दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 06 सप्टेंबर 2025; वार : शनिवार
- भारतीय सौर : 15 भाद्रपद शके 1947; तिथि : चतुर्दशी 25:41; नक्षत्र : धनिष्ठा 22:55
- योग : अतिगंड 11:51; करण : गरज 14:31
- सूर्य : सिंह; चंद्र : मकर 11:20; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:49
- पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
अनंत चतुर्दशी
पौर्णिमा प्रारंभ उत्तर रात्री 01:41
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – समाजात प्रभाव आणि आदर वाढेल. त्यादृष्टीने दिवस फायदेशीर आणि शुभ असेल. काहीतरी नवीन करू इच्छिणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला ठरेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असेल तर, नवीन संधी चालून येतील. अचानक नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसमोर आपली समस्या मांडा, मन हलके होईल.
वृषभ – खर्चात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते, त्यातून काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. सुखसोयींवर जास्त पैसे खर्च कराल. नशिबाची उत्तम साथ मिळेल. शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर त्यातून फायदा होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
मिथुन – आज विरोधकांपासून दूर रहा, अन्यथा त्यांच्याकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवहाराच्या बाबतीतही सावधगिरी बाळगा. कोणालाही पैसे उधार देणे टाळा, कारण ते पैसे कधीच परत मिळणार नाहीत. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही आज सन्मानित केले जाईल. मित्रांचा आणि कुटुंबातील सदस्यांचा भक्कम पाठिंबा मिळेल.
कर्क – आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. एखादा जुना आजार उफाळून येऊ शकतो. भागीदारीत काम करणाऱ्यांना चांगले यश मिळू शकते. आज करिअरमध्ये मोठी कामगिरी साध्य होऊ शकते. एखादे रखडलेले काम वेगाने पूर्ण होईल. जोडीदारासोबत चांगला समन्वय साधून एखादे काम हातावेगळे करता येईल.
सिंह – दिवस चांगला असेल. आज अनेक अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात. योजनेनुसार काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यात मोठ्या उत्साहाने भाग घ्याल. नोकरी करणाऱ्या जातकांवर कामाचा मोठा ताण असेल. मात्र संध्याकाळपर्यंत सर्व काही ठीक होईल. जोडीदाराकडून एखाद्या कामासाठी पूर्ण पाठिंबा आणि शुभेच्छा मिळतील.
कन्या – आजचा दिवस खूप चांगला आणि शुभ ठरेल. नफ्याच्या संधींमध्ये वाढ होईल, त्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. मात्र आज कोणत्याही कामात घाई करणे टाळा. एखाद्या कायदेशीर प्रकरणात तुमच्या बाजूने निर्णय मिळू शकेल. आई किंवा मामाकडूनही एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकेल.
हेही वाचा – वाचनाची सवय चांगली, पण…
तुळ – काही छोट्या समस्यांसोबतच आनंदाची एखादी बातमी मिळेल. नोकरदार जातकांच्या पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. मात्र, संयम आणि शांततेने काम करावे लागेल. अचानक आर्थिक लाभाच्या संधी येतील. नोकरी बदल करण्यास इच्छुक असलेल्या जातकांना कुठूनतरी उत्तम ऑफर मिळू शकते. वैवाहिक जीवनात सौख्य आणि समाधान असेल.
वृश्चिक – आजचा दिवस आर्थिक बाबतीत खूप अनुकूल असेल. नफ्याच्या संधींमध्ये सतत वाढ होत राहील. एखाद्या विशिष्ट योजनेत चांगला नफा मिळू शकेल. व्यवसाय विस्ताराच्या संधी मिळतील. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादाचा निर्णय तुमच्या बाजूने आला तर यामुळे तुमच्या चिंता संपतील. आज सासरच्या लोकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
धनु – नशिबाची उत्तम साथ मिळेल, त्यामुळे मन आनंदी राहील. लोकांशी संवाद साधण्याच्या कलेत तरबेज असल्याचा फायदा मिळेल. सोयीसुविधा वाढतील. नोकरी करणाऱ्या जातकांची कामामुळे प्रशंसा होईल, कार्यालयात त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
मकर – आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी करणाऱ्या जातकांची बदली होण्याची शक्यता आहे. कुठूनतरी अतिरिक्त कमाईच्या संधी वाढू शकतात. नातेवाईकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. मात्र आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
कुंभ – आजचा दिवस अनुकूल असेल. घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एखाद्या महत्त्वाच्या योजनेवर काम करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक आघाडीवर मोठे यश मिळू शकते. नफ्याच्या संधींमध्ये वाढ होईल. वडिलोपार्जित मालमत्तेच्या विक्रीतून मोठी रक्कम मिळू शकते. याशिवाय कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
मीन – दिवस चांगला असेल.. उत्पन्नात वाढ होऊ शकते. एखाद्या महत्त्वाच्या योजनेत सहभागी होण्याची संधी देखील मिळू शकते. नोकरदार जातकांनी आपल्या कामाबद्दल सतर्क असावे. व्यावसायिकांना काही नवीन सौदे मिळू शकतात. कुटुंबात एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे आयोजन होईल, ज्यामुळे कुटुंबातील सगळेजण एकत्र येतील.
हेही वाचा – कंडक्टरचं गणित…!
दिनविशेष
मराठीतील पहिल्या अभिनेत्री कमलाबाई गोखले
टीम अवांतर
मराठीतील पहिल्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमलाबाई कामत-गोखले यांचा जन्म 6 सप्टेंबर 1901 रोजी झाला. वडील आनंद नानोसकर मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षक होते तर, आई दुर्गाबाई कामत या उत्तम सतार वादक होत्या. 1914 मध्ये दादासाहेब फाळके हे ‘भस्मासुर मोहिनी’ या चित्रपटाची जुळवाजुळव करत होते. मात्र त्यांना मोहिनीच्या भूमिकेसाठी मनाजोगता कलाकार मिळत नव्हता. काही कामानिमित्त दादासाहेब नानोसकर यांच्या घरी आले होते. त्यावेळी अंगणात खेळणाऱ्या कमलाबाईंना बघून त्यांची मोहिनीच्या तर आई दुर्गाबाई कामत यांची पार्वतीच्या भूमिकेसाठी निवड झाली. त्यामुळे भारतीय चित्रपटातल्या दुर्गाबाई या पहिल्या नायिका, तर कमला बाई पहिल्या बालनटी ठरल्या. खरं तर, ही मोठी ऐतिहासिक घटना होती. कारण याआधी ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटात तारामती आणि इतर स्त्री भूमिका पुरुषांनीच केल्या होत्या. पुढे कमलाबाई मराठी नाटकांमध्येही काम करू लागल्या. पुढे चित्ताकर्षक नाटक मंडळीचे मालक रघुनाथ गोखले यांच्याशी कमलाबाईंचा विवाह झाला. मधुसूदन उर्फ लालजी, चंद्रकांत आणि सूर्यकांत अशी तीन अपत्ये या दाम्पत्याला झाली. पुढे अल्पशा आजाराने रघुनाथरावांचा मृत्यू झाला आणि चित्ताकर्षक नाटक मंडळीचा कारभारही बंद पडला. मात्र, याने खचून न जाता कमलाबाईंनी मिरजेच्या तवन्नापा चिवटे यांच्या ‘मनोहर स्त्री संगीत मंडळी’ या कंपनीत काम मिळवले. गंमतीचा भाग असा की, त्या काळात स्त्री भूमिका पुरुष साकारत असताना कमलाबाईंनी मात्र पुरुष पात्रे साकारली. ‘मानापमान’मधला धैर्यधर, ‘संशयकल्लोळ’मधला अश्विन शेठ, ‘सौभद्र’मधला कृष्ण, ‘मृच्छकटिक’मधला चारुदत्त या प्रमुख पुरुष भूमिकांचा त्यात समावेश होता. नंतर अनेक नाटक कंपन्यांमधून नोकरी करत त्यांनी मराठी रंगभूमी गाजवली. मुलांनाही उत्तम शिक्षण दिले. मोठा मुलगा मधुसूदन उर्फ लालजी आणि धाकटा मुलगा सूर्यकांत हे तबलावादक म्हणून प्रसिद्ध झाले तर, मधला मुलगा चंद्रकांत गोखले यांनी आईच्या पावलावर पाऊल टाकत मराठी हिंदी चित्रपट आणि नाट्यसृष्टी गाजवली. 200हून अधिक नाटके, मूकपट आणि 35 पेक्षाही अधिक चित्रपटातून भूमिका साकारलेल्या कमलाबाईंनी जवळपास 80 वर्षे रंगभूमीची सेवा केली. 18 मे 1996 रोजी वयाच्या 96व्या वर्षी कमलाबाईंचे निधन झाले.