दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 26 नोव्हेंबर 2025; वार : बुधवार
- भारतीय सौर : 05 अग्रहायण शके 1947; तिथि : षष्ठी 24:01; नक्षत्र : श्रवण 25:32
- योग : वृद्धि 12:41; करण : कौलव 11:33
- सूर्य : वृश्चिक; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:50; सूर्यास्त : 17:59
- पक्ष : शुक्ल; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
चंपाषष्ठी / स्कंदषष्ठी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस कठोर परिश्रम आणि प्रगती दोन्ही घेऊन येणारा असेल. अनेक दिवसांपासून पूर्ण न झालेल्या कामांना गती मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. कौटुंबिक मतभेद दूर होऊ शकतात. फक्त लक्षात ठेवा, राग आज तुमचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो. संयम राखला तर दिवस तुमच्या बाजूने असेल.
वृषभ – हा दिवस वृषभ राशीसाठी आर्थिक आणि व्यावसायिक दोन्ही बाजूंनी दिलासा देईल. आज महत्त्वाची कामे पूर्ण करण्याच्या मनःस्थितीत असाल. जुन्या मित्राकडून, नातेवाईकाकडून किंवा सहकाऱ्याकडून अनपेक्षित मदत मिळू शकते. घरात शांती आणि समाधान राहील. मोठी खरेदी करण्याचा मोह होऊ शकतो, मात्र विचारपूर्वक खर्च करा.
मिथुन – मिथुन राशीच्या लोकांसाठी, संवाद कौशल्य विशेष उपयुक्त ठरेल. मीडियामध्ये काम करणाऱ्या, लेखन करणाऱ्या, रिपोर्टिंग करणाऱ्या, सोशल मीडियावर काम करणाऱ्या किंवा संभाषणावर आधारित काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस विशेषतः फायदेशीर आहे. तुमचे मत बैठकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. मित्रांकडूनही प्रशंसा होईल.
कर्क – दिवसाची सुरुवात काहीशी भावनिक होऊ शकते, परंतु एकंदरीत, आज चांगला दिवस असेल. कुटुंबाकडून पाठिंबा आणि भावनिक आधार मिळेल. एखाद्या जुन्या कामाचे किंवा समस्येचे निराकरण अचानक होऊ शकते. आज थकवा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो, म्हणून आराम करण्यासाठी वेळ काढा. नातेसंबंध अधिक दृढ होतील.
सिंह – आजचा दिवस तुमचा आत्मविश्वास वाढवेल. हाती घेतलेले कोणतेही काम चोखपणे पार पाडाल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे कौतुक केले जाईल. वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकेल. रखडलेला प्रकल्प किंवा संधी नवीन दारे उघडेल. संध्याकाळपर्यंत काही चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – सुनंदा अक्का अन् पेरूचं झाड…
कन्या – आज जबाबदाऱ्यांचा ताण असेल, पण त्या सहजतेने हाताळाल. कुटुंब किंवा मालमत्तेशी संबंधित बाबींमधून फायदा होऊ शकतो. कामात स्थिरता आणि प्रगती दिसेल. महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या किंवा करार आज पूर्ण होऊ शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करत असला तर, तो निर्णय आपल्याला अनुकूल ठरू शकतो.
तुळ – खूप काम असले तरी त्याचे व्यवस्थित नियोजन कराल. कष्टाचे फळ लगेच मिळेल. अनपेक्षित स्रोतांद्वारे मिळकत होईल. पैसे येतील, पण खर्चही वाढू शकतो, म्हणून संतुलन राखणे आवश्यक आहे. सहलीचे नियोजन करू शकता किंवा बाहेर जाण्याची संधी मिळेल. जुन्या ओळखीच्या व्यक्तीशी भेट देखील शक्य आहे.
वृश्चिक – सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. मित्र आणि सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. एक नवीन कल्पना मनात येईल, अमलात आणल्यास ती दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकते. दिवस साधा आणि उत्पादकतापूर्ण असेल. संभाषणात संतुलन राखा, छोट्या गोष्टीला मोठे बनवू नका.
धनु – हा दिवस नातेसंबंध आणि भागीदारीसाठी खूप चांगला आहे. जोडीदाराकडून भक्कम पाठिंबा मिळेल. कामात सुधारणा होण्यास सुरुवात होईल आणि तुमचा उत्साह वाढेल. महत्त्वाच्या निर्णयात अनुभवी व्यक्तीचा सल्ला खूप फायदेशीर ठरेल. जुने वाद मिटू शकतात. आज शांतता आणि मानसिक हलकेपणा जाणवेल.
मकर – मकर राशीच्या लोकांसाठी दिवस काहीसा दिलासा देणारा आणि उत्साहपूर्ण असेल. कामावर लक्ष केंद्रित करा, त्यातून अनेक पैलू जाणून घेता येतील. थोडा मानसिक थकवा जाणवेल, परंतु प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम मिळतील. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील. गुंतवणुकीच्या संदर्भात जुन्याची पुनरावृत्ती करणे फायदेशीर ठरेल.
कुंभ – आज नवीन ऊर्जा आणि नवीन दृष्टिकोन मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा योग्य काळ आहे. नशीब तुमच्या बाजूने असेल, तुमचे ध्येय लवकर पूर्ण करण्यास मदत करेल. सहलीची किंवा छोट्या प्रवासाची योजना देखील आखू शकता. अशक्य गोष्टींवर विचार करण्यात शक्ती खर्च करू नका, त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा.
हेही वाचा – वर्ध्यातील गोरस पाक म्हणजे स्वर्गीय सुख!
मीन – मीन राशीच्या लोकांना आज त्यांचे मन थोडे विचलित वाटेल, परंतु त्यांची सर्जनशीलता अतिशय उत्तम असेल. त्यामुळे लेखन, निर्मिती, विचार किंवा कला यामध्ये मोठा फायदा होईल. रिकाम्या वेळात आज काही रचनात्मक कार्य करू शकता. आरोग्याकडे लक्ष द्या. मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील.
दिनविशेष
धवल क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन
टीम अवांतर
भारतातील धवल किंवा दुग्ध क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1921 रोजी केरळ राज्यातील कोझिकोड शहरात झाला. वर्गीस यांनी मद्रास विश्वविद्यालयाची यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनीअरिंग) पदवी मिळविली. नंतर मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीतून मास्टर्सची पदवी मिळवून ते भारतात परतले. डेअरी इंजिनीअर म्हणून कुरियन 1949 ला आणंदच्या गव्हर्नमेंट रिसर्च क्रीमरीत पाच वर्षांच्या कालावधीसाठी रुजू झाले. कुरियन यांनी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात केलेल्या सहकारी दूध व्यवस्थेच्या अभ्यासाचा उपयोग ‘खेडा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रॉड्युसर्स युनियन लिमिटेड’ (KDCMPUL) म्हणजेच अमूलची बांधणी करण्यासाठी केला. भारत सरकारने 1965 साली नॅशनल डेअरी विकास बोर्डाची स्थापना केली. या बोर्डावर कुरियन यांची संस्थापक अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. ‘ऑपरेशन फ्लड’ ऊर्फ ‘धवल क्रांती’ नावाने प्रसिद्ध अशा या उपक्रमामुळे भारतातील दूध उत्पादन लक्षणीयरित्या वाढले. गुजरात सहकारी दूध विक्री महासंघाचा अमूल प्रकल्प आकाराला आल्यावर अल्प दूध उत्पादकांना न्याय मिळू लागला. कुरियन यांना प्रदान करण्यात आलेले प्रतिष्ठेचे पुरस्कार म्हणजे रामन मॅगसेसे पुरस्कार, रामन मॅगसेसे ॲवार्ड फॉर कम्युनिटी लीडरशिप, पद्मश्री, पद्मभूषण, कृषिरत्न पुरस्कार इत्यादी. आपल्या आठवणी आणि विचार कुरियन यांनी तीन पुस्तकांत नोंदवून ठेवल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांची नावे आहेत, ‘आय टू हॅड ड्रीम’, ‘द मॅन हू मेड द एलिफंट डान्स’ आणि ‘ॲन अनफिनिश्ड ड्रीम.’ 9 सप्टेंबर 2012 रोजी त्यांचे निधन झाले.


