Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    विहिरीतला आवाज…

    June 16, 2026

    संकर्षण… आशेची पहिली परीक्षा

    June 16, 2026

    संशय

    June 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, June 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आम्ही दोघी…
    अवांतर

    आम्ही दोघी…

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 29, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, कथा, आठवण, मैत्रीण, दोघींची मैत्री, मैत्रीण रजनी, चुणचणीत रजनी, निर्वाज मनाची रजनी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    हिमाली मुदखेडकर

    कोणते नाते म्हणू हे, ना टाळणे ना गुंतणे

    का तरी माझे तुझे हे, सोबतीने चालणे…

    इयत्ता सहावीच्या मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही दोघी पहिल्यांदा भेटलो. तिच्याच घरी तिच्या घराची वास्तुशांत होती. मी आजीसोबत गेले होते. माझ्यापेक्षा दोनच वर्षानी मोठी होती ती… पण घरातील सगळी कामे अशी काही चटाचट करत होती की, मी पाहातच राहिले! स्वयंपाकघरापासून ते आला-गेला पाहुण्याचे आगतस्वागत… पूजेची तयारी… कुणाला काही हवे नको… सगळे एक हाती सांभाळले होते तिने.

    “रजनीSSS…हे कुठे ठेवलंय…?”

    “रजे… त्या अमुक माणसाला किती पैसे द्यायचे?”

    “रजनी डाळ कोणत्या डब्यातून घ्यायची?”

    “पूजेची पान-सुपारी कुठे ठेवली आहे?”

    “पंचपाळे भरून ठेवले का?”

    “दाराला तोरण लावले का?”

    प्रत्येकाच्या तोंडी हिचेच नाव…!

    एवढ्या लहान वयात इतक्या सराईतपणे सगळे हाताळणारी रजनी माझ्या बालवयात खरंच खूप आवडून गेली… सावळ्या रंगाची सडपातळ बांध्याची सरळ तेज नाक असणारी रजनी, तेव्हापासून कशी, कधी आणि किती माझी होत गेली… हे सांगताच येणार नाही.

    हेही वाचा – सुलू… हवी मायेची गुंतवणूक!

    कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील ती होती. त्यामुळे सामान्यतः असणारी आर्थिक चणचणीची झळ तिला लहान वयातच जाणवली होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत शिवणकाम करून आलेल्या पैशातून कुणाची तरी जुनी पुस्तके ती विकत घेत असे, शाळेच्या अभ्यासासाठी… ट्यूशन क्लास वगैरेची चैन तिला परवडणारी नव्हती!

    शाळेत शिकलेल्या आणि स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर ती दरवर्षी फर्स्टक्लास मिळवत असे. अतिशय मेहनती आणि कष्टाला मागे न हटणारी रजनी खूप स्वाभिमानी आणि मनाने निर्व्याज होती…

    तिच्या वयाच्या इतर मुलींकडे असणार्‍या उंची वस्तूंचा किंवा समृद्धीचा तिला कधी हेवा वाटला नाही. घरातील सर्वात थोरली असल्याने पाठच्या बहीण, भावांचे संगोपन ओघानेच तिच्याकडे आलेले. पण, म्हणून कसलीही ताईगिरी किवा दरारा नव्हता. सतत आपल्या माणसांसाठी झटत राहण्याची मात्र वृत्ती होती.

    कष्टाळू रजनीने मेहनतीच्या जोरावर सरकारी शिक्षण संस्थेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळवली आणि आता तिच्या आयुष्याला स्थैर्य अन् सांपत्तिक सुबत्ता लाभू लागली. मुळातच समाधानी वृत्ती असणार्‍या रजनीचे या काळातील रूप फारच आश्वासक आणि आधार देणारे वाटायचे मला! तिचा सल्ला नेहमी वास्तववादी आणि संयत असायचा आणि सांगणेही फारसे ठासून किंवा जाचक नसे… अतिशय सौम्य शब्दांत पण प्रभावी पणे ती सांगे!

    आम्ही दोघी एकमेकींच्या आयुष्यात खूप जास्त लुडबूडही नव्हतो करत आणि अगदीच अलिप्तही नव्हतो… प्रत्येक अडीअडचणीला, गरजेला न सांगता ती माझ्या पाठीशी उभी होती, मला हवा असणारा मानसिक आधार तिने कायम दिला…

    हेही वाचा – भाविकांचे श्रद्धास्थान पुण्यातील चतुःश्रृंगी देवस्थान

    तिचं असणं म्हणजे पिठात मिसळून जाणार्‍या मीठासारखं होतं. जे आपलं असणं फार दाखवत नाही, पण नसले की पदार्थ बेचव होतो!

    गेली किती तरी वर्षे आम्ही एकमेकींकडे जात-येत होतो… भेटत होतो… मागील वर्षी सुद्धा आमची नेहमीप्रमाणे भेट झाली… आणि का कुणास ठाऊक मी तिला म्हणाले, “मला तुला एक छान साडी घ्यायची आहे. तुझ्या पसंतीने…” तिने हसून उडवून लावले माझे म्हणणे… म्हणाली,

    “कशासाठी?.. आता ना काही कार्य ना प्रसंग?”

    पण मी हट्टाने घेऊनच गेले तिला… आणि घेतली तिच्यासाठी छान पिस्ता कलरची शिफॉन साडी! मला मनापासून समाधान वाटले… माझ्या सखीला सोबत नेऊन तिचे लाड करण्याची मला नव्हतीच मिळाली कधी संधी आजवर…

    ती ही खूश… मीही!

    पण मला अजिबात कल्पना नव्हती… ही साडी आणि ही भेट अखेरची असेल याची. आनंदी हसतमुख रजनी लपंडावातील भिडू सापडूच नये तशी अचानक गायब झाली! ध्यानीमनी नसताना 29 नोव्हेंबर 2024 रोजी ती गेल्याची बातमी आली… हार्ट अ‍टॅकचे निमित्त… आणि निर्मोही रजनी जवळच्या माणसांचे आयुष्य अळणी करून निघून गेली!

    ‘आत्ता होती…’ म्हणे तोवर ‘आत्ता नाहीशी झाली’!

    वर्ष उलटून गेले आज तरी माझे मन मानत नाही… असे वाटत राहते की, आत्ता येईल कुठून तरी आणि बसेल शेजारी… विचारेल मला, “बरी आहेस ना माय…?”

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    निसर्गाचा संयम आणि आपली जबाबदारी

    June 7, 2026 अवांतर

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    June 2, 2026 अवांतर

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    निसर्गाचा संयम आणि आपली जबाबदारी

    By माधवी जोशी माहुलकरJune 7, 2026

    कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची ‘धो-धो’ सुरुवात होते, पण आमच्या विदर्भात मात्र पावसाचे आगमन जरा…

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    June 2, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    पालक शाळा…. एक स्तुत्य आणि आवश्यक उपक्रम

    May 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    विहिरीतला आवाज…

    June 16, 2026

    संकर्षण… आशेची पहिली परीक्षा

    June 16, 2026

    संशय

    June 16, 2026

    ट्युबलाइट… एलसी

    June 16, 2026

    Dnyaneshwari : म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ती, इयें वोझीं नेघे मती

    June 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 जून 2026

    June 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 330
    • अवांतर 190
    • आरोग्य 120
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 456
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 223
    • मैत्रीण 20
    • ललित 710
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    विहिरीतला आवाज…

    June 16, 2026

    संकर्षण… आशेची पहिली परीक्षा

    June 16, 2026

    संशय

    June 16, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.