Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    April 19, 2026

    Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे

    April 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, April 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 06 सप्टेंबर 2025
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 06 सप्टेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 6, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 06 सप्टेंबर 2025; वार : शनिवार
    • भारतीय सौर : 15 भाद्रपद शके 1947; तिथि : चतुर्दशी 25:41; नक्षत्र : धनिष्ठा 22:55
    • योग : अतिगंड 11:51; करण : गरज 14:31
    • सूर्य : सिंह; चंद्र : मकर 11:20; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:49
    • पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

    अनंत चतुर्दशी

    पौर्णिमा प्रारंभ उत्तर रात्री 01:41

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – समाजात प्रभाव आणि आदर वाढेल. त्यादृष्टीने दिवस फायदेशीर आणि शुभ असेल. काहीतरी नवीन करू इच्छिणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला ठरेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असेल तर, नवीन संधी चालून येतील.  अचानक नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसमोर आपली समस्या मांडा, मन हलके होईल.

    वृषभ –  खर्चात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते, त्यातून काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. सुखसोयींवर जास्त पैसे खर्च कराल. नशिबाची उत्तम साथ मिळेल. शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर त्यातून फायदा होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

    मिथुन – आज विरोधकांपासून दूर रहा, अन्यथा त्यांच्याकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवहाराच्या बाबतीतही सावधगिरी बाळगा. कोणालाही पैसे उधार देणे टाळा, कारण ते पैसे कधीच परत मिळणार नाहीत. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही आज सन्मानित केले जाईल. मित्रांचा आणि कुटुंबातील सदस्यांचा भक्कम पाठिंबा मिळेल.

    कर्क – आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. एखादा‌ जुना आजार उफाळून येऊ शकतो. भागीदारीत काम करणाऱ्यांना चांगले यश मिळू शकते. आज करिअरमध्ये मोठी कामगिरी साध्य होऊ शकते. एखादे रखडलेले काम वेगाने पूर्ण होईल. जोडीदारासोबत चांगला समन्वय साधून एखादे काम हातावेगळे करता येईल.

    सिंह – दिवस चांगला असेल. आज अनेक अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात. योजनेनुसार काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यात मोठ्या उत्साहाने भाग घ्याल. नोकरी करणाऱ्या जातकांवर कामाचा मोठा ताण असेल. मात्र संध्याकाळपर्यंत सर्व काही ठीक होईल. जोडीदाराकडून एखाद्या कामासाठी पूर्ण पाठिंबा आणि शुभेच्छा मिळतील.

    कन्या – आजचा दिवस खूप चांगला आणि शुभ ठरेल. नफ्याच्या संधींमध्ये वाढ होईल, त्यामुळे  आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. मात्र आज कोणत्याही कामात घाई करणे टाळा. एखाद्या कायदेशीर प्रकरणात तुमच्या बाजूने निर्णय मिळू शकेल. आई किंवा मामाकडूनही एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकेल.

    हेही वाचा – वाचनाची सवय चांगली, पण…

    तुळ – काही छोट्या समस्यांसोबतच आनंदाची एखादी बातमी मिळेल. नोकरदार जातकांच्या पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. मात्र, संयम आणि शांततेने काम करावे लागेल. अचानक आर्थिक लाभाच्या संधी येतील. नोकरी बदल करण्यास इच्छुक असलेल्या जातकांना कुठूनतरी उत्तम ऑफर मिळू शकते. वैवाहिक जीवनात सौख्य आणि समाधान असेल.

    वृश्चिक – आजचा दिवस आर्थिक बाबतीत खूप अनुकूल असेल. नफ्याच्या संधींमध्ये सतत वाढ होत राहील. एखाद्या विशिष्ट योजनेत चांगला नफा मिळू शकेल. व्यवसाय विस्ताराच्या संधी मिळतील. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादाचा निर्णय तुमच्या बाजूने आला तर यामुळे तुमच्या चिंता संपतील. आज सासरच्या लोकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.

    धनु – नशिबाची उत्तम साथ मिळेल, त्यामुळे मन आनंदी राहील. लोकांशी संवाद साधण्याच्या कलेत तरबेज असल्याचा फायदा मिळेल. सोयीसुविधा वाढतील. नोकरी करणाऱ्या जातकांची कामामुळे प्रशंसा होईल, कार्यालयात त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

    मकर – आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी करणाऱ्या जातकांची बदली होण्याची शक्यता आहे. कुठूनतरी अतिरिक्त कमाईच्या संधी वाढू शकतात. नातेवाईकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. मात्र आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

    कुंभ – आजचा दिवस अनुकूल असेल. घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एखाद्या महत्त्वाच्या योजनेवर काम करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक आघाडीवर मोठे यश मिळू शकते. नफ्याच्या संधींमध्ये वाढ होईल. वडिलोपार्जित मालमत्तेच्या विक्रीतून मोठी रक्कम मिळू  शकते. याशिवाय कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

    मीन – दिवस चांगला असेल.. उत्पन्नात वाढ होऊ शकते. एखाद्या महत्त्वाच्या योजनेत सहभागी होण्याची संधी देखील मिळू शकते. नोकरदार जातकांनी आपल्या कामाबद्दल सतर्क असावे. व्यावसायिकांना काही नवीन सौदे मिळू शकतात. कुटुंबात एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे आयोजन होईल, ज्यामुळे कुटुंबातील सगळेजण एकत्र येतील.

    हेही वाचा – कंडक्टरचं गणित…!


    दिनविशेष

    मराठीतील पहिल्या अभिनेत्री कमलाबाई गोखले

    टीम अवांतर

    मराठीतील पहिल्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमलाबाई कामत-गोखले यांचा जन्म 6 सप्टेंबर 1901 रोजी झाला. वडील आनंद नानोसकर मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षक  होते तर, आई दुर्गाबाई कामत या उत्तम सतार वादक होत्या. 1914 मध्ये दादासाहेब फाळके हे ‘भस्मासुर मोहिनी’ या चित्रपटाची जुळवाजुळव करत होते. मात्र त्यांना मोहिनीच्या भूमिकेसाठी मनाजोगता कलाकार मिळत नव्हता. काही कामानिमित्त दादासाहेब नानोसकर यांच्या घरी आले होते. त्यावेळी अंगणात खेळणाऱ्या कमलाबाईंना बघून त्यांची मोहिनीच्या तर आई दुर्गाबाई कामत यांची पार्वतीच्या भूमिकेसाठी निवड झाली. त्यामुळे भारतीय चित्रपटातल्या दुर्गाबाई या पहिल्या नायिका, तर कमला बाई पहिल्या बालनटी ठरल्या. खरं तर, ही मोठी ऐतिहासिक घटना होती. कारण याआधी ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटात तारामती आणि इतर स्त्री भूमिका पुरुषांनीच केल्या होत्या. पुढे कमलाबाई मराठी नाटकांमध्येही काम करू लागल्या. पुढे चित्ताकर्षक नाटक मंडळीचे मालक रघुनाथ गोखले यांच्याशी कमलाबाईंचा विवाह झाला. मधुसूदन उर्फ लालजी, चंद्रकांत आणि सूर्यकांत अशी तीन अपत्ये या दाम्पत्याला झाली. पुढे अल्पशा आजाराने रघुनाथरावांचा मृत्यू झाला आणि चित्ताकर्षक नाटक मंडळीचा कारभारही बंद पडला. मात्र, याने‌ खचून न जाता कमलाबाईंनी मिरजेच्या तवन्नापा चिवटे यांच्या ‘मनोहर स्त्री संगीत मंडळी’ या कंपनीत काम मिळवले. गंमतीचा भाग असा की, त्या काळात स्त्री भूमिका पुरुष साकारत असताना कमलाबाईंनी मात्र पुरुष पात्रे साकारली. ‘मानापमान’मधला धैर्यधर, ‘संशयकल्लोळ’मधला अश्विन शेठ, ‘सौभद्र’मधला कृष्ण, ‘मृच्छकटिक’मधला चारुदत्त या प्रमुख पुरुष भूमिकांचा त्यात समावेश होता. नंतर अनेक नाटक कंपन्यांमधून नोकरी करत त्यांनी मराठी रंगभूमी गाजवली. मुलांनाही उत्तम शिक्षण दिले. मोठा मुलगा मधुसूदन उर्फ लालजी आणि धाकटा मुलगा सूर्यकांत हे तबलावादक म्हणून प्रसिद्ध झाले तर, मधला मुलगा चंद्रकांत गोखले यांनी आईच्या पावलावर पाऊल टाकत मराठी हिंदी चित्रपट आणि नाट्यसृष्टी गाजवली. 200हून अधिक नाटके, मूकपट  आणि 35 पेक्षाही अधिक चित्रपटातून भूमिका साकारलेल्या कमलाबाईंनी जवळपास 80 वर्षे रंगभूमीची सेवा केली. 18 मे 1996 रोजी वयाच्या 96व्या वर्षी कमलाबाईंचे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    April 19, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    April 18, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    By प्राजक्ता काथेApril 19, 2026

    मेष या आठवड्यात रवी मेष राशीमध्ये आला आहे. तो उच्चीचा असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. तब्येत…

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 18 एप्रिल 2026

    April 18, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    April 19, 2026

    Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे

    April 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026

    स्वरचैतन्याचा अस्त…

    April 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 272
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 390
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 196
    • मैत्रीण 18
    • ललित 562
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    April 19, 2026

    Dnyaneshwari : एऱ्हवीं येकल्या बापियाचिया तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे

    April 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026
    Most Popular

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 एप्रिल 2026

    April 19, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.