दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 02 सप्टेंबर 2025; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 11 भाद्रपद शके 1947; तिथि : दशमी 27:52; नक्षत्र : मूळ 21:50
- योग : प्रीति 16:38; करण : तैतिल 15:22
- सूर्य : सिंह; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:23; सूर्यास्त : 18:52
- पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
ज्येष्ठा गौरी विसर्जन (रात्री 09:50 वाजेपर्यंत)
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस सामान्य असेल. आत्मविश्वासाचा अभाव राहील, त्यामुळे मन अस्वस्थ असू शकते. आर्थिक परिस्थिती बेताची असेल, त्यामुळे पैसे हुशारीने खर्च करा. व्यवसायात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. जोडीदारासमवेत उत्तम वेळ घालवाल.
वृषभ – आजचा दिवस चांगला आहे, असे म्हणता येईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्य सुधारेल. कुटुंबासह एखाद्या सहलीला जाण्याचा बेत आखाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. विविध स्रोतांकडून आर्थिक लाभ होईल.
मिथुन – दिवस सामान्य राहील. मानसिक ताण येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अतिकाम असेल. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळेल. व्यवसायातील परिस्थिती सुधारेल. आर्थिक बाजू मजबूत बनेल. गुंतवणूक करण्यापूर्वी माहितगाराचा सल्ला घ्या.
कर्क – आजचा दिवस सामान्य असेल. मानसिक स्थिती चांगली आहे, असे म्हणता येणार नाही. दिवस खूप धावपळीचा असेल. वादविवादांपासून दूर राहा. नोकरीत दुसऱ्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल, परंतु पैसे हुशारीने खर्च करा.
सिंह – सिंह राशीच्या जातकांच्या आयुष्यात आज मोठे बदल होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायात नफा होईल. कुटुंबासह प्रवासाला जाण्याची योजना आखू शकता. खर्चही वाढेल, परंतु विविध स्रोतांकडून पैसे येतील. करिअरमध्ये वाढ होण्याची संधी मिळेल.
कन्या – आज मन शांत कसे राहील, याकडे लक्ष द्या. संयम राखण्याचा प्रयत्न करा. घाईघाईत कोणतेही काम करू नका. गाडी हळू चालवा, अतिउत्साही होऊ नका. नोकरी आणि व्यवसायात हुशारीने कामे करा. आर्थिक स्थिती चांगली राहील. कौटुंबिक स्तरावरही सगळे आलबेल असेल.
हेही वाचा – परोपकार
तुळ – आजचा दिवस चांगला असेल. मानसिक ताण कमी होईल. संयमाने काम कराल. नोकरी आणि व्यवसायात आर्थिक फायदा होईल. प्रगतीच्या संधी मिळतील. आत्मविश्वासाने प्रत्येक काम पूर्ण कराल. परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – दिवस उत्तम आहे. नोकरी आणि व्यवसायात नफा होईल. मित्राच्या मदतीने उत्पन्नाचे स्रोतही वाढतील. कुटुंबाच्या पाठिंब्यावर प्रलंबित कामेही पुढे सुरू करता येतील. समाजात आदर वाढेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
धनु – धनु राशीच्या जातकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. मन शांत राहील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नोकरी आणि व्यवसायातही मोठे बदल दिसून येतील. गुंतवणुकीसाठी दिवस शुभ राहील.
मकर – मकर राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. नोकरी, व्यवसाय, प्रेम, पैसा सर्व आघाड्यांवर चांगले यश मिळेल. आज जे काही काम कराल, त्याचे उत्तम परिणाम बघायला मिळतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल. विवाहोत्सुकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
कुंभ – दिवस संमिश्र राहील. फाजील आत्मविश्वास निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या. नोकरी आणि व्यवसायात अडचणी येऊ शकतात. मात्र त्याचवेळी उत्पन्न वाढू शकते. रागावर नियंत्रण ठेवा, वादविवादाच्या परिस्थितीपासून दूर रहा. मानसिक ताण संभवतो. आरोग्याची काळजी घ्या.
मीन – मीन राशीच्या जातकांनी आज थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. पैसे हुशारीने खर्च करा, नाहीतर कर्ज घ्यायला लागेल. नोकरी आणि व्यवसायात कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा.
हेही वाचा – माहेर : मी आणि माझं लेकरू!
दिनविशेष
प्रतिभावान साहित्यिक श्री. म. माटे
टीम अवांतर
बहुविध स्वरूपाचे ललित आणि वैचारिक लेखन करणारे, स्वतंत्र प्रज्ञेचे शैलीकार साहित्यिक, नामवंत प्राध्यापक, अस्पृश्यताविरोधी कार्य करणारे कृतिशील, निष्ठावंत समाजसेवक अशी ओळख असणाऱ्या श्रीपाद महादेव माटे यांचा जन्म विदर्भातील शिरपूर या गावी 2 सप्टेंबर 1886 रोजी झाला. 1935-46 या कालखंडात पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात ते इंग्रजी आणि मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. प्राध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत यशस्वी आणि फलदायी ठरली. 1931 मध्ये केसरीप्रबोध या ग्रंथाचे संपादक म्हणून केलेले काम माटे यांच्या साहित्यिक जीवनाची सुरुवात ठरली. महाराष्ट्र सांवत्सरिक (3 खंड, 1933-35) हा माटे यांनी संपादिलेला आणखी एक महत्त्वपूर्ण ग्रंथ होय. नंतर त्यांनी रोहिणी मासिकाचे संपादक म्हणून काम केले. याशिवाय विज्ञानबोध, अस्पृश्यांचा प्रश्न, रसवंतीची जन्मकथा, संत-पंत-तंत, परशुरामचरित्र, गीतातत्त्वविमर्श, रामदासांचे प्रपंचविज्ञान यासारखे ग्रंथ, उपेक्षितांचे अंतरंग, अनामिका, माणुसकीचा गहिवर, भावनांचे पाझर यासारखे कथासंग्रह तर पश्चिमेचा वारा ही एकमेव कादंबरी अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली. आपल्या प्रज्ञेस सतत प्रज्वलित आणि स्वतंत्र ठेवून मराठी वाङ्मयावर एक चिरंतन मुद्रा उमटविणाऱ्या थोर ज्ञानोपासकांत माटे यांची गणना केली जाते. 25 डिसेंबर 1957 रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले.