दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 28 ऑक्टोबर 2025; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 06 कार्तिक शके 1947; तिथि : षष्ठी 07:59; नक्षत्र : पूर्वाषाढा 15:44
- योग : सुकर्मा 07:49; करण : गरज 20:45
- सूर्य : तुळ; चंद्र : धनु 22:13; सूर्योदय : 06:36; सूर्यास्त : 18:08
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – मेष राशीच्या जातकांना अनपेक्षित फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीत सातत्याने सुधारणा होईल. आज कामात यश मिळवण्याचा दिवस असेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विरोधक आज वरचढ ठरू शकतात. तथापि, काही विशिष्ट परिस्थितीत बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.
वृषभ – वृषभ राशीसाठी दिवस संमिश्र असेल. संपत्ती, पद आणि प्रतिष्ठेत वाढ दिसेल, परंतु काही चिंता देखील वाढू शकतात. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. नोकरी करणाऱ्यांना हा दिवस कामाशी संबंधित धावपळीने भरलेला दिसेल. तर व्यावसायिकांना नफा मिळविण्याच्या चांगल्या संधी आहेत.
मिथुन – कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. दीर्घकाळापासून रखडलेली कामे गती घेतील. नशीब तुमच्या बाजूने असेल. आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी तुम्ही मागेपुढे पाहणार नाहीत. काही कामांच्या माध्यमातून मोठी रक्कम जमवण्यात यशस्वी व्हाल. जोडीदाराशी काही मतभेद होऊ शकतात. आरोग्य बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्या.
कर्क – दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. काही बाबतीत तुम्ही उत्साही आणि आनंदी असाल, तर काही बाबतीत चिंता वाढू शकतात. व्यावसायिकांसाठी प्रतिस्पर्धी काही अडथळे निर्माण करू शकतात. तुमच्या आर्थिक योजना प्रभावी ठरतील, ज्यामुळे चांगला नफा मिळेल. नोकरी करणाऱ्यांना जातकांना कामातील चुकांमुळे वरिष्ठांकडून फटकारले जाऊ शकते.
सिंह – भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत वाढतील. खूप पूर्वी कोणाला उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यासंदर्भात चांगली बातमी मिळू शकते. दुसरीकडे, इतरांच्या बाबतीत हस्तक्षेप करणे टाळावे. अनावधानाने सल्ला देणे टाळा. खूप काळजीपूर्वक गाडी चालवा, अन्यथा अपघात होऊ शकतो.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रमाची रुपरेषा
कन्या – कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. आज कुटुंबासह धार्मिक समारंभात सहभागी होऊ शकता. नवीन संपर्क आणि ओळखी होतील, ज्यामुळे तुमचे वर्तुळ वाढेल. तुमचे बोलणे आणि वागणे याचा इतरांवर प्रभाव पडेल. जोडीदाराला एखादी भेटवस्तू देऊ शकता.
तुळ – नोकरीच्या शोधात असलेल्यांना संध्याकाळपर्यंत काही चांगली बातमी ऐकू येईल. शिवाय, आधीच नोकरी करणाऱ्या जातकांबाबत सुरू असणाऱ्या वादावर तोडगा निघू शकेल. राग नियंत्रित करावा लागेल, अन्यथा त्यामुळे नुकसान होऊ शकते. व्यावसायिकांनी काळजीपूर्वक पावले उचलावीत, कारण एखाद्या प्रकल्पात फसवणूक होऊ शकते. आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात.
वृश्चिक – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढेल. चांगला व्यवसाय करार मिळू शकेल. आरोग्य सुधारेल, आर्थिक लाभाच्या संधी वाढतील, ज्यामुळे आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळाल्याने आनंद होईल. जोडीदारासोबत रोमँटिक ठिकाणांना भेट देण्याची योजना आखू शकता.
धनु – वडिलोपार्जित मालमत्तेत फायदा होण्याची शक्यता आहे. जमिनीच्या व्यवहारामुळे आर्थिक परिस्थिती लक्षणीयरीत्या सुधारेल. व्यावसायिक आपल्या योजनांबाबत चर्चा करू शकतील, काही काम सुरू करू शकतील. एखाद्या प्रकल्पात पैसे गुंतवण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. नोकरी करणाऱ्यांवर विरोधक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील.
मकर – आजचा दिवस शुभ आणि फायदेशीर ठरेल. आजचा दिवस नोकरीच्या दृष्टीने चांगला असेल. आर्थिक लाभ, पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. इतरत्र नोकरीच्या संधी निर्माण होऊ शकतात. मात्र कोणालाही पैसे उधार देण्याचे टाळा.
कुंभ – कुंभ राशीसाठी आजचा दिवस अनुकूल असेल, परंतु काही बाबतीत आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. सामाजिक दर्जा आणि प्रतिष्ठा वाढेल. आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या अनुकूल असेल आणि अचानक कुठेतरी अडकलेले पैसे मिळू शकतो. उत्पन्न आणि खर्च यात समन्वय साधावा लागेल. व्यवसायिकांना प्रवास करावा लागू शकतो.
हेही वाचा – चेन्नई ते पुणे विमानप्रवास अन् तो तरुण…
मीन – आजचा दिवस खूप संमिश्र असेल. वादविवाद टाळावेत, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक बाबींमध्ये अतिरिक्त काळजी घ्यावी लागेल. दिवसाच्या उत्तरार्धात काही अपूर्ण काम पूर्ण होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. संध्याकाळी काही चांगल्या ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत आखू शकता.
दिनविशेष
कवी गिरीश
टीम अवांतर
प्रसिद्ध मराठी कवी गिरीश यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1893 रोजी सातारा जिल्ह्यातील फत्यापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव शंकर केशव कानेटकर होते. फलटण, पुणे, सांगली येथे शिक्षक आणि प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. 1959मध्ये शिक्षण क्षेत्रातील सेवेबद्दल त्यांचा राष्ट्रपतींचे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. निवृत्तीनंतर सांगलीस स्थायिक झाले. कवी गिरीश हे रविकिरण मंडळातील एक प्रमुख कवी होते. बालकवी आणि गोविंदाग्रज यांच्या कविता वाचून त्यांना काव्यरचनेची स्फूर्ती मिळाली, परंतु त्यांची काव्यरचना स्वतंत्र आहे. मासिक मनोरंजनात क्रमशः प्रसिद्ध झालेल्या ‘अभागी कमल’ या सामाजिक खंडकाव्याने त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. अर्वाचीन मराठीमधील सामाजिक खंडकाव्याचे ते आरंभस्थान म्हणता येईल. त्यानंतर कला (1926) हे एक खंडात्मक दीर्घकाव्य, आंबराई (1928) हे ग्रामीण जीवनावरील खंडकाव्य, अनिकेत (1954) हे टेनिसनच्या ‘ईनक आर्डन’ या काव्याचे भाषांतर… अशी दीर्घकाव्ये त्यांनी लिहिले. त्यांची स्फुट कविता कांचनगंगा (१९३०), फलभार (१९३४), मानसमेघ (१९४३) इत्यादी काव्यसंग्रहातून प्रकाशित झालेली आहे. विविध वृत्तांचा वापर, घोटीव शब्दकळा आणि रेखीव रचना ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये. काही टीकात्मक लेखनही त्यांनी केले आहे (काव्यकला (1936), मराठी नाट्यछटा (1937). माधव जुलियन् यांचे स्वप्नभूमि (1965) हे चरित्र त्यांनी लिहिले आहे. 04 डिसेंबर 1973 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.


