दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 27 जुलै 2025; वार : रविवार
भारतीय सौर : 05 श्रावण शके 1947; तिथि : तृतीया 22:41; नक्षत्र : मघा 16:22
योग : वरियान 27:12; करण : तैतील 10:36
सूर्य : कर्क; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:13; सूर्यास्त : 19:16
पक्ष : शुक्ल; मास : श्रावण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
आदित्य पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
दिनविशेष
संख्याशास्त्रज्ञ पांडुरंग वासुदेव सुखात्मे
टीम अवांतर
पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा जन्म 27 जुलै 1911 रोजी सातारा जिल्ह्यातील बुधगाव येथे झाला. त्यांनी गणित मुख्य तर भौतिकशास्त्र उपविषय घेऊन मुंबई विद्यापीठातून पदवी मिळवली. त्यानंतर लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजमधून पीएच. डी. आणि डी. एससी या पदव्या मिळवल्या. इंग्लंडहून भारतात परतल्यावर सुखात्मे यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे तेव्हाचे उपकुलगुरू, पंडित मदन मोहन मालविय यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर सुखात्मे यांनी शेती, पशुपालन, पोषण आणि जनआरोग्य, औषधे तसेच समाजविज्ञान ही क्षेत्रे सांख्यिकीतील आपल्या कार्यासाठी निवडली. ते 1951 पर्यंत इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्चचे (आयसीएआर) आयसीएआरचे सांख्यिकी सल्लागार होते. कापूस, गहू, भात इत्यादी पिकांच्या कापणीच्या प्रायोगिक पद्धतींचा अभ्यास करून धान्योत्पादनाचे अंदाज बांधण्यासाठी सुखात्मे आणि विनायक गोविंद पानसे यांनी भारतातील सर्वेक्षणांची पद्धत आखून दिली. सुखात्मे यांनी 1950मध्ये समुद्री मासेमारीचे मासिक-अंदाज बांधण्याचे वस्तुनिष्ठ तंत्र विकसित केले. सुखात्मे 1951मध्ये रोममधील फाओच्या (FAO – Food and Agricultural Organisation) सांख्यिकी विभागाचे प्रमुख झाले. तिथेच संचालकपदावर त्यांनी 1971 सालाच्या निवृत्तीपर्यंत काम केले. निवृत्तीनंतर भारतात परतल्यानंतर, गरीबच गरीबांना मदत करू शकतात, या उक्तीवरील विश्वासातून त्यांनी इंदिरा सामूहिक स्वयंपाकघर हा स्वयंपूर्ण प्रकल्प, पुण्यातल्या मंडईत राबविला. या योजनेतून आत्यंतिक गरीबीतील कामगारांना मिष्टान्नासह समतोल आहार, बाजारभावाच्या निम्म्या किमतीत देऊनही, प्रकल्पाच्या पुढील गुंतवणूकीसाठी 2 टक्के नफा उरत होता. सुखात्मे यांना भारत सरकारच्या पद्मभूषण पुरस्काराने तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या हरी ओम आश्रम ट्रस्ट पारितोषिकाने गौरविण्यात आले. 28 जानेवारी 1997 रोजी त्यांचे निधन झाले.
हेही वाचा – Love marriage : जुन्या विचारांना आव्हान देणारं नवं व्हर्जन