Sunday, September 21, 2025

banner 468x60

Homeअवांतरमाझे सखे सोयरे

माझे सखे सोयरे

माझ्या प्राणीप्रेमातूनच वन-रुम किचनच्या छोटेखानी घरात पहिले दाखल झाले ते मासे… हनुमान रोडवर मराठे नावाचे एक गृहस्थ घरातूनच गोड्या पाण्यातले मासे विकत असत. त्यांच्याशी विचारविनमय करून आणि व्यवस्थित माहिती घेऊन एक फुटाचा टँक घरी आणला. नवशिका असल्यामुळे सुरुवातीला रंगेबिरंगी गप्पी जातीचे मासे आणले.

मंदार अनंत पाटील

माझे प्राणीप्रेम कधी सुरू झाले ते कळलेच नाही. तसे बघायला गेले तर, आमच्या घरात कोणालाच पाळीव प्राणी फारसे आवडत नसत. आईचा जन्म चौल, रेवदंडा इथला आणि तिथे घराबाहेर कुत्री-मांजरं, बैल होते; पण ते कधी घरात नाही आले. बैलांची देखभाल करायला चांगू नावाचा गडी होता. वडिलांचा जन्म दादरचा. त्यांची आई त्यांच्या लहानपणीच वारली होती. बाबांचे बालपण दादरमध्ये चाळीतच गेले. तिथे प्राणी पाळणे शक्यच नव्हते.

माझ्या मोठ्या भावाला तर कुत्रा अजिबात आवडत नाही. मीच एक प्राणी, पक्षीप्रेमी होतो. अगदी शाळेपासूनच मुक्या जीवांबद्दल एक वेगळीच आपुलकी होती. येता-जाता कुठेही कुत्र्याचे पिल्लू दिसले तर माझी पावले आपोआप वळत आणि मग त्यांना ओंजारायचा मोह काही आवरत नसे. किती तरी वेळा डब्यातला खाऊ पण त्यांना देत असे. मग थोडावेळ त्याच्याशी खेळून जड पावलांनी तिथून निघायचो. कधी कधी तर पिल्लं घरी आणून त्यांना खाऊ-पिऊ घालायचो आणि मग बाबा रागावतील या भीतीने परत जेथून आणत होतो, तिथेच सोडून यायचो. पण मन मात्र तिथेच रेंगाळत राहायचे.

माझ्या प्राणीप्रेमातूनच वन-रुम किचनच्या छोटेखानी घरात पहिले दाखल झाले ते मासे… हनुमान रोडवर मराठे नावाचे एक गृहस्थ घरातूनच गोड्या पाण्यातले मासे विकत असत. त्यांच्याशी विचारविनमय करून आणि व्यवस्थित माहिती घेऊन एक फुटाचा टँक घरी आणला. नवशिका असल्यामुळे सुरुवातीला रंगेबिरंगी गप्पी जातीचे मासे आणले. पहिले काही दिवस तर त्यांची धावपळ आणि चपळता बघताना विस्मयचकित होत असे. त्या माशांची निगा आणि खाणे ही जबाबदारी माझ्यावर होती. त्यानिमित्ताने मराठे काकांकडे वरचेवर जाणे व्हायचे. त्यांच्याबरोबर बोलून माशांबाबतीत बरेच ज्ञान मिळालयला लागले होते. यथावकाश घरातील माशांची संख्या पण वाढायला लागली होती. माशांची निगा राखताना कोणकोणते ऊपाय करायचे, टँकचे तपमान कसे नियमित ठेवायचे, खाणे किती आणि कसे घालायचे या सर्व गोष्टी शिकायला मिळत होत्या. त्यामुळे मासे पाळणे आणखीनच मजेशीर वाटत होते.

पण कधी कधी नजरचुकीमुळे काही मासे दगावले देखील! त्याची चुटपुट मनाला लागून राहिली. पण मराठे काकांचे मार्गदर्शन आणि अनुभव याद्वारे ती चूक पुन्हा होणार नाही, याची पुरेपुर काळजी घेतली गेली. यथावकाश आई-बाबांना गळ घालून मग आणखी मोठा टँक घेतला. त्यासाठी आणखी विविध जातीचे मासे आणले गेले आणि बघता बघता आता 10-12 मासे झाले होते… अनुभवाची शिदोरी वाढायला लागली होती.

(क्रमश:)

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!