 2026

    खरंच काही व्यक्तींचा सहवास, अगदी थोडा वेळ का असेना, पण आपल्याला आपल्या नकळत आनंदी आणि…

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    रडणाऱ्या आरूला राम समजावत होता, तेवढ्यात सिया आली…

    March 22, 2026

    भार्गवने रुंजीला लग्नासाठी प्रोपज केलं, पण…

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn