Saturday, March 7, 2026

banner 468x60

Homeशैक्षणिकEducation : शिक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मक हवा

Education : शिक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मक हवा

डॉ. किशोर महाबळ

सर्व विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. शाळेतील त्यांचे अध्यापन, विद्यार्थ्यांशी वर्तणूक, विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ओळखण्याची क्षमता, विद्यार्थ्यांच्या विकासातील योगदान, शिक्षणाबद्दल तसेच शिक्षकांच्या भूमिकेबद्दलचे विचार, वर्गातील आणि शाळेतील वर्तन, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, बौद्धिक क्षमता आणि शैक्षणिक गुणवत्ता या सर्व बाबीं शिक्षकांची शैक्षणिक व्यवस्थेतील भूमिका निर्धारित करतात. शिक्षकाचा हा दृष्टिकोन जर नकारात्मक असेल तर, तो वर्ग घेण्यात टाळाटाळ करेल, फक्त परीक्षेपुरते शिकवेल. अभ्यास करणे टाळेल. विद्यार्थ्यांना मारहाण करणे, हा शिस्त लावण्याचा एकमेव मार्ग आहे, असे मानेल. विद्यार्थ्यांमधील गुण शोधण्याऐवजी त्यांच्यावर टीका करण्यात समाधान मानेल. असा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचे अत्यंत नुकसानच करेल. शिक्षणव्यवस्था डबघाईला नेईल.

सकारात्मक दृष्टिकोन असलेला शिक्षक काय करेल, याचा विचार करूया. असा शिक्षक वर्गातील सर्व विद्यार्थ्याचे शिक्षण हे त्यांच्या बौद्धिक आणि सर्वांगीण उत्कर्षासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेऊन आपला नियोजित विषय सर्व विद्यार्थ्यांना उत्तमरित्या, रंजकपणे आणि सर्जनशीलपणे शिकवण्याचा पुरेपुर प्रयत्न करेल. विषय चांगला शिकविता येण्यासाठी सातत्याने अध्ययन करून आपले विषयाचे ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करेल. तो नियमितपणे वर्ग घेईल. आपल्या विषयासंबंधी नवी पुस्तके वाचेल. आपले ज्ञान अद्ययावत राहील यासाठी प्रयत्न करेल. वर्गात मुलांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देईल. दृकश्राव्य माध्यमांचा पुरेपूर उपयोग करेल.

हेही वाचा – शोध शाळेतील वक्त्यांचा!

सकारात्मक भूमिका असलेला शिक्षक आपल्या वर्गात देशाची भावी पिढी बसलेली असून हे सर्व विद्यार्थी भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत, असे मानेल. सर्व विद्यार्थ्यांमध्ये उपजतच काहीना काही निसर्गदत्त अशा विशेष क्षमता असतात हे लक्षात घेऊन आपल्या विद्यार्थ्यांमधील क्षमता शोधण्याचा आणि त्या क्षमतांचा विकास होण्यासाठी त्यांना शक्य तेवढे सहकार्य, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देईल. तो प्रत्येक विद्यार्थ्याला सारखेच महत्त्व देईल; सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देईल; त्यांच्यात भेदभाव करणार नाही. विद्यार्थ्याचा अपमान करणार नाही. शिस्त लावेल पण, त्यासाठी मारहाण करणार नाही. आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे उपक्रम घेईल. जीवनातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक अशा गोष्टी शिकण्यास प्रोत्साहन देईल. त्यांनी यशाची शिखरे पादाक्रांत करावी, अशी अपेक्षा करेल. त्यांच्या क्षमता आणि गुणवत्तेनुसार त्यांना आयुष्यात काय काय करता येऊ शकेल, हे सांगेल. त्यांच्याकडून अध्ययनाची अपेक्षा करेल. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवावे, अशी अपेक्षा करेल.

शिक्षणाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास घडवून आणता येतो. शिक्षणव्यवस्थेचे तेच उद्दिष्ट असले पाहिजे, असे सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या शिक्षकाचे मत असेल. विद्यार्थ्यांच्या विकासात शिक्षक मोलाचे योगदान देऊ शकतात, हे लक्षात घेउन शिक्षक म्हणून आपले कर्तव्य जबाबदारीने निष्ठापूर्वक पार पाडेल. तो वर्गात, शाळेत तसेच शाळेबाहेर अत्यंत जबाबदारीने वागेल. ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडता यावी, यासाठी आपल्या स्वत:च्या व्यक्तिमत्व विकासाकडेही लक्ष देईल. आपली शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत व्हावी, यासाठी सतत प्रयत्न करेल. हे सारे पगार जास्त मिळावा एवढ्याच अपेक्षेने न करता आपल्या आनंदासाठी करेल. आनंदी राहण्यासाठी त्याला दारू, तंबाखूचे व्यसन करावे लागणार नाही.

हेही वाचा – कथालेखक आणि कथाकथनकारांचा शोध

साहित्य, संगीत, कला, वाचन, खेळ, छंद यातून आपले जीवन समृद्ध करण्यास तो प्राधान्य देईल. त्याच्या मित्रमंडळात जीवनाच्या विविध क्षेत्रांत लक्षणीय कार्य केलेल्या व्यक्तिंचा समावेश असेल. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात विविध कारणांनी व्यक्तिमत्व विकासाची, अध्ययनाची संधी न मिळालेली व्यक्ती शिक्षक झाल्यानंतर जर आपल्या व्यक्तिमत्व विकासाकडे आणि अध्ययनाकडे खूप लक्ष देऊ लागली तर, तिच्यातही सकारात्मक दृष्टिकोन आहे, असेच म्हणता येईल. शिक्षकांचा असा दृष्टिकोन असेल तर, ते स्वयंप्रेरणेनी कार्य करतील. समृद्ध आणि समाधानी जीवन जगतील… त्यांचे विचार, वर्तन हे आपोआपच विद्यार्थ्यांना आणि समाजाला मार्गदर्शक होईल. असा सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या शिक्षकांची संख्या जसजशी वाढत जाईल, तसतशी आपली शिक्षणव्यवस्था विकसित आणि समृद्ध होत जाईल.

(‘सर्वांसाठी सर्वोत्तम शिक्षण!’ पुस्तकातून साभार)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!