कामिनी व्यवहारे
साहित्य
- बारीक रवा – 1 वाटी
- दूध – अर्धी वाटी
- दही – पाव वाटी
- साजूक तूप – पाव वाटी
- साखर – पाव वाटी
- मध – 2 टेबलस्पून
- बेकिंग पावडर – अर्धा टी-स्पून
- केशराच्या काड्या – 6-7
तयारीसाठी लागणारा वेळ : 20 मिनिटे
मिश्रण करून ठेवण्यास लागणारा वेळ : 3 ते 4 तास
एकूण केक तयार होण्यास लागणारी वेळ : 5 तास
पुरवठा संख्या : 3 ते 4 माणसांसाठी
हेही वाचा – Recipe : ग्रीन पीज चीज पॅटीस
कृती
- दूध, दही, साजूक तूप, साखर आणि मध एकत्रित करून नीट ढवळून घ्या.
- छान रंग यावा म्हणून त्यात थोडं केशर घाला. हे आपलं पंचामृत तयार झालं.
- आता या पंचामृताच्या मिश्रणात रवा मिसळा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- एकत्रित केलेले हे सर्व पदार्थ तीन ते चार तास ठेवा.
- केक करायच्या वेळी हे मिश्रण छान फेटून घ्यावे. नंतर त्यात बेकिंग पावडर घालून हे मिश्रण पुन्हा एकदा फेटून घ्यावे.
- ओव्हन 250 डिग्री सेंटिग्रेडवर 10 मिनिटं pre heat करा.
- ओव्हन pre heat होईपर्यंत दुसरीकडे केक पात्राला आतून थोडासा तुपाचा हात लावून घ्या.
- किंचित मैदा भुरभुरून पूर्ण पात्रात पसरवून घ्या. Extra मैदा काढून टाका. आता केकचे मिश्रण त्यात ओता.
- आता pre-heated ओव्हनमध्ये 180 डिग्री सेंटिग्रेड तापमानावर 40 मिनिटं बेक करा.
- बेक झालेला केक काही वेळ तसाच गरम ओव्हनमध्ये राहू द्यावा.
- केक थंड झाला की, तो व्यवस्थित कापून घ्यावा.
प्रत्येक ओव्हनचं temperature setting वेगवेगळं असतं. त्यामुळे, बेकिंगसाठी लागणारा वेळ थोड्याफार फरकाने वेगवेगळा लागू शकतो. पहिल्या साधारण 25 मिनिटांनंतर एकदा चेक करून पाहावं. केक व्यवस्थित बेक झाला आहे की, नाही याची खात्री पुढील दोन चाचण्यांवरून करता येईल-
- केकच्या कडा सोनेरी दिसायला लागतात.
- केकमध्ये सूरी घालून पहावी. बाहेर काढल्यावर सूरीला जर काहीही चिकटलेले नसेल तर याचा अर्थ केक छान बेक झाला आहे.
हेही वाचा – Recipe : वेगळ्या चवीचे आंबट-गोड पंचामृत
टीप
- तूप आणि मधाची छान चव या केकला येते. त्यामुळे कोणताही artificial essence घालण्याची आवश्यता नाही.
- केक पात्रात मिश्रण घातल्यावर पाहिजे असल्यास वर ड्रायफ्रुट घालावेत.
- हा केक केकच्या भांड्यात ही करता येतो.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.