मागील दोन लेखांत आपण निरामय मानसिक आरोग्य आणि निरामय आरोग्यासाठी आहार-विहार या विषयांच्या विविध पैलूंबद्दल सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास या विषयातील समाविष्ट घटकांविषयी जाणून घेणार आहोत. आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरामय ठेवायचे असेल तर योगाभ्यास हा एकमेव सर्वोत्कृष्ट प्रभावी मार्ग आहे.
योग ही एक जीवनशैली असून त्यामध्ये शरीराबरोबर मनाचाही विचार केला आहे. योगाभ्यास करण्यासाठी मुख्यत्वेकरून खालील घटकांचा समावेश करता येईल.
हेही वाचा – निरामय मानसिक आरोग्य
1. योगाभ्यासाचा परिचय
योगाचा उद्देश आणि व्याप्ती, अष्टांग योग, व्यायाम आणि योगासने यातील फरक आणि नियमित योगाभ्यासाचे फायदे.
2. योगाभ्यासाची पूर्वतयारी
योगाभ्यास कोणी करावा? महिला आणि योगाभ्यास. योगाभ्यासाच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाचे मुद्दे व विशेष सूचना.
3. योगाभ्यासाचा आरंभ
आत्मजाणीव आणि आरोग्य संकल्प करून योगाभ्यासाचा श्रीगणेशा.
ओंकार जप, प्रार्थना : गुरुवंदना, श्वसनमार्गशुध्दी : कृती आणि फायदे.
4. सूक्ष्म व्यायाम आणि पूरक हालचाली
बैठक स्थितीतील सूक्ष्म व्यायाम तसेच दंड स्थितीतील पूरक हालचाली : कृती व फायदे.
5. श्वसन अभ्यास
श्वसनक्रिया, श्वसन प्रकार – संथ, दीर्घ आणि जलद श्वसन : कृती आणि फायदे.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक…
6. कपालभाती अभ्यास
कपालभाती कृती आणि फायदे. दीर्घ, मध्यम आणि जलद कपालभाती.
7. प्राणायाम अभ्यास
प्राणायामाची आवश्यकता, पूर्वतयारी आणि विविध प्रकार : कृती आणि फायदे.
8. सूर्यनमस्कार अभ्यास
सूर्यनमस्कारासंबंधी महत्त्वाचे मुद्दे, कृती आणि फायदे. खुर्चीवर बसून सूर्यनमस्कार.
9. योगासने अभ्यास
अर्थ आणि महत्त्वाचे मुद्दे
शयन, विपरीत शयन, बैठक आणि दंड स्थितीतील योगासने : कृती आणि आरोग्य लाभ.
10. योगनिद्रा अभ्यास
अर्थ, महत्त्वाचे मुद्दे, विविध टप्पे आणि फायदे.
11. ध्यान अभ्यास
अर्थ, महत्त्वाचे मुद्दे, विविध पद्धती : कृती आणि फायदे.
12. आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यास
विविध हस्त मुद्रा : कृती आणि आरोग्य लाभ. हाताच्या बोटांचे सूक्ष्म व्यायाम आणि आरोग्य लाभ.
13. योगाभ्यास सराव
नियमित दैनंदिन योगाभ्यास सराव. उपलब्ध वेळेनुसार योगाभ्यासातील विविध पर्याय. विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी योगाभ्यास.
हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी आहार-विहार
14. व्याधी-विकारांनुसार योगाभ्यास
शरीरातील विविध व्याधी-विकारांनुसार योगासने, प्राणायाम आणि हस्त मुद्रा.
अशा रीतीने आपण योगाभ्यास या विषयातील समाविष्ट घटकांची माहिती घेतल्यानंतर सहजी लक्षात येणारी बाब म्हणजे यावर यथायोग्य मार्गदर्शन खरोखरच आवश्यक आहे. जीवनशैलीत योगाभ्यासाचा समावेश करून नियमित दैनंदिन योगाभ्यास केल्यास निरामय आरोग्य प्राप्ती खचितच सुकर होईल.
या संदर्भात इथे यथार्थ उल्लेख करावासा वाटतो की, निरामय आरोग्य संकल्पनेतील माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ या पुस्तकात योगाभ्यासाच्या वरील समाविष्ट घटकांवर नित्य जीवनात उपयुक्त असे सर्वांगीण, सर्वसमावेशक सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे.
क्रमशः


