कामिनी व्यवहारे
राजेळी केळ्यांचे उंबर
साहित्य
- राजेळी केळी – 2 किंवा 3 (पिकलेली)
- अर्धी वाटी – तांदळाचे पिठ
- वेलची पूड – 1 छोटा चमचा
- तळण्यासाठी तूप
कृती
- प्रथम राजेळी केळ्यांची साले काढून केळी कुस्करून घेणे, नंतर त्यात तांदळाचे पिठ आणि वेलची पूड घालून छान मिक्स करून घेणे.
- हे मिश्रण 2 ते 3 मिनिटे झाकून ठेवणे.
- त्यानंतर कढईत तूप तापवून आपण तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे मंद आचेवर तळून घ्यावेत. छान तांबूस रंग येई पर्यंत तळावेत.
टीप
- राजेळी केळी नसतील तर कोणत्याही पिकलेल्या केळ्याचे उंबर करू शकता.
एकूण कालावधी : 20 ते 30 मिनिटे.
कढी गोळे
गोळ्यांसाठीचे साहित्य
- चण्याची डाळ – 1 वाटी
- आले – 1 इंच
- हिरव्या मिरच्या – 3 ते 4
- हळद – चिमूट भर
- जिरे – 1 चमचा
- थोडी कोथिंबीर – चिरलेली
- मीठ – चवीपुरते
कढीसाठी साहित्य
- ताक – 1 लिटर
- चण्याचे पीठ (बेसन) – 1 चमचा
- तूप – 1 चमचा
- जिरे – 1 छोटा चमचा
- हिंग – 1 छोटा चमचा
- हिरव्या मिरच्या – 2
- कोथिंबीर – 1 लहान वाटी
- चिमूटभर हळद
- आले – 1 इंच
- कढीपत्ता – 5 ते 6 पाने
- साखर – चवीपुरती
- मीठ – चवीपुरते
कृती
- प्रथम चणाडाळ 4 ते 5 तास भिजत ठेवावी.
- डाळ भिजल्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे.
- डाळ, आले, मिरच्या आणि जिरे मिक्सरमध्ये पाणी न टाकता जाडसर वाटून घेणे.
- वाटलेल्या डाळीत थोडी हळद, चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालून चांगले मिक्स करून घेणे.
- नंतर थोडावेळ ते बाजूला ठेवावे.
- कढई घेऊन ती गॅसवर गरम झाली की तूप टाकावे.
- तूप गरम झाल्यावर जिरे, हिंग, कढीपत्ता, मिरच्या यांची फोडणी करावी.
- नंतर त्यात ताक ओतावे आणि त्याला चमचाभर बेसन लावून घेणे.
- आले किसून टाकावे, चवीपुरते मीठ आणि थोडी साखर घालून 1 उकळी आणावी.
- त्यानंतर आपण जे डाळीचे वाटण तयार केले आहे. त्याचे छोटे छोटे गोळे करून त्या कढीत सोडावे. गॅस मंद आचंवर ठेवावा.
- सर्व गोळे सोडल्यावर. गॅसची आच मध्यम करून 10 मिनिटे कढीला उकळी येऊ द्यावी.
टीप
- हे कढी गोळे पोळी किंवा भाकरीबरोबर खायला छान लागतात.
- आपली साधी फोडणी करून त्यात लाल मिरच्या तळून घ्यावेत. गोळे कुस्करून त्यावर ही फोडणी व लाल मिरची कुस्करुन खाल्ले तर जास्त स्वादिष्ट लागतात.
पुरवठा संख्या : 4 ते 5 माणसासाठी.
तयारीसाठीचा कालावधी :
- डाळ भिजवण्यास 4 तास
- कढी आणि वाटण करून गोळे करण्यास अर्धा तास.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.