Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : जी तुम्ही चित्त देयाल, तरी ब्रह्म मिया होईजेल…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : जी तुम्ही चित्त देयाल, तरी ब्रह्म मिया होईजेल…

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 19, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter ten, दहावा अध्याय, अध्याय दहावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.

    अध्याय सहावा

    हें असो कथा सांगें वेगीं । मग अर्जुन म्हणे सलगी । देवा इयें संतचिन्हें हन आंगीं । न ठकती माझां ॥139॥ एऱ्हवीं या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडें कीर अपुरा । परि तुमचेनि बोलें अवधारा । थोरावें जरी ॥140॥ जी तुम्ही चित्त देयाल । तरी ब्रह्म मिया होईजेल । काय जहालें अभ्यासिजेल । सांगाल तें ॥141॥ हां हो नेणों कवणाची काहाणी । आइकोनि श्लाघत असों अंतःकरणीं । ऐसी जाहलेपणाची शिरयाणी । कायसी देवा ॥142॥ हें आंगें म्यां होईजो कां । येतुलें गोसावी आपुलेपणें कीजो कां । तंव हासोनि श्रीकृष्ण हो कां । करू म्हणती ॥143॥ देखा संतोषु एक न जोडे । तंवचि सुखाचें सैंघ सांकडें । मग जोडिलिया कवणीकडे । अपुरें असे ॥144॥ तैसा सर्वेश्वरु बळिया सेवकें । म्हणोनि ब्रह्मही होय तो कौतुकें । परि कैंसा भारें आतला पिके । दैवाचेनि ॥145॥ जो जन्मसहस्रांचियासाठीं । इंद्रादिकांही महागु भेटी । तो आधीनु केतुला किरीटी । जे बोलुहि न साहे ॥146॥ मग ऐका जें पांडवें । म्हणितलें ब्रह्म म्यां होआवें । तें अशेषही देवें । अवधारिलें ॥147॥ तेथ ऐसेंचि एक विचारिलें । जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले । परि उदरा वैराग्य आहे आलें । बुद्धीचिया ॥148॥ एऱ्हवीं दिवस तरी अपुरे । परी वैराग्यवसंताचेनि भरें । जे सोहंभाव महुरें । मोडोनि आला ॥149॥ म्हणोनि प्राप्तिफळीं फळतां । यासि वेळु न लागेल आतां । होय विरक्तु ऐसा अनंता । भरंवसा जाहला ॥150॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : पाहा पां नवल कैसे चोज, कें उपदेशु केउतें झुंज…

    अर्थ

    श्रोते म्हणतात, ते राहू दे, लवकर चालू विषय सांग. (यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,) मग अर्जुन सलगीने म्हणाला, कृष्णा ही संतांची लक्षणे माझ्या अंगात वसत नाहीत. ॥139॥ एर्‍हवी या लक्षणांच्या तात्पर्याचा विचार केला तर, मी खरोखर फारच अपुरा पडेन. परंतु ऐका, जर माझ्यात मोठेपणा यावयाचा असेल तर, तो तुमच्या बोलण्यानेच येईल. ॥140॥ महाराज, तुम्ही लक्ष द्याल तर मी ब्रह्म होईन आणि सांगाल तो अभ्यास करीन; न करायला काय झाले? ॥141॥ अहो देवा, आपण कोणती गोष्ट सांगता हे कळत नाही. (परंतु) ती ऐकून मनात मी त्यांची स्तुती करत आहे. अशी लक्षणे ज्यांच्या अंगात सिद्ध असतील, त्यांचे महत्त्व केवढे असेल बरे? ॥142॥ ते मी स्वत: व्हावे, एवढे प्रभू मी आपला आहे, असे समजून आपण करावे. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणतात, एवढे का तुझे म्हणणे आहे? तर तसे करू बरे! ॥143॥ पाहा, जोपर्यंत एक समाधान प्राप्त झाले नाही, तोपर्यंत सुखाचा चोहोंकडे दुष्काळ असतो. पण एकदा संतोष प्राप्त झाल्यावर मग सुखाला कोठे कमी आहे? ॥144॥ त्याप्रमाणे सर्वशक्तिमान सर्वेश्वराचा अर्जुन सेवक आहे, म्हणून तो सहज ब्रह्मही होईल, पण अर्जुनाच्या दैवाच्या सामर्थ्याच्या भाराने श्रीकृष्ण कशाप्रकारे फलद्रूप झाला (ते पहा) ॥145॥ इंद्रादिकांना देखील हजारो जन्म घेतले तरी ज्याची भेट होणे दुर्लभ, तो (श्रीकृष्ण) अर्जुनाच्या किती आधीन झाला आहे! अर्जुन प्रश्न करीपर्यंत त्याला धीर धरवत नाही. ॥146॥ मग ऐका, अर्जुनाने ‘मी ब्रह्म व्हावे’, असे जे म्हटले ते श्रीकृष्णांनी सर्व ऐकले. ॥147॥ परंतु भगवंतांनी तेथे असा एक विचार केला की, ज्या अर्थी अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोहाळे लागले आहेत, त्या अर्थी याच्या बुद्धीच्या पोटात वैराग्यारूपी गर्भ राहिला आहे. ॥148॥ एऱ्हवी ब्रह्म होण्याला यास अद्याप दिवस कमी आहेत, परंतु वैराग्यरूपी वसंताच्या भराने ‘मी ब्रह्म आहे’ असा भावरूपी मोहोर दाट आला आहे. ॥149॥ म्हणून ब्रह्मप्राप्ती हे फळ येण्यास आता यास फार वेळ लागणार नाही, हा वैराग्यसंपन्न झाला आहे, अशी देवाची पूर्ण खात्री झाली. ॥150॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : देवकीया उदरीं वाहिला, यशोदा सायासें पाळिला…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : अगा प्रकाश आणि कडवसें, सूर्याचिस्तव जैसें…

    March 22, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    By Team AvaantarMarch 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः । सोऽविकम्पेन योगेन…

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : अगा प्रकाश आणि कडवसें, सूर्याचिस्तव जैसें…

    March 22, 2026

    Dnyaneshwari : तो चालतें ज्ञानाचें बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ…

    March 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn