Sunday, August 31, 2025

banner 468x60

Homeशैक्षणिकPlaygroup : पूर्व-प्राथमिक शाळेची आवश्यकता

Playgroup : पूर्व-प्राथमिक शाळेची आवश्यकता

रश्मी परांजपे

आजकाल आपण ठिकठिकाणी पूर्व-प्राथमिक शाळा म्हणजे खेळगट (Playgroup), शिशुवर्ग (Junior) आणि बालवर्ग (Senior) बघतो. बर्‍याच वर्षांपासून ही शैक्षणिक पद्धत सुरू आहे. पूर्वीच्या काळात असं काही नव्हतं, मग हल्ली अशा शाळांची काय गरज आहे, असा प्रश्न आत्ताच्या ज्येष्ठ नागरिकांना साहजिकच पडतो. वास्तविक, या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नातच दडलेलं आहे, ते म्हणजे काळाची गरज. या मुद्द्याचा आपण सविस्तर विचार करूया.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती. घरात सर्व वयोगटातील पुष्कळ मुलं असायची. लहान मुलांना सांभाळायला घरी अनेक जण उपलब्ध असायचे. मुलांच्या आईला कामं करताना मुलांची चिंता नसायची. मुलं ही बरोबरच्या तसेच मोठ्या भावंडांबरोबर मिळून मिसळून खेळायची. मुलं म्हटलं की, भांडण आणि वेळ प्रसंगी थोडीफार मारामारीही व्हायची. परंतु मोठी भावंडं लहान भावंडांना सांभाळून घ्यायची, आपल्या खाऊतला खाऊ लहान भावंडांना द्यायची, दुखलं-खुपलं तर पहायची, पडलं-झडलं तर मलमपट्टी करायची.

वडिलधाऱ्या माणसांकडे सहसा तक्रारी जात नसत. थोडक्यात, लहान-सहान कुरबुरी झाल्या तरी, सर्व मुलं सरतेशेवटी एकत्र येऊन गोडीगुलाबीने रहायची. मुलांचा भावनिक आणि सामाजिक विकास म्हणतो, तो हाच… आणि त्याचा श्रीगणेशा एकत्र कुटुंब असलेल्या घरापासूनच व्हायचा.

मोठी भावंडं अभ्यास करताना, खेळताना तसेच कला सादरीकरण करताना, लहान भावंडं बघायची आणि उपजत अनुकरणप्रियतेमुळे त्यांचं बघून बघून शिकायची आणि अशा रितीने मुलांच्या शैक्षणिक विकासाला घरातूनच सुरुवात व्हायची. एकत्र कुटुंबात मुलांचे लाड व्हायचे, पण त्याचबरोबर नकार पचवायची सवय देखील लागायची. मुलांना शिस्तीचे धडे मिळायचे तसेच संस्कारांचे बाळकडूही मिळायचे.

हेही वाचा – Qualities or Attire : प्राध्यापकांना महत्त्वाचे काय, गुणवत्ता किंवा छानछोकी?

कालांतराने शिक्षण, नोकरी, व्यवसाय या निमित्ताने कुटुंबातील लोक विखुरले. आईवडील आणि मुलं असं कुटुंबाचे चौकोनी आणि आता तर बर्‍याच घरी त्रिकोणी चित्र दिसायला लागलंय. मुलांची जबाबदारी, घरची कामं, वेळप्रसंगी बाहेरची कामं आईवर पडू लागलीयत. मुलांना सांभाळून सर्व काही करायचं आईला अवघड जाऊ लागलं. आई नोकरी करत असेल तर, मग एकंदरीत अधिकच अवघड झालंय. मग मुलं कुठेतरी दोन-तीन तास व्यग्र राहिली तर, इतर जबाबदाऱ्या निभावणं सोपं जाऊ लागलं.

यातूनच पूर्व-प्राथमिक शाळा ही संकल्पना उदयास आली. आईवडील दोघंही नोकरी करणारे असतील तर, समस्या अधिकच बिकट होते. यामुळेच पाळणाघर संकल्पना अस्तित्वात आली. काही शाळेत नियमित शाळेनंतर पाळणाघर (Day-care) सुविधा उपलब्ध असते. आता तर प्राथमिक शाळेत प्रवेश घेताना पूर्व-प्राथमिक शिक्षण आवश्यक, अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच मुलं अडीच-तीन वर्षांची झाली की, शाळेत प्रवेश घेतला जातो आणि आईवडील निश्चिंत होतात.

हेही वाचा – Professor and student : भावना नेहमीच खऱ्या असतात

अशा रितीने कालपरत्वे पूर्व-प्राथमिक शाळेची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.

कालाय तस्मै नमः।

(लेखिका पूर्व-प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून 32 वर्षे कार्यरत राहून निवृत्त झाल्या. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनमोल योगदान दिले.)

मोबाईल – 9881943593


विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!