मेष
या आठवड्यात सगळी कामे नीट विचारपूर्वक करा. पुढील कामाचे मनामधील बेत कोणाला सांगू नका. बेत पूर्ण करण्यासाठी कामातील सातत्य आवश्यक आहे. व्यवसायात सतर्क राहणे गरजेचे आहे. पैशाचे व्यवहार चोख ठेवा. छोट्या गोष्टींवरून वादविवाद होण्याची शक्यता आहे, महिलांनी काळजी घ्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना विद्यार्थ्यांनी घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन घ्यावे.
वृषभ
या आठवड्यात कामाचे आणि वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. नवीन ओळखी होतील तसेच त्या ओळखीतून नवीन कामे मिळतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. जुनी येणी मिळतील. व्यवसायात थोडे बदल कराल. त्याचबरोबर सरकारी नियमांचे पालन करा. महिलांकडून घरात नवीन खरेदी केली जाईल. घरकामात सगळ्यांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांना अनपेक्षित लाभ होईल.
मिथुन
या आठवड्यात व्यावसायिक लोकांनी नवे तंत्रज्ञान वापरून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करावा. काम स्वीकारताना पैशाचा हिशोब करूनच कामे स्वीकारावीत. नोकरदारांना नोकरी बदल होण्याची शक्यता आहे. घरात अनावश्यक खर्च वाढू शकतो. महिलांनी स्वतःच्या क्षमतेचा योग्य वापर करावा. विद्यार्थ्यांनी खर्चावर नियंत्रण ठेवावे. त्यांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
कर्क
या आठवड्यात व्यवसाय आणि नोकरीतील अडचणी कमी होतील. जिद्दीने कामाला लागा. वेळेचे नियोजन करा. पैशांची वसुली होईल. वरिष्ठ आश्वासन पाळतील. जोडधंद्यात यश मिळेल. घरात पाहुणे आल्याने महिलांसाठी आनंदी वातावरण राहील. विद्यार्थी अभ्यासाबरोबर एखादा छोटा उद्योग करू शकतील.
सिंह
या आठवड्यात हातात घेतलेली कामे वेळेत पूर्ण करण्याऐवजी योग्य रीतीने आणि चांगली पूर्ण करण्यावर भर द्यावा. व्यावसायिक लोकांना मनाविरुद्ध नवीन कामे स्वीकारावी लागतील. नोकरीत कामे लवकर पूर्ण करा. महिला घरातील दिवाळीची कामे झपाट्याने पूर्ण करतील. विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येईल.
हेही वाचा – पंचनामा : …अन् गावकरी बनले चेष्टेचा विषय!
कन्या
या आठवड्यात पुढाकार घेऊन सगळी कामे पूर्ण करू शकाल. व्यवसायात ठोस कृतीवर भर राहील. तथापि, कायदा पाळून काम करा. पैशाची चिंता मिटेल. जोडधंद्यात विशेष फायदा होऊ शकतो. महिलांना तडजोड करावी लागेल, मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागू शकतात. विद्यार्थ्यांकडून शिक्षण प्रसारक तसेच आदिवासी लोकांना मदत केली जाईल.
तूळ
या आठवड्यात रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात चुकीच्या लोकांपासून लांब राहा. तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्या. नोकरीत इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. सहकाऱ्यांवर विसंबून राहू नका. कामे वेळेत संपवण्यावर भर द्या. इतरांच्या बोलण्याचा स्वतःवर परिणाम होणार नाही, याकडे महिलांनी लक्ष द्यावे. कोणावर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांनी स्वतःची कामे स्वतः करावी.
वृश्चिक
हा आठवडा अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायात नफा मिळणारी कामे मिळतील. कष्ट कमी, फायदा जास्त अशी कामे हाती घ्याल. नोकरीत नवीन प्रोजेक्टसाठी तुमची निवड होण्याची शक्यता आहे. जुनी कामे मार्गी लागतील. श्रमाचे चीज होईल. महिलांना घरात शुभ कार्य ठरेल आणि त्यामुळे महिलांच्या दृष्टीने घरात आनंदी वातावरण राहील. विद्यार्थ्यांना खेळात यश मिळू शकते, त्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा.
धनु
या आठवड्यात वरिष्ठांकडून कामाचा ताण राहील. प्रगतीसाठी वेगवेगळ्या मार्गाचा विचार करा. व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन पिढीप्रमाणे विचार करा. कामे वेळेत होतील म्हणून समाधान राहील. महिलांकडून घरात खूप खर्च होईल, बजेट सांभाळणे कठीण होऊ शकते. विद्यार्थ्यांनी योग्य मित्र जोडावेत, पैसे उधळणाऱ्या मित्रांपासून दूर राहावे.
मकर
या आठवड्यात कामात बदल घडतील. नवीन स्वरूपातील कामामुळे जास्त वेळ जाईल, पण कामातील चिकाटीमुळे सहज साध्य होईल. व्यावसायिक लोकांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांसाठी कामे जास्त वाढतील, पण त्याचबरोबर कामाचे कौतुकही होईल. महिला मनाप्रमाणे नवीन खरेदी करू शकतील. नवीन मैत्रीण मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन मित्र-मैत्रीण मिळतील, पण सांभाळून राहा. व्यसन करू नका.
कुंभ
या आठवड्यात व्यवसायात नवीन काम घेताना फक्त फायद्याचाच विचार करू नका. चारी बाजूंनी विचार करावा. नोकरीत कोणाच्या भानगडीत न पडता आपले काम स्वतःच्या जबाबदारीने करा. वरिष्ठ वर्गाचे मत विचारात घ्या, तुमचे विचार पटवून देऊ शकाल. महिला घरात मोठी खरेदी करतील. त्यामुळे आनंद मिळेल. विद्यार्थी मित्रांसह एकजुटीने नवीन काम पूर्ण करू शकतील, सामाजिक कार्य घडेल.
हेही वाचा – सुलू… हवी मायेची गुंतवणूक!
मीन
या आठवड्यात स्वतः मनाप्रमाणे जगू शकाल. मनाप्रमाणे कामे होतील. व्यवसायात कामाचा व्याप वाढू शकतो, पण योग्य व्यक्तीची मदत मिळेल. पैशांची सोय होईल. नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांना कुटुंबाबरोबर छोट्या सहली घडतील. कुटुंबातील आवडत्या भावंडांबरोबर विद्यार्थ्यांना वेळ घालवता येईल, प्रवास होईल.


