Saturday, March 14, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 17 नोव्हेंबर 2025

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 17 नोव्हेंबर 2025

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 17 नोव्हेंबर 2025; वार : सोमवार
  • भारतीय सौर : 26 कार्तिक शके 1947; तिथि : त्रयोदशी अहोरात्र; नक्षत्र : चित्रा 29:01
  • योग : प्रीति 07:22; करण : गरज 17:57
  • सूर्य : वृश्चिक; चंद्र : कन्या 15:34; सूर्योदय : 06:45; सूर्यास्त : 18:00
  • पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

सोमप्रदोष

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – दिवस शुभ आणि सकारात्मक राहील. तुम्ही सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले असाल. आज अनेक संधी मिळतील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.  नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांनाही चांगला नफा मिळू शकतो.

वृषभ – करिअरच्या दृष्टीने एक महत्त्वाची संधी मिळू शकते. व्यवसायातून चांगला फायदा होईल. राजकारणात सहभागी असलेल्यांना एक महत्त्वाची संधी मिळू शकते. आज काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. खाण्यावर नियंत्रण ठेवा, पथ्ये पाळा.

मिथुन – दिवस शुभ राहील. नवीन ध्येय साध्य करण्यासाठी नव्या कल्पना राबवाव्या लागतील. कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. सामाजिक क्षेत्रात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. कुटुंबासह धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता. संततीच्या आरोग्याकडे आणि शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. एखाद्या गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात.

कर्क – भौतिक सुखसोयींवर अधिक लक्ष केंद्रित कराल. त्याअनुषंगाने सुखसोयींमध्ये वाढ होईल. परिणामी, खर्चाचे प्रमाणही वाढेल. मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखणाऱ्यांसाठी एखादा चांगला सौदा होऊ शकतो. आरोग्याबाबत निष्काळजीपणा महागात पडण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागेल.

सिंह – सिंह राशीच्या जातकांसाठी हा दिवस आनंद आणि शांतीने भरलेला राहील. आज निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. अपूर्ण कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. गरजू व्यक्तीची सेवा करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील सदस्यांना दिलेले कोणतेही वचन तुम्हाला पूर्ण करावे लागेल.

हेही वाचा – शिव आणि आराधना… एक अनोखी प्रेम कहाणी

कन्या – आजचा दिवस प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा वाढवणारा असेल. नशीब तुमच्या बाजूने असेल, शिवाय तुम्हाला काही अतिरिक्त आर्थिक फायदा देईल. जमीन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांचा दिवस अनुकूल असेल. बँकेकडून कर्जासाठी अर्ज केला आहे, त्यांचे कर्ज मंजूर होऊ शकते.

तुळ – दिवस चांगला जाईल. आधी केलेल्या प्रयत्नांमुळे चांगल्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक बाजू  बळकट करण्यात यशस्वी व्हाल. भागीदारीचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. तुमचा उत्साह आणि प्रभाव वाढेल. आज कौटुंबिक जीवनात चांगले संतुलन राहील.

वृश्चिक – खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.  दिवस चांगला असेल. सन्मान आणि प्रतिष्ठेसह संपत्तीत वाढ दिसून येईल. लक्षणीय आर्थिक यश मिळाल्याने बँक बॅलन्समध्ये वाढ होईल. हवे असलेले काम करायची संधी मिळेल.  एक मोठा करार तुमच्या व्यवसायाला चालना देईल, आर्थिक समृद्धी वाढवेल. मालमत्ता खरेदी करू इच्छिणाऱ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे.

धनु – आजचा दिवस कठोर परिश्रमांचा आहे. मालमत्तेत गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. कुटुंबातील वरिष्ठांकडून पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. सासरच्या लोकांकडून लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते.

मकर – शत्रूंपासून सावध राहा. आज बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. काही अनपेक्षित खर्च करावा लागेल. गुंतवणुकीबाबत घाईघाईने निर्णय घेणे टाळा. नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.

कुंभ – दिवस व्यग्र राहील, परंतु तो तुमच्यासाठी फायदेशीर असेल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना नव्या संधी मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांसह बाहेर जाण्याचा बेत आखू शकता. आर्थिक लाभ वाढतील, चांगल्या कमाईच्या संधी देखील उपलब्ध होतील. कोणालाही पैसे उधार देण्याचे टाळावे. घरी एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

हेही वाचा – होप फॉर द बेस्ट!

मीन – आजचा दिवस संपत्तीत वाढ  करण्याची संधी देऊ शकतो. सुखसोयींमध्ये वाढ होईल. करिअर आणि व्यवसायातील परिस्थिती सुधारेल. कुटुंबातील एखाद्याशी सुरू असलेले मतभेद दूर होऊ शकतात. जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. आदर आणि प्रतिष्ठा यात वाढ होईल.


दिनविशेष

गूढकथा लेखक रत्नाकर मतकरी

टीम अवांतर

गूढकथा लेखक, नाटककार, दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1938 रोजी झाला. नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक अशा साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन करणाऱ्या रत्नाकर मतकरी यांची साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार अशी ओळख होती. महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, सुमारे 30 वर्षे पदरमोड करून त्यांनी बालनाट्यांची निर्मिती केली. झोपडपट्टीतीतील मुलांना त्यांनी ’नाटक’ शिकवले.  वृत्तपत्रातील सदरलेखन, मालिका-चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन, माध्यमांतर, ‘बालनाट्य’ आणि ‘सूत्रधार’ या नाट्यसंस्थांचे लेखक, दिग्दर्शक, नट, नेपथ्यकार, निर्माते म्हणून ते जसे कार्यरत होते तसेच, कथाकथनकार, दूरदर्शनवरील ‘शरदाचे चांदणे’ आणि ‘गजरा’ यासारख्या कार्यक्रमांचे सादरकर्ते म्हणून देखील ते प्रसिद्ध होते. ‘नर्मदा बचाओ आंदोलन’ असो की  ‘निर्भय बनो’ या आंदोलनांमधील त्यांचा सक्रिय सहभाग त्यांच्या चौफेर कर्तृत्वाचा एक पैलू होता. 22 नाटके, अनेक एकांकिका, 23 कथासंग्रह, 3 कादंबऱ्या, बारा लेखसंग्रह तसेच आपल्या रंगभूमीवरील कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी मतकरींची विपुल साहित्यसंपदा आहे. रत्‍नाकर मतकरींचा ‘रत्‍नाक्षरं’ हा चार भागांत विभागला गेला आहे. गहिरे पाणी, अश्वमेध, बेरीज वजाबाकी यासारख्या टीव्ही मालिकांचे लेखन रत्नाकर मतकरींचे होते. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्व्हेस्टमेन्ट’चे कथालेखन आणि दिग्दर्शन  त्यांनी केले होते. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा ज्योत्स्ना भोळे पुरस्कार, केंद्र शासनाच्या संस्कृती आणि शिक्षण संचालनालयातर्फे सामाजिक जाणिवेतून ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून 2 वर्षांची मिळालेली शिष्यवृत्ती,  त्यांच्या 21 पुस्तकांना महाराष्ट्र शासनासह इतर संस्थांचे मिळालेले साहित्य पुरस्कार, साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार अशा असंख्य पुरस्कार तसेच गौरवाचे ते मानकरी ठरले. 18 मे 2020 रोजी कोरोना रोगाने मुंबईत त्यांचे निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!