आराधना जोशी
साहित्य
- मध्यम आकाराचे हिरवे टोमॅटो – 3 ते 4
- तुरीची डाळ – 1/3 वाटी
- हिरव्या मिरच्या – 3 ते 4
- लसूण पाकळ्या – 3 ते 4
- धणे पावडर – 1 टीस्पून
- गरम मसाला – 1 टेबलस्पून
- बारीक चिरलेली कोथिंबीर – अर्धी वाटी
- शेंगदाणे – 3 ते 4 टेबलस्पून
- मीठ – चवीनुसार
- तेल – 2 टीस्पून (फोडणीसाठी)
- फोडणीसाठी – जिरे, मोहरी आणि हळद
- पाणी – 2 ते 3 कप गरम (किंवा भाजी सरसरीत होण्यासाठी लागेल इतके)
पुरवठा संख्या : 2 व्यक्तींसाठी
तयारीस लागणारा वेळ : 10 मिनिटे
शिजवण्याचा वेळ : 10 मिनिटे
एकूण वेळ : 20 मिनिटे
हेही वाचा – Recipe : लो कार्ब वेजी टोस्ट
कृती
- डाळ स्वच्छ धुवून घ्या.
- टोमॅटोच्या थोड्या मोठ्या आकाराच्या फोडी करून धुतलेल्या डाळीत घाला.
- यात 1 कप पाणी घालून डाळ कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून शिजवून घ्या.
- एका कढईत शेंगदाणे भाजायला ठेवावेत. ते नीट भाजल्यावर एका प्लेटमध्ये काढून ठेवा. त्यानंतर मिरच्या भाजून घ्या.
- शेंगदाणे गार झाले की, ते व्यवस्थित सोलून घ्या.
- मिरच्या, शेंगदाणे, लसूण पाकळ्या, गरम मसाला, धणेपावडर आणि अर्धी वाटी कोथिंबीर मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक वाटून घ्या.
- एकदा जाडसर वाटून झाले की, नंतर अगदी थोडे पाणी घालून हे मिश्रण बारीक वाटून घ्या.
- आता एका जाड बुडाच्या कढईत तेल तापायला ठेवा. तेल तापले की, जिरे, मोहरी, हळद घालून फोडणी करा.
- त्यात वाटलेला मसाला घालून परतायला ठेवा. मंद आचेवर साधारण 4-5 मिनिटे मसाला परतत राहा.
- वाटलेला मसाला नीट परतला गेला की, कुकरमध्ये शिजवलेले डाळ-टोमॅटोचे मिश्रण त्यात घाला.
- सुरुवातीला साधारण एक कप गरम पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिश्रण ढवळून त्याला एक उकळी आणा.
- आणखी थोडे सरसरीत हवे असेल तर उकळण्यापूर्वीच लागेल इतके पाणी घाला.
- उकळी आली की, गॅस बंद करून वरून कोथिंबीर घाला.
- वाफाळणारा भात किंवा गरम भाकरी, पोळी बरोबर ही भाजी अप्रतिम लागते.
विशेष आहार माहिती : शाकाहारी, प्रोटिनयुक्त
हेही वाचा – Recipe : खानदेशी पद्धतीची शेव भाजी
टिप्स
- टोमॅटो घेताना नीट मोठे रसदार बघून घ्यावेत.
- ही भाजी थोडी तिखट केली तरच छान लागते.
- घरी शेंगदाण्याचे कूट तयार असेल तर दाण्यांऐवजी कूटही वापरू शकता.
- यात गूळ, साखर असा गोडवा देणारे पदार्थ घालत नाहीत. पण तुम्हाला गोडसर चवीची सवय असेल तर, दीड टीस्पून साखर यात घालू शकता.
- ही भाजी रसभाजीसारखी सरसरीत ठेवा, खूप दाट किंवा आमटीसारखी पातळ करू नका.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.


