लीना जोशी परुळेकर
केस हा आपल्या सर्वांचा आवडता विषय आहे. आपल्या केसांबद्दल माहिती जाणून घेण्याची आपल्याला कायम उत्सुकता असते. आपले केस कशा प्रकारचे आहेत? काय काय केले तर, आपले केस चांगले रहातील? त्यांची निगा कशी राखायची? असे प्रश्न मनात असतात. पण त्यासाठी आपण आधी केसांबद्दल थोडी basic माहिती घेऊ.
आपले केस हे प्रथिनांनी बनलेले असतात, त्वचेच्या आत जो केसांचा भाग असतो, त्याला ‘केसांची मुळे’ म्हणतात. जो भाग त्वचेच्या बाहेर असतो त्याला shaft म्हणतात. त्वचेच्या बाहेर केसांचा जो भाग असतो, तो मृत (dead) असतो; म्हणूनच केस कापले, विंचरले, त्यांची काहीही स्टाईल केली तरी, आपल्याला दुखत नाही. तेच केस ओढले गेले तर, दुखते; कारण, त्वचेच्या मुळांशी sensory nerves असतात.
त्वचेचे जसे स्तर (layer) असतात तसेच केसांचे सुद्धा स्तर (layer) असतात. सगळ्यात बाहेरचा जो layer असतो, त्यांना ‘cuticle’ (क्यूटिकल) म्हणतात. त्यानंतर जो layer असतो, त्याला ‘cortex’ (कॉर्टेक्स) म्हणतात आणि सर्वात आतला जो layer असतो त्याला ‘Medulla’ (मेडयूला) म्हणतात. आपण आता या layers ची थोडक्यात माहिती घेऊ.
हेही वाचा – Hair care : अनावश्यक केसांसाठी… Epilation
Cuticle (क्यूटिकल) : हा केसांचा सर्वात बाहेरचा भाग. हा भाग कौलांसारखा एकमेकांत अडकलेला असतो, तुम्ही shampoo च्या जाहिरातींमध्ये हे बघितलेले असेल. Cuticle मुळे केसांना संरक्षण मिळते. cuticle मुळे केसांच्या आतल्या cortex ला ऊन, उष्णता, अतिरिक्त पाणी इत्यादी गोष्टींपासून संरक्षण मिळते.
Cortex (कॉर्टेक्स) : हा केसांचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा layer आहे. त्यात cells च्या spiral springच्या लांब शिडीसारख्या चेन (Chain) असतात. ज्या आपल्या केसांना strength (बळकटी) देतात. हेच केसांना जडपणा, केसांचा प्रकार (सरळ, wavy (लहरी), कुरळे) आणि केसांना त्यांची लवचिकता (elasticity) देतात. केसांना नैसर्गिक रंग देणारे Pigment (रंगद्रव्य) हे सुद्धा cortexमध्येच असतात.
Medulla (मेडयूला) : हा केसांच्या सर्वात मधला भाग. पण Medulla चा केसांमध्ये तसा काहीच उपयोग नसतो. खूप पातळ केसांमध्ये कित्येकदा medulla असतोच, असे नाही.
हेही वाचा – Skin care : मेक-अप करताना रंगसंगतीकडे लक्ष द्या
जे आपल्या त्वचेच्या बाबतीत लागू होते, तेच केसांच्या बाबतीत पण लागू होते. म्हणजेच, केसांवर सुद्धा वातावरण, हवा, पाणी, वापरली जाणारी उत्पादने इत्यादींचा परिणाम होत असतो. त्याच अनुषंगाने आपण पुढच्या भागात केसांची काळजी कशी घ्यायची ते पाहू.
क्रमश:
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


