शैला सहस्रबुद्धे
रोज नवनवीन काहीतरी करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्यातही गृहिणीच्या बाबतीत तर, ‘आज नवीन पदार्थ काय करायचा?’ हा प्रश्न असतोच. मग आहे त्या सामग्रीतच नवीन प्रयोग केले जातात. पालक बटाटा पराठा हा त्यापैकीच एक. ‘टेस्टी पण हेल्दी’ असा हा पदार्थ आहे. नेहमीच्या पदार्थांमध्ये हटके लूक देऊन केलेला वेगळा पदार्थ एकदा तरी नक्की try करा.
साहित्य
- पालक – 10-12 पाने
- बटाटे – 6 (उकडलेले)
- लाल तिखट – चवीनुसार
- मीठ – चवीनुसार
- पांढरे तीळ – 1 टेबल स्पून
- आलं – 2 इंच
- लसूण – 4 पाकळ्या
- मिरच्या – 3
- कणिक – 2 वाट्या
- डाळीचे पीठ – अर्धी वाटी
हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट कोळाचे पोहे
पुरवठा संख्या – बेताच्या आकाराचे 8 पराठे होतात.
तयारीसाठी लागणारा वेळ –
- पालकाची कणिक भिजवायला 10 मिनिटे
- बटाटे उकडून कुस्कारायला 20 मिनिटे
- परोठा करण्यासाठी 20 मिनिटे
- एकूण वेळ – 50 मिनिटे
कृती
- उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावेत. त्यात गुठळी राहणार नाही, याची काळजी घ्या.
- त्यात चवीनुसार मीठ आणि तिखट घालून त्याचा गोळा करून घ्यावा.
- पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. मग मिक्सरमध्ये पालक, आलं, लसूण, मिरच्या यांची बारीक पेस्ट करून घ्यावी.
- आता त्यात मीठ, कणिक आणि डाळीचे पीठ घालून घट्ट गोळा मळून घ्यावा.
- आता पालकच्या पिठाचा बेताचा गोळा करून तो लाटून घ्यावा, लाटताना त्याच्यावर थोडे तिळ पसारावे आणि परत लाटावे.
- आता तिळ लावलेली बाजू खाली घ्यावी आणि विरुद्ध बाजूला बटाट्याचे सारण पसरून घ्यावे.
- आता याचा घट्ट रोल करावा.
- त्याचे समान 6 भाग करावेत. बाहेर पालक आणि आत बटाटा असे दिसेल.
- आता चिरोट्यांप्रमाणे ते आडवे घेऊन बेताचे लाटावेत. खूप मोठे लाटू नयेत.
- आता तव्यावर दोन्ही बाजूने तेलावर खरपूस भाजून घ्यावेत.
- टोमॅटो केचपबरोबर गरम गरम खायला द्यावेत.
हेही वाचा – Recipe : खमंग कोबी पोहे अन् पास्ता सलाड
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.