Saturday, August 30, 2025

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, भविष्य आणि दिनविशेष, 14 ऑगस्ट 2025

Panchang : आजचे पंचांग, भविष्य आणि दिनविशेष, 14 ऑगस्ट 2025

दर्शन कुलकर्णी

आज, दिनांक : 14 ऑगस्ट 2025; वार : गुरुवार

भारतीय सौर : 23 श्रावण शके 1947; तिथि : षष्ठी 26:07; नक्षत्र : रेवती 09:05

योग : शूल 13:11; करण : गरज 15:15

सूर्य : कर्क; चंद्र : मीन 09:05; सूर्योदय : 06:19; सूर्यास्त : 19:07

पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन

संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

बृहस्पती पूजन

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – दिवस खूप चांगला जाणार आहे. व्यवसायात एखादी मोठी गोष्ट निश्चित होऊ शकते, ज्यामुळे नफा मिळविण्याच्या नवीन संधी मिळतील. त्याचबरोबर समाजात आदरही मिळेल. कुटुंबाच्या दृष्टीनेही दिवस आनंददायी राहणार आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

वृषभ – व्यवसाय वाढीसाठी नवीन योजना बनवू शकता. बऱ्याच काळापासून कायदेशीर वादात अडकला असाल तर, आता त्यात यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी काही गुंतागुंत असतील, परंतु हुशारीने परिस्थिती सामान्य कराल. कुटुंबात शांततेचे वातावरण असेल.

मिथुन – सर्जनशील कामात जास्त वेळ जाईल. त्यातून नफा कमावण्याच्या संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी देखील, तुम्हाला सर्वात जास्त रस असलेल्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन योजना बनवू शकता, यासाठी वरिष्ठांकडूनही सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ चांगला जाईल.

कर्क – व्यवसायाच्या दृष्टीने दिवस उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी पूर्ण मेहनत आणि समर्पणाने कोणताही प्रकल्प पूर्ण कराल. महत्त्वाची कामे बराच काळ प्रलंबित असतील तर, ती पूर्ण होऊ शकतील. नोकरदार जातकांचा दिवस चांगला जाईल, त्यांना सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. वैयक्तिक जीवनात जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

सिंह – कामात व्यग्र रहाल. मात्र कामाच्या ठिकाणी काही वरिष्ठ आणि विरोधकांपासून सावध रहा. अन्यथा, ते कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. संध्याकाळपर्यंत परिस्थिती सुधारेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

कन्या – कामाच्या ठिकाणी काहीशी स्फोटक परिस्थिती उद्भवू शकते. अशा परिस्थितीत  कठोर शब्द वापरणे टाळा आणि संयमाने निर्णय घ्या. आजूबाजूला होणाऱ्या कोणत्याही वादापासून चार हात दूर रहा. आत्मविश्वासाने जे काम कराल त्यात फायदाच होईल आणि परिस्थितीही सुधारेल.

हेही वाचा – Recipe : नारळाच्या रसातील अळूवडी

तुळ – दिवस फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी बऱ्याच काळापासून काही समस्या किंवा वाद असेल तर, त्याचे आता निराकरण होईल. व्यवसायात एखादा नवीन प्रकल्प मिळू शकेल, ज्यामुळे आर्थिक फायदे मिळविण्याचे नवीन मार्ग खुले होतील. परंतु मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल.

वृश्चिक – व्यवसायाच्या दृष्टीने दिवस खूप भाग्याचा असेल. कामाच्या ठिकाणी नफा कमावण्याच्या काही संधी उपलब्ध होतील. पण यासाठी प्रयत्न करत राहावे लागेल. नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने काही बदल करून किंवा काहीतरी नवीन केल्याने भविष्यात मोठे फायदे मिळू शकतात.

धनु – कामाच्या ठिकाणी कोणतेही काम अत्यंत सावधगिरीने करा, अन्यथा अडचणींना सामोरे जावे लागू शकते. व्यवसायात घेतलेले काही मोठ्या जोखीमीचे निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. नोकरदार जातकांना एखाद्या नव्या कामात रस निर्माण होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल.

मकर – भागीदारीतील व्यवसाय असेल तर मोठा नफा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी एकाच वेळी अनेक कामे करणे टाळावे, अन्यथा ताण वाढू शकतो. अनेक दिवसांपासून असणारी अपूर्ण कामेही पूर्ण होतील. यामुळे कुटुंबासोबत अधिक वेळ घालवू शकाल.

कुंभ – व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. नफा कमावण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. परंतु यासाठी प्रयत्नात सातत्य आवश्यक आहे. घाईघाईने निर्णय घेतल्यास समस्या निर्माण होतील. स्वतःच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कुटुंबाच्या दृष्टीने दिवस सामान्य राहणार आहे.

मीन – व्यवसायात जोखीम घेतल्याने काही चांगले परिणाम मिळतील. कामात कोणतीही समस्या येत असेल तर संयम आणि गोड बोलण्याने त्यावर मात करू शकता. नोकरदार जातक त्यांच्या बुद्धीच्या जोरावर यश मिळवू शकतात. कुटुंबातील कुरबुरी शांतपणे एकत्र बसून सोडवाव्या लागतील.

हेही वाचा – Recipe : भाजणीचे वडे…. मंगळागौर विशेष


दिनविशेष

प्रसिद्ध लेखक, नाटककार जयवंत दळवी

टीम अवांतर

प्रसिद्ध लेखक, नाटककार, पत्रकार जयवंत द्वारकानाथ दळवी यांचा जन्म 14 ऑगस्ट 1925 रोजी गोव्यातील हडफडे येथे झाला. मॅट्रिक झाल्यावर मुंबईच्या व्हीजेटीआयमध्ये टेक्स्टाइल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमासाठी त्यांनी अभ्यास सुरू केला, पण हा अभ्यास मधेच सोडला. त्यानंतर एमएसाठी त्यांनी ‘इमोशन अ‍ॅन्ड इमॅजिनेशन अ‍ॅन्ड देअर प्लेस इन लिटरेचर’ या विषयावर संशोधन करून प्रबंध सादर केला. लेखनासाठी पूर्ण वेळ मिळावा म्हणून त्यांनी 1975 साली त्यांनी मुंबई येथील अमेरिकेच्या माहिती खात्यातून (युसिस) स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. ‘ठणठणपाळ’ या टोपण नावाने त्यांनी लेखन केले. 1948 मध्ये ‘दातार मास्तर’ ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांच्या लेखणीला बहर आला आणि विविध साहित्य प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले. गहिवर (1956), एदीन (1958), रुक्मिणी (1965), स्पर्श (1974) असे 15 कथासंग्रह; चक्र (1963), स्वगत (1968), महानंदा (1970), अथांग (1977), अल्बम (1983) आदी 21 कादंबर्‍या; संध्याछाया (1974), बॅरिस्टर (1977), सूर्यास्त (1978), महासागर (1980), पुरुष (1983), नातीगोती (1991) आदी 19 नाटके जयवंत दळवी यांनी लिहिली. ‘लोक आणि लौकिक’ हे प्रवासवर्णन आणि ‘सारे प्रवासी घडीचे’ हे विनोदी पुस्तक रसिकांच्या पसंतीस उतरले. 16 सप्टेंबर 1994 रोजी त्यांचे निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!