Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » भाविकांचे श्रद्धास्थान पुण्यातील चतुःश्रृंगी देवस्थान
    अध्यात्म

    भाविकांचे श्रद्धास्थान पुण्यातील चतुःश्रृंगी देवस्थान

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 27, 20254 Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेखक, चतुश्रृंगी, सप्तशृंगी, रँडचा वध, पेशवाई, स्थापत्यशास्त्र, नवरात्रौत्सव, श्रद्धास्थान, Chatushrungi, Saptashrungi, Rand's killing, Peshwa era, architecture, Navratri festival, place of worship
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    हिमाली मुदखेडकर

    पुणेकरांचे ग्रामदैवत म्हणा किंवा श्रद्धास्थान म्हणा, पण चतुःशृंगी देवी मंदिराचे पुण्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. विस्तारित पुण्याच्या मध्यवर्ती भागात येणारे हे मंदिर सेनापती बापट रोडवर आहे. मुख्य मंदिर हे नव्वद फूट उंच आणि एकशेवीस फूट रुंद असे टेकडीवर वसलेले असून आजूबाजूच्या परिसरातील अनेक मंदिरांनी वेढलेले आहे.

    पुणे विद्यापीठापासून गणेश खिंड रोडकडून प्रवेश केला असता सुरुवातीसच पार्वतीनंदन गणपती मंदिर लागते. हे जुने मंदिर असून याला स्वतःचे असे ऐतिहासिक महत्त्व आहे. चतुःश्रृंगी मंदिर परिसरातील या पार्वतीनंदन गणपती मंदिरातच चाफेकर बंधूंनी सहकार्‍यांसह रॅंडच्या वधाचा कट रचला होता. ‘गोंद्या आला रे’ हा परवलीचा शब्द म्हणजे आजच्या भाषेतील ‘कोड वर्ड’ इथेच ठरला होता!

    अतिशय साधे स्वच्छ आणि निर्मळ असे हे मंदिर पार करून पुढे चालत दोन तीनशे मीटर अंतर जाताच लागते चतुःशृंगी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. हे प्रवेशद्वार आणि त्यापाठोपाठच येणारी मुख्य कमान ही बहुधा इंग्रजांच्या कारकीर्दीत बांधली असावी. त्या बांधकामाच्या धाटणीवर ब्रिटिशकालीन चर्चच्या बांधकाम पद्धतीचा प्रभाव जाणवतो. कमानीपासून पायर्‍या सुरू होतात. दर सहा पायऱ्यांनंतर एक रुंद पायरी बांधली आहे. वर चढत जाताना मधे थांबून विश्रांती घेण्यासाठी विचारपूर्वक केलेली ही सोय आहे. दोनशे पायर्‍या चढून वर गेल्यानंतर मुख्य गाभाऱ्याची सुरुवात होते.

    चतुःश्रृंगी मंदिर हे पारंपरिक वास्तू आणि स्थापत्य शैलीचा एक सुरेख नमुना आहे. त्यानुसार इथे एक शिखर म्हणजे कळस आणि एक मंडप आहे. ज्या टेकडीवर हे मंदिर स्थित आहे, त्या टेकडीला चार शिखरे आहेत, म्हणून याचे नाव ‘चतुःश्रृंगी’ आहे. हे मूळ मंदिर सुमारे तीनशे वर्षं जुने आहे. येथील देवीची मूर्ती स्वयंभू असून त्याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते.

    हेही वाचा – बोल माधवी… मनात चाललेले महाभारत!

    दुर्लभ शेठ ऊर्फ दुर्लक्ष्ये नावाचे पेशव्यांचे सावकार होते, जे पेशव्यांना मोहिमांमध्ये कर्जाऊ रक्कम देत असत. हे पिढीजात श्रीमंत सावकार वणीच्या सप्तशृंगी देवीचे निस्सीम भक्त होते. दर वर्षी चैत्री, शारदीय नवरात्रात ते सप्तशृंगी गडावर जात असत. पुढे वृद्धत्वामुळे त्यांना तिथे जाणे जमेनासे झाले. त्यांचे मन मात्र राहवेना… देवीच्या दर्शनाचा त्यांना ध्यास लागला. त्याच चिंतेत ते असत. एकदा त्यांना स्वप्नं पडले. त्यात देवीने दृष्टांत देऊन जावळ पासच्या डोंगरावरील ठरविक जागी खणण्यास सांगितले. तिथे उत्खननात तांदळा (मुखवटा) स्वरुपात स्वयंभू मूर्ती मिळाली. या मूर्तीची मग त्याच डोंगरावर मंदिर बांधून प्रतिष्ठापना करण्यात आली… आणि चार शिखरांच्या डोंगरावर सापडल्यामुळे ‘चतुःश्रृंगी’ असे नाव दिले गेले. त्यावेळी देवीचे एक चांदीचे नाणे घडवून ते चतुःश्रृंगी रूपया या नावाने प्रचलितही करण्यात आले होते.

    मंदिराचा आताचा परिसर खूप मोठा असून येथील व्यवस्थापन छान ठेवले गेले आहे. चतुःश्रृंगी ट्रस्टने येथील भागात अनेक सुधारणा करून अद्ययावत सुविधा पुरविली आहेत. अनेक कारंजी बांधून सुशोभीकरण केले. त्यामुळे टेकडी चढताना वातावरण अल्हाददायक राहते. मंदिरातील एकूणच वातावरणात भक्तिमय आणि ऊर्जा वाढवणारे असल्याने भाविकांची येथे कायम गर्दी असते.

    हेही वाचा – …अन् सुलोचना ताईला मोक्ष मिळाला!

    नवरात्रौत्सवादरम्यान लाखोंच्या संख्येने भाविक या मंदिरास भेट देतात. भाविकांनी दर्शनासाठी तर पर्यटकांनी एक चांगला स्थापत्य शास्त्राचा नमुना पाहण्यासाठी पुण्यातील या मंदिरास एकदा तरी जरूर भेट द्यावी आणि दैवी पावित्र्याची अनुभूती घ्यावी.


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com/ या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    April 15, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026 अध्यात्म

    4 Comments

    1. श्री on September 27, 2025 1:56 pm

      धन्यवाद, खूपच उत्कृष्ट वर्णन. ऐतिहासिक माहिती आणि वास्तू- स्थापत्याच्या वर्णनाची सुरेख गुंफण! 🙏

      Reply
    2. Lathkar on September 27, 2025 5:26 pm

      खुप सुंदर लिखाण
      चतुःश्रृंगी देवीच वर्णन पण सुरेख

      Reply
    3. Lathkar on September 27, 2025 5:26 pm

      खुप छान शब्द रचना आणि वर्णन

      Reply
    4. Dhananjay on October 11, 2025 9:20 pm

      Fantastic information, I like this

      Reply
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    By Team AvaantarApril 15, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा अहो वांसरू देखिलियाचि साठीं । धेनु खडबडोनि मोहें उठी । मग…

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026

    Dnyaneshwari : माजीं गीता सरस्वती गुप्त, आणि दोनी रस ते ओघ मूर्त…

    April 12, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    April 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 268
    • अवांतर 182
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 386
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 557
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.