Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, March 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फूड काॅर्नर»Kitchen Tips : बटाटेवडे, सामोसे, उडीदवडे बनवताय, मग हे वाचा!
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : बटाटेवडे, सामोसे, उडीदवडे बनवताय, मग हे वाचा!

    Team AvaantarBy Team AvaantarDecember 20, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, बटाटेवडे, उडीदवडे, सामोसे आणि कचोरी, सँडविच
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये बटाटेवडे, सामोसे, उडीदवडे बनविण्याच्या टिप्स पाहूयात.

    • भज्याचे पीठ पाण्यात कालवण्यापूर्वीच त्यात खूप फेसून तेल घालावे. हळदीऐवजी खाण्याचा पिवळा रंग चिमूटभर घातल्यास भज्यांना रंग छान येतो. फेसून मोहन घातल्यामुळे भजी खुसखुशीत होतात. बटाटेवड्याच्या पिठाला हीच कृती करावी.
    • सँडविचेस करताना ब्रेडच्या कडा सुरीने न कापता कात्रीने कापाव्यात. म्हणजे कडा पातळ आणि कमी वाया जातात. कापलेल्या कडा उन्हात कडक वाळवून मिक्सरमधून काढून कटलेट्ससाठी चुरा वापरावा.
    • इडली रव्याचे एक पाकीट घ्यावे. त्यातील रवा सांजा करतो, त्याप्रमाणे भाजून घ्यावा आणि नंतर नेहमीप्रमाणे फोडणी करून, त्यात रवा, कढीलिंब, उडदाची डाळ किंवा मूगडाळ घालून जरुरीप्रमाणे तिखट-मीठ-पाणी घालावे आणि चांगली वाफ आणावी, म्हणजे उप्पीट तयार.

    हेही वाचा – Kitchen Tips : सुरळीच्या वड्या, खमंग कांदा भजी, स्वादिष्ट दहिवडे…

    • लहान मुले पालेभाजी खाताना कंटाळा करतात, म्हणून घरी ओव्हनमध्ये ब्रेड बनवताना शेपू किंवा मेथी अशा पालेभाज्या चिरून घालाव्यात व मसाला ब्रेड करावा.
    • उडीदवडा करताना मसाल्यासह वाटलेला गोळा घेऊन प्लॅस्टिक पेपरवर ठेवावा. वडा थापताना त्यावर ओल्या नारळाचे (खोबऱ्याच्या) अर्धा इंची दोन तुकडे खालीवर लावावेत. त्यामुळे वडे तळताना तेल कमी लागते.
    • सामोसे, कचोरी खुसखुशीत बनवण्यासाठी मैदा भिजविताना त्यात (अर्धा किलो मैद्याला) एक चमचा दही आणि एक चिमूटभर बेकिंग पावडर घालावी.
    • खमंग ढोकळा करताना आदल्या दिवशी रात्री ताकात बसेल एवढे डाळीचे पीठ घालावे. दुसऱ्या दिवशी ढोकळा करताना पिठाच्या निम्मा रवा घालावा. ढोकळा चांगला स्पंजप्रमाणे होतो.
    • पुऱ्या किंवा मटार करंज्यांच्या पारीसाठी कणीक भिजवताना थोडा रवा तेलावर फुलवून घेऊन त्यात घातल्यास पुऱ्या किंवा करंज्या खुसखुशीत होतात.

    हेही वाचा – Kitchen Tips : केळ्याचे वेफर्स, पपईची भजी, हरभऱ्याची तळलेली डाळ…

    • बटाटेवडा तयार करत असताना जे बेसन पीठ कालवून घेतो, त्यात थोडा एक-दोन स्लाइस ब्रेडचा कडा काढलेला मऊ भाग कुस्करून घातल्यास वडा कुरकुरीत तर होतोच आणि वरचा थरही जाडसर होतो.
    • ब्रेड-चटणी सँडवीच करताना चटणीमध्ये थोडेसे लोणी मिसळावे आणि मग ती ब्रेडच्या स्लाइसला लावावी म्हणजे वेगळे लोणी लावायचा वेळही वाचतो, शिवाय चटणीला वेगळी चव येऊन लोण्याची बचत होते.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    By Team AvaantarMarch 15, 2026

    माधवी जोशी माहुलकर हमस आणि फलाफल यांचे भारतीय पाककृतींशी खूप जवळचे नाते आहे. घटक आणि…

    Recipe : खमंग बाकर वड्या (पुडाच्या वड्या)

    March 12, 2026

    Recipe : गॅसची बचत करणारा कच्चा चिवडा!

    March 11, 2026

    Kitchen Tips : व्हेजिटेबल सूप, मेथीची उसळ, गाजराची कोशिंबीर करताना वापरा या टिप्स

    March 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn