Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : कर्तव्यतेलागीं, जया दुसरें नाहीं जगीं…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : कर्तव्यतेलागीं, जया दुसरें नाहीं जगीं…

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 12, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.

    अध्याय चौथा

    एर्‍हवीं जग हें कर्माधीन । ऐसी याची व्याप्ती गहन । परि तें असो आइकें चिन्ह । प्राप्ताचें गा ॥92॥

    कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः । स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥18॥

    जो सकळकर्मीं वर्ततां । देखे आपुली नैष्कर्म्यता । कर्मसंगे निराशता । फळाचिया ॥93॥ आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं । ऐसिया नैष्कर्मता तरी चांगी । बोधला असे ॥94॥ परि क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा । तरी तो इहीं चिन्हीं जाणावा । ज्ञानिया गा ॥95॥ जैसा कां जळापाशीं उभा ठाके । तो जरी आपणपें जळामाजिं देखे । तरी तो निभ्रांत वोळखे । म्हणे मी वेगळा आहें ॥96॥ अथवा नावे हन जो रिगे । तो थडियेचे रुख जातां देखे वेगें । तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ॥97॥ तैसे सर्व कर्मीं असणें । तें फुडें मानूनि वायाणें । मग आपणपें जो जाणे । नैष्कर्म्यु ऐसा ॥98॥ आणि उदोअस्ताचेनि प्रमाणें । जैसें न चलतां सूर्याचें चालणें । तैसें नैष्कर्म्यत्व जाणे । कर्मीचि असतां ॥99॥ तो मनुष्यासारिखा तरी आवडे । परी मनुष्यत्व तया न घडे । जैसें जळीं जळामाजीं न बुडे । भानुबिंब ॥100॥ तेणें न पाहतां विश्व देखिलें । न करितां सर्व केलें । न भोगितां भोगिलें । भोग्यजात ॥101॥ एकेचि ठायीं बैसला । परि सर्वत्र तोचि गेला । हें असो विश्व जाहला । आंगेंचि तो ॥102॥

    हेही वाचा – Dnyaneshwari :  एथ कर्मचि फळसूचक, मनुष्यलोकीं…

    अर्थ

    एरवी हे सर्व जग कर्माच्या आधीन आहे, असा याचा (या कर्माचा) विस्तार दुर्बोध आहे. पण अर्जुना ते राहू दे, आता कृतकृत्य पुरुषाचे लक्षण ऐक. ॥92॥

    कर्माच्या ठिकाणी जो अकर्म पाहतो आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहतो, तो मनुष्यामध्ये बुद्धिमान योगी आणि सर्व कर्मे कर्ता (जाणावा). ॥18॥

    सर्व कर्मांचे आचरण करीत असताही आपण (खरोखर) कर्म करीत नाही, हे जो जाणतो आणि कर्मांबरोबर (कर्म करीत असता) त्यांच्या फलाची आशा जो धरत नाही ॥93॥ आणि कर्तव्य करण्याला जगात (आपल्याखेरीज) दुसरेपणाने काहीच नाही, अशा नैष्कर्म्यतेचा चांगला बोध ज्याला झालेला असतो ॥94॥ तरी जो कर्मसमुदायाचे उत्तम प्रकारे आचरण करताना दिसतो, तोच या लक्षणांवरून ज्ञानी आहे, असे जाणावे. ॥95॥ ज्याप्रमाणे जो पाण्यापाशी उभा राहिलेला असतो, जरी आपण तो पाण्यात आहे, असे पाहात असतो तरी, त्याला नि:संशय खरे ज्ञान असते की आपण वेगळे आहो (पाण्यात नाही). ॥96॥ अथवा जो नावेत बसून जातो, त्याला किनार्‍यावरची झाडे भरभर चालली आहेत असे दिसते. पण वस्तुस्थिती जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा, ती झाडे स्थिर आहेत, असे तो म्हणतो. ॥97॥ त्याप्रमाणे, तो सर्व कर्माचे आचरण तो करीत असतो, पण ते कर्माचरण उघड उघड केवळ आभासात्मक आहे, असे मानून मग आपण कर्मरहित आहो, हे तो जाणतो. ॥98॥ आणि सूर्य उदय तसेच अस्त पावतो, या एका प्रमाणावरून तो चाललेला भासतो, पण वास्तविक तो चालत नाही, त्याप्रमाणे तो कर्माचरण करीत असताही आपले नैष्कर्म्य जाणतो. ॥99॥ ज्याप्रमाणे पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते, पण त्यावरून प्रत्यक्ष बिंब त्यात बुडाले असे होत नाही, त्याप्रमाणे तो दिसण्यात सामान्य माणसासारखा दिसतो, पण त्याच्या ठिकाणी मनुष्यत्व (मनुष्याचे सामान्य गुण) नसते. ॥100॥ त्याने विश्व पाहिले नसतानाही ते पाहिल्याप्रमाणेच आहे. काही न करताही सर्व काही केल्याप्रमाणेच आहे आणि भोग्य वस्तूंचा उपभोग न घेताही त्या भोगल्याप्रमाणेच आहेत. ॥101॥ एकाच ठिकाणी तो बसून असला तरी, तो सर्वत्र गेल्याप्रमाणेच आहे. फार कशाला ? तो स्वत: विश्वरूपच झालेला असतो. ॥102॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : तरी कर्म म्हणिजे स्वभावें, जेणें विश्वाकारु संभवे…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    April 15, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    By Team AvaantarApril 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा अहो वांसरू देखिलियाचि साठीं । धेनु खडबडोनि मोहें उठी । मग…

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026

    Dnyaneshwari : माजीं गीता सरस्वती गुप्त, आणि दोनी रस ते ओघ मूर्त…

    April 12, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    April 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 268
    • अवांतर 182
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 385
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 557
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026
    Most Popular

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.