Saturday, August 30, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 28 ऑगस्ट 2025

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 28 ऑगस्ट 2025

दर्शन कुलकर्णी

आज, दिनांक : 28 ऑगस्ट 2025; वार : गुरुवार

भारतीय सौर : 06 भाद्रपद शके 1947; तिथि : पंचमी 17:56; नक्षत्र : चित्रा 08:42

योग : शुक्ल 13:17; करण : कौलव अहोरात्र

सूर्य : सिंह; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:22; सूर्यास्त : 18:56

पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन

संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

ऋषिपंचमी

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – सर्जनशीलतेत वाढ होऊन एक नवीन ऊर्जा अनुभवायला मिळेल. व्यावसायिक संबंधांना चालना मिळेल. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या समारंभात मैत्रीचे नवे धागे जोडले जातील. ज्यामुळे नातेसंबंध मजबूत करण्याची आणि नवीन नातेसंबंध निर्माण करण्याची क्षमता प्राप्त होईल. त्यामुळे हुशारीने योजना आखा.

वृषभ – लवचिकतेचे धोरण स्वीकारा. आर्थिक वाढ आणि आव्हानांचे मिश्रण दर्शवणारा दिवस आहे. तरीही आर्थिक अडचणींवर सहज मात करण्यासाठी पैशाचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करणे योग्य ठरेल.

मिथुन – व्यावसायिक जीवनात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, ज्यांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी संयम आणि धोरणात्मक विचारसरणीची आवश्यकता असेल. मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडचणींवर मात करण्यासाठी प्लॅन बी तयार ठेवा.

कर्क – वैयक्तिक स्तरावर प्रगती आणि प्रेमाच्या संधी उपलब्ध होतील. यामुळे सामाजिक जीवनासाठी हा एक रोमांचकारी काळ असेल. काहींना अनपेक्षित आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. खर्च कमी करा.

सिंह – आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. आयुष्यात पुढे जाण्यासाठी ध्यान आणि विश्रांती यात समतोल राखणे आवश्यक आहे. संयम आणि सर्जनशीलतेवर भर देणे महत्त्वाचे असेल, कारण सर्व योजना अपेक्षेप्रमाणे पुढे सरकणार नाहीत. निरोगी आहारावर लक्ष केंद्रित करा.

कन्या – उत्तम संकल्पना आणि कृती यामुळे अपेक्षेहून जास्त फायदा होऊ शकतो. तथापि, मार्केटचा अभ्यास किंवा संशोधन न करता कुठेही पैसे गुंतवू नका. एखाद्या क्लायंटच्या ऑफिसला भेट देऊ शकता. लग्नाचा निर्णय घेण्यासाठी जोडीदारासोबत जास्त वेळ घालवावा लागेल. पालकही या नात्याला मान्यता देतील.

हेही वाचा – कलियुगातील सावित्री

तुळ – ऑफिसमध्ये तुमची सर्वोत्तम कामगिरी दाखवून देऊ शकाल. या आठवड्यात नशीबाची उत्तम साथ मिळणार आहे.  आरोग्यही चांगले राहील. विवाह झालेल्या जातकांचे जोडीदारासोबतचे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.

वृश्चिक – ऑफिसमध्ये आपण बरं आणि आपलं काम बरं, ही मानसिकता ठेवा. बाकी कोणत्याही प्रकरणांवर मतप्रदर्शन करू नका. आर्थिक आवक वाढेल, त्याचा तुमच्या जीवनशैलीवरही परिणाम होईल. सहकाऱ्यांना नेहमी पाठिंबा द्या आणि अतिरिक्त जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा.

धनु – आपल्या भावना जोडीदाराला सांगायला अजिबात संकोच करू नका. नोकरीच्या ठिकाणी  सर्वोत्तम कामगिरी देण्याचा प्रयत्न करा. स्मार्ट आर्थिक निर्णय घ्या. यामुळे भविष्यात चांगला परतावा मिळेल. आरोग्यही चांगले असेल.

मकर – आधी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळतील. निरोगी राहण्यासाठी डाएट सुरू करा. दुचाकी चालवताना हेल्मेट घाला. आज नातेसंबंधांमध्ये समजुतीची कमतरता जाणवेल. घुसमट होणाऱ्या नात्यांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

कुंभ – नातेसंबंधांमधील प्रेम आणि विश्वास वाढेल. त्यासाठी संवाद कौशल्य कामी येईल. वाद घालताना रागावरील नियंत्रण गमावू नका. जोडीदाराशी व्यवहार करताना थोडेसे आपमतलबी व्हा. गाडी चालवताना विशेष काळजी घ्या.

मीन – विवाहोत्सुक जातकांच्या आयुष्यात प्रेम फुलेल. नाविन्यपूर्ण कल्पना कामाच्या ठिकाणी उपयोगी पडतील. कोणत्याही गंभीर समस्या आर्थिक आणि आरोग्यावर परिणाम करणार नाहीत, याकडे विशेष लक्ष द्या. ज्या जातकांचे अलीकडेच ब्रेकअप झाले आहे ते पुन्हा प्रेमात पडतील.

हेही वाचा – एका संपाची कहाणी


दिनविशेष

‘लावणी सम्राट’ संगीतकार राम कदम

टीम अवांतर

‘लावणी सम्राट’ ही बिरुदावली मराठी रसिकांनी ज्यांना प्रदान केली होती त्या संगीतकार राम कदम यांचा जन्म 28 ऑगस्ट 1916 रोजी झाला. त्यांच्या संगीतामुळे अनेक चित्रपट तरले, विक्रमी ठरले. मराठी चित्रपट संगीत लोकप्रिय करण्यात ज्या मोजक्या संगीतकारांचे कर्तृत्व कारणीभूत ठरले त्यात राम कदम यांचे स्थान वरचे आहे. पिंजरा या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी लावणीचे लावण्य खुलवून तिला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. ‘पिंजरा’, ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘झुंज’, ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’, ‘पाहुणी’, ‘सुशिला’, ‘पारध’, ‘गड जेजुरी जेजुरी’ अशा कित्येक संगीतमय चित्रपटांद्वारे राम कदम यांनी मराठी रसिकांच्या मनावर गारुड केले. 45 वर्षांच्या आपल्या सांगीतिक कारकिर्दीत राम कदम यांनी 113 मराठी, 3 हिंदी, 1 तेलुगू चित्रपट आणि 25 नाटके यांना संगीत दिले.  लोकसंगीताच्या माध्यमातून अस्सल मराठी मातीचे संगीत देताना त्यांनी प्रभात कंपनीमधील अभिजात संगीताचे संस्कार तर जपलेच, शिवाय मराठी लावणीचे लावण्यही खुलवले. मराठी लोकसंगीतातील झगडा, भूपाळी, विराणी, गवळण, भारूड, पोतराज, वासुदेव, नागोबाची – हळदीची गाणी, धनगरगीते, कोळीगीते, मोटेवरची गाणी, गौरी-हादगा-मंगळागौरीची स्त्रीगीते असे सर्व प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले. सूरसिंगारचे ‘बृहस्पती अ‍ॅवॉर्ड’, ‘स्वामी हरिदास पुरस्कार’, याशिवाय एकटा जीव सदाशिव, सुगंधी कट्टा, पैज तसेच साईबाबा या चित्रपटांच्या  उत्कृष्ट संगीताचे राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले. अशा या प्रसिद्ध संगीतकाराचे 19 फेब्रुवारी 1997 रोजी निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!