Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 04 डिसेंबर 2025
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 04 डिसेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarDecember 4, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 04 डिसेंबर 2025; वार : गुरुवार
    • भारतीय सौर : 13 अग्रहायण शके 1947; तिथि : चतुर्दशी, पौर्णिमा 08:37, 28:43; नक्षत्र : कृत्तिका 14:54
    • योग : शिव 12:34; करण : विष्टि 18:41
    • सूर्य : वृश्चिक; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:55; सूर्यास्त : 17:59
    • पक्ष : शुक्ल; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    दत्त जयंती

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – आजचा दिवस सकारात्मक उर्जेने भरलेला आणि खूप शुभ असेल. मन आनंदी असेल आणि कष्टाचे फळ मिळेल. प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. अचानक आर्थिक लाभामुळे मोठी रक्कम मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेच्या विक्रीतूनही मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील.

    वृषभ – कामाच्या ठिकाणी कोणतेही काम संयम आणि शांततेने करावे लागेल. व्यावसायिकांचा दिवस सामान्य राहील. अनेक योजनांपैकी एखादी योजना आज पुढे सरकेल, ज्याचे भविष्यात महत्त्वपूर्ण फायदे मिळतील. मोठ्या प्रमाणात अनावश्यक खर्च होऊ शकतो. काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील. अन्यथा नुकसान होऊ शकते, ज्यामुळे  मानसिक ताण येऊ शकतो.

    मिथुन – आजचा दिवस संमिश्र असेल. नवीन लोकांच्या भेटी होतील ज्याचा भविष्यात खूप फायदा होईल. आरोग्यात सुधारणा होईल, मात्र बाहेरचे खाणे-पिणे टाळावे. बेरोजगार जातकांना नोकरी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन अनुभवांचा फायदा होईल. नातेसंबंध गोड राहतील. जोडीदाराकडून भरपूर प्रेम आणि पाठिंबा मिळेल.

    कर्क – आजचा दिवस खूप चांगला आणि शुभ ठरू शकतो. नशिबाची खूप कृपा असेल, ज्यामुळे सर्व कामे लवकर आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होतील. फक्त बोलण्यावर संयम ठेवावा लागेल आणि इतरांवर उगाच चिडचिड करू नका. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळू शकते.

    सिंह – आजचा दिवस अनेक कामगिरींनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी सन्मान मिळू शकतो. करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसायात गुंतलेल्यांना चांगला नफा मिळू शकतो किंवा एखादा महत्त्वाचा आणि फायदेशीर करार मिळू शकतो. मात्र आज कोणालाही पैसे उधार देण्याचे किंवा सहकाऱ्याकडून वाहन उधार घेण्याचे टाळा.

    हेही वाचा – नाना आणि तीन मुलांच्या निराळ्या तऱ्हा

    कन्या – आजचा दिवस धावपळीचा असेल. तथापि, कोणत्याही महत्त्वाच्या कामात घाई करू नका. सारासार विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. नोकरदार व्यक्तींना आज चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात, ज्यामुळे चांगली बढती आणि चांगला पगार मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचे उत्पन्न वाढेल.

    तुळ – आजचा दिवस शांत आणि आरामदायी असेल. ज्यामुळे दिवसभर आनंदी वाटेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील, रखडलेले प्रकल्प पुन्हा वेग घेतील. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा दिवस अत्यंत योग्य असेल. नोकरदार जातकांना कामावर त्यांच्या कामाबद्दल प्रशंसा केली जाईल. सरकारी सेवेत असलेल्यांना काही चांगले काम मिळू शकते.

    वृश्चिक – आज तुमचा आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत होईल. कामावर नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. उत्पन्नात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात शांती आणि आनंद राहील.

    धनु – आज कोणत्याही कामात घाई करणे टाळा. आज ऊर्जा आणि उत्साह वाढेल. तुमच्यातील नेतृत्वगुणांमुळे कठीण कामेही सहजतेने पूर्ण करण्यास मदत होईल. आर्थिकदृष्ट्या दिवस खूप शुभ राहील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात गोडवा राहील. मात्र आज  कोणाशीही कठोरपणे बोलणे टाळावे.

    मकर – आजचा दिवस जबाबदारीने भरलेला असेल. परिश्रमपूर्वक आणि प्रामाणिकपणे काम कराल. कामाचा ताण जास्त असेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक थकवा येऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. इतरांना मदत करण्यात सक्रिय असाल. मात्र आज तब्येतीच्या कुरबुरी राहतील.

    कुंभ – उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळू शकतात, जे तुम्हाला लक्षणीय आर्थिक वाढीसाठी मदत करतील. घरात सकारात्मक वातावरण राहील, ज्यामुळे खूप आनंदी असाल. विवाह ठरविण्यासाठी आजचा दिवस खूप शुभ ठरू शकतो. व्यावसायिकांना चांगले कॉन्ट्रॅक्ट/ करार मिळू शकेल. आज कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

    हेही वाचा – विलोजब्रुकमधील वेदनांचे हुंकार

    मीन – नशीब तुमच्या बाजूने असेल. बेरोजगार आणि नोकरीच्या शोधात असलेल्यांना आज नोकरीची एखादी चांगली ऑफर मिळू शकेल, तर नोकरीत असलेल्यांना पदोन्नती मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मात्र आज कोणालाही पैसे उधार देऊ नका, कारण ते परत मिळणार नाहीत. आरोग्य चांगले राहील. दिवसभर मन आनंदी राहील.


    दिनविशेष

    ख्यातनाम अभिनेते शशी कपूर

    टीम अवांतर

    चित्रपट आणि नाट्यकलेशी निगडीत असणाऱ्या प्रसिद्ध कपूर घराण्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेते शशी कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे मूळ नाव बलबीर राज होते. त्यांचे वडील प्रसिद्ध अभिनेते पृथ्वीराज कपूर आणि मातोश्री रामसरनी कपूर होते. अभिनयकलेचा  आणि चित्रपटाचा समृद्ध वारसा शशी कपूर यांना घरीच लाभला. 1948 च्या राज कपूरनिर्मित आणि दिग्दर्शित आग या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेद्वारे करून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. 1951 मध्ये आलेल्या आवारा या चित्रपटात त्यांनी राज कपूर यांची कुमारावस्थेतील भूमिका वठवली. 1954 पर्यंत त्यांनी बालकलाकार म्हणून काही चित्रपटांत कामे केली. त्यानंतर ते त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटर या रंगभूमीशी निगडीत मंडळाशी जोडले गेले. अभिनेते सुनील दत्त यांच्या पोस्ट बॉक्स 999 या चित्रपटासाठी शशी कपूर यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून संधी मिळाली. त्यानंतर, 1961 पर्यंत गेस्ट हाऊस, दुल्हा-दुल्हन, श्रीमान सत्यवादी यासारख्या चित्रपटांतून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. 1961 सालच्या यश चोप्रा दिग्दर्शित बी. आर. चोप्रा निर्मित ‘धर्मपुत्र’ हा नायक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट. सत्तरच्या दशकात शशी कपूर यांच्या कारकीर्दीने चांगले वळण घेतले. काही चित्रपटांत नायक तर, काही चित्रपटांत एक सहनायक अशी त्यांची वाटचाल सुरू झाली. तब्बल 116 हिंदी चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. त्यापैकी 61 चित्रपटांतून ते नायकाच्या भूमिकेत चमकले. याशिवाय, काही इंग्रजी चित्रपटांतूनदेखील त्यांनी विविध भूमिका साकारल्या. 1975च्या दीवार या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. शशी कपूर हे केवळ एक चांगले अभिनेतेच नव्हते, तर एक व्यासंगी आणि कलासक्त, विद्वत व्यक्तिमत्त्व होते. स्वतःच्या ‘फिल्मवालाज’ या चित्रपट निर्मितीसंस्थेद्वारे त्यांनी आशयघन आणि दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. त्यात 1978च्या जुनून या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर कलयुग या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. याशिवाय, विजेता या चित्रपटाची देखील त्यांनी निर्मिती केली. 1986 च्या न्यू दिल्ली टाइम्स यासारख्या  वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 2011 साली पद्मभूषण तर 2015 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 4 डिसेंबर 2017 रोजी प्रदीर्घ आजाराने त्यांचे मुंबईत निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn