दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 20 जुलै 2025; वार : रविवार
भारतीय सौर : 29 आषाढ शके 1947; तिथि : दशमी 12:13; नक्षत्र : कृत्तिका 22:53
योग : गंड 21:47; करण : बव 22:56
सूर्य : कर्क; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:10; सूर्यास्त : 19:18
पक्ष : कृष्ण; ऋतू : ग्रीष्म; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
गायिका गीता दत्त
टीम अवांतर
अल्पायुषी जीवनात आपल्या मधाळ आवाजाने हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या गीता घोष रॉय चौधरी अर्थात गीता दत्त यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1938 रोजी सध्याच्या ढाकामध्ये झाला. एका श्रीमंत जमीनदार कुटुंबात जन्माला आलेल्या गीता दत्त यांचे संगीत शिक्षक हिरेंद्रनाथ नंदी यांच्या मार्गदर्शनाखाली गाण्याचे शिक्षण झाले. पुढे 1942 मध्ये पूर्व बंगाल सोडून त्यांचे सगळे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. त्यानंतर संगीतकार के. हनुमान प्रसाद यांनी 1946 मध्ये सोळा वर्षांच्या गीता दत्त यांना ‘भक्त प्रल्हाद’ या पौराणिक चित्रपटात पहिला ब्रेक दिला. त्यावेळी दोन गाण्यांमधील प्रत्येकी दोन ओळी त्यांच्या वाट्याला आल्या होत्या. पुढे 1947 साली ‘दो भाई’ या चित्रपटातील प्रसिद्ध झालेले ‘मेरा सुंदर सपना बीत गया’ हे गाणे त्यांनी गायले आणि पुढील दोन वर्षांमध्ये जवळपास 37 चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. 1951 साली ‘बाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शक गुरु दत्त आणि त्यांची भेट झाली. या भेटीचे पर्यावसान प्रेमात आणि मग लग्नात झाले. लग्नानंतर गुरू दत्त यांच्या जवळपास सगळ्याच चित्रपटांमध्ये गायिका म्हणून गीता यांचाच आवाज वापरला गेला. 1950च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आणि सर्वाधिक मागणी असलेल्या गायिकांपैकी एक असणाऱ्या गीता दत्त यांची कारकीर्द नंतर झपाट्याने घसरायला लागली. गुरू दत्त यांच्याबरोबरच्या वैवाहिक जीवनातील कुरबुरी आणि त्यातून त्यांना लागलेली मद्यपानाची सवय यामुळे पार्श्वगायनाच्या ऑफर कमी होऊ लागल्या. 1956 साली त्यांना वैयक्तिक दिवाळखोरी जाहीर करावी लागली. पुढे 1964 साली गुरू दत्त यांच्या निधनानंतर गीता यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत गेल्या आणि शेवटी वयाच्या अवघ्या 41व्या वर्षी 20 जुलै 1972 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
हेही वाचा – Discipline : कडक शिस्त… आयुष्याला वळण लावणारी!