Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 29 नोव्हेंबर 2026

    November 29, 2026

    सुख म्हणजे…

    November 28, 2026

    बिर्याणीच्या शहरात भात खाण्याची शिकवणी!

    November 28, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, November 29
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सुख म्हणजे…
    ललित

    सुख म्हणजे…

    प्रदीप केळुस्करBy प्रदीप केळुस्करNovember 28, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    Avaantar, अवांतर, मराठी लेख, मराठी कता, प्रदीप केळुसकर, पती पत्नी, साधेपणातील श्रीमंती, दिखावू श्रीमंती, पैशांच मोल
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सुमती चाळीतील आपल्या बिऱ्हाडी आली. दार बंद करताना तिची नजर समोरील आलिशान बंगल्यातील स्त्रीवर पडली. चेहेऱ्यावर हलकसं हसू आणत सुमतीने आपल्या चाळीतील घराचा पुढचा दरवाजा बंद केला.

    समोरच्या बंगल्यातील ती सुंदर बाई तिला बऱ्याचवेळा दिसायची. या कॉलनीतील रस्त्याच्या एका बाजूला चाळी होत्या आणि विरुद्ध बाजूला आलिशान बंगले होते. सुमतीची तळमजल्यावरची जागा, तिच्या बरोबर समोर हा मुजुमदार यांचा बंगला. बंगल्याच्या पोर्चमध्ये त्यांच्या पाच सहा आलिशान गाड्या दिसायच्या. घरात चार पाच नोकर दिसायचे. शिवाय ड्रायव्हर होतेच. मुजुमदार हे मोठे उद्योगपती. त्यांचे मीरा भाईंदर भागात रेडिमेड कपड्याचे मोठे युनिट होते आणि वांद्रे, दादरमध्ये शोरूम्स!

    अर्थात, हे तिला तिच्या नवऱ्याने अमितने सांगितलेले. तिचे लहानपण कोकणात गेलेले, माहेरी गरीबी, मोन्टेसरीचा कोर्स केल्याने मुंबईत लग्नानंतर तिला मोन्टेसरीत नोकरी लागलेली. नवरा अमित ठाण्याला वागळे इस्टेटमध्ये एका औषध कंपनीत. ती सकाळी सातला घराबाहेर पडायची, त्याच्या आधी जेवणाचे डबे करून जाई.. नवरा अमित नऊ वाजता डबा घेऊन बाहेर पडे. तिची शाळा सुटली म्हणजे ती बारापर्यत घरी येई.

    हेही वाचा – एक छोटी सी बात!

    दुपारी बारानंतर ती एकटीच असायची. जेवून झाले की, रेडिओ लावायची. बातम्या, हिंदी गाणी ऐकायची. आजूबाजूला बऱ्याचजणांनी टीव्ही घेतले होते, पण त्यांनी अजून घेतला नव्हता. तसे दोघांचे पगार कमी होते आणि अमितच्या घरी पैसे पाठविणे आवश्यक होते.

    सुमतीला आपल्या समोरच्या बंगल्यातील स्त्रीचे कौतुक वाटे. सकाळी ती शॉर्टपॅन्ट घालून खेळायला जाई. कधी ड्रायव्हरसह बाहेर जाई किंवा मस्त कपडे घालून गार्डनमध्ये बसलेली असे. आजूबाजूला नोकरवर्ग फिरत असे. मुजुमदार क्वचितच दिसत. बऱ्याचवेळा रात्रीची ती दोघे पार्ट्यांना जात… उशिरा घरी येत.

    अशीच एका सोमवारी ती नेहेमीप्रमाणे शाळेतून आली आणि खोलीचा दरवाजा उघडता उघडता समोरच्या बंगल्यातील कुत्री मागून तिची साडी ओढू लागली, दचकून तिने मागे पाहिले, तर कुत्री आणि तिच्यापाठोपाठ एक नोकर धावत आला… त्या नोकराने ती कुत्री उचलली, तेवढ्यात समोरची मालकीण पण गेटकडे आली. तिच्याकडे पहात म्हणाली,

    “कुछ तकलीफ नहीं हुई ना?”

    “नहीं तो…”

    “आओ ना घर. शरबत लेते है”

    “नहीं… नहीं…”

    “आओ ना, हमेशा देखती हूं सामने, मगर पहचान नहीं…”

    तिच्या परत परतच्या आग्रहाने सुमती त्या बंगल्याच्या गेटमधून आत गेली. तिने सुमतीला हॉलमध्ये नेलं. त्या हॉलमधील श्रीमंती पाहून ती चाट पडली. महागडे झुंबर… गालिचे… फर्निचर… पेंटिंग्स…. नोकर…

    “बैठो… क्या नाम है तुम्हारा?”

    “सुमती.”

    “मैं साधना, साधना मुजुमदार. हमारे गारमेंट्स के युनिट्स हैx और शो रूम्स हैं…”

    “हां, मेरे पतीने बोला है मुझे.”

    “क्या करते है तेरे पती? नौकरी करते है क्या?”

    “हां. ठाना में एक कारखाना में…”

    “और तुम?”

    “मै टीचर हूं!”

    “मै देखती हूं, तुम पुरा दिन काम करती हो, कोई नौकरानी नहीं है क्या?”

    “नहीं. हमारे इतनी कम सॅलरी में…”

    “कितना कमाते हो तुम दोनो मिलके?”

    “पचीस हजार”

    “बस? इतना ही? कैसा मॅनेज कर लेते हो तुम लोग?”

    “नौकरी में कितना मिलेगा? नया नया नौकरी है, और गांव भेजना पडता है, इनके घर…”

    “मेरे हजबन्ट मुझे पाच लाख देते है, लेकिन वो भी मुझे कम लगते हैं, हर चार दिन में पार्टी होती हैं… पिकनिक्स है… मॉल पर्चेसे है…”

    “तुम्हारे बच्चे?”

    “हमने डून के स्कूल में रखें है उन्हें”

    “ठीक आहे… मी जाते…”

    “ऐसी कैसी जायेगी! कुछ लेना पडेगा… क्या लेगी चाय, कॉफी, कोल्ड…?”

    “नको. जाते मी.. जेवायचंय.”

    “लेकिन लेना तो पडेगा… पहली मुलाकात है तुमसे.”

    “कुछ कोल्ड… ऑरंज ज्युस..”

    बाजूलाच उभा असलेला नोकर चटकन आत गेला आणि मस्त ग्लासात ज्यूस घेऊन आला. ज्यूस पिता पिता साधना म्हणाली,

    “ये देखो सुमती… थोडे पैसे में कभी खूष नही होने का.. खुशी के लिये पैसा चाहिये… और वो आसमानसे नही गिरेगा… हसबंड को बोलो पैसा कमावो… ये बीस-तीस हजार में कुछ नहीं होता.”

    “चलते मी…” म्हणत सुमती आपल्या घरी आली.

    सुमतीने जेवण गरम केलं आणि जेवायला बसली… पण आज तिच्या डोक्यात साधना होती. तिची वाक्ये परत परत तिला ऐकू येत होती…

    “तुम्हारे घर में नोकरानी नहीं है क्या? अकेली कितना काम करेगी?”

    “ये देखो सुमती,.. हसबंड को बोलो पैसा कमावो… ये बीस-तीस हजार में कुछ नहीं होता…”

    तिच्या मनाची कुतरओढ होत होती. जन्मापासून कोकणात लहान गावात वडिलांचे लहानसे हॉटेल, त्यात काय होणार? पेज घेऊन दिवस काढले. लग्नानंतर या चाळीत.. .आज श्रीमंती काय असते आणि वैभव काय असते, ते पाहिले. असले वैभव आपल्या नशिबात नाही! साधना नशीबवान… किती गाड्या, त्यापण परदेशी. नोकरचाकर… क्लब्स, पार्ट्या… पिकनिक्स… परदेशी ट्रिप्स… मुले डूनच्या शाळेत…

    साधना म्हणते ते खरे, अमित कसली नोकरी करतो? असली नोकरी करून कधी सुखसोयी मिळतील काय? अजून घरात टीव्ही नाही.. कोण कामाला ठेवलं तर परवडत नाही.. अमितने धडपड करायला हवी… धंदा करायला हवा…

    विचार करता करता पाच वाजले… आता सहा वाजता अमित यायची वेळ झाली. त्याआधी रात्रीचे जेवण… उद्याच्या डब्याची तयारी… भाजी मोडून ठेवायला हवी… दळण चक्कीवार द्यायला हवं… कपडे धुवायला हवेत… एक का दोन… हजार कामे!

    साडेसहा वाजता अमित आला. रोज अमित आला की, ती चहा करायची… मग चहा घेताघेता गप्पा दिवसभराच्या… तो कंपनीतील गमतीजमती सांगे, ती ऐके… मग ती शाळेतील गोष्टी सांगे… हा वेळ त्यांचा छान जायचा.

    हेही वाचा – सगेसोयरे…

    आज अमित आला तरी  सुमतीने लक्ष दिले नाही. ती पीठ चाळीत बसली. ती गप्प आणि दमलेली पाहून अमित म्हणाला..

    “आज दमलीस की काय?”

    चिडून सुमती म्हणाली, “एकटे माणूस दमणार नाही काय?”

    अमितच्या लक्षात आले, सुमती खरेच दमली आहे, नाहीतर ती चिडणारी नाही..

    “खरे आहे, तुला एकटीला खूप काम पडते.. नोकरी करून घरातील सर्व… आपण एखादी बाई बघू तुझ्या मदतीला…”

    “बाई परवडणार आहे का आपल्याला? आपले पगार ते किती?”

    अमितच्या लक्षात आले, सुमती खरोखर चिडली आहे आज. नाहीतर या आधी ती अशी कधी बोललेली नाही..

    “होय, खरे आहे.. पगार काय एकदम वाढत नाही.. पण खर्च कमी करू शकतो आपण.. मी माझे खर्च कमी करतो. म्हणजे कंपनीतील चहा बंद… कपडे बाहेर इस्त्रीला देणे बंद… रिक्षा बंद… दाढी बाहेर करणे बंद… कधी कधी मित्रासमवेत एखादी बिअर व्हायची ती बंद… नवीन कपडे बंद… असे पैसे वाचवले की, घरकामाला बाई ठेऊ शकतो आपण… नव्हे ठेऊयाच! तू आजूबाजूला येणाऱ्या बाईकडे लक्ष ठेव आणि तिला यायला सांग.”

    सुमतीच्या मनात आले, ‘आपल्यासाठी स्वत:चे छोटे-मोठे खर्च बंद करू शकणारा आपला नवरा साधा आहे बिचारा. कधी आवाज वाढवून बोलणार नाही… आपण त्याच्यावर उगाच चिडलो.’

    रात्री जेवताना तिने नवऱ्याला मुजुमदार यांच्या घरी गेल्याचे सांगितले आणि त्यांच्या वैभवाचे आणि साधनाचे वर्णन केले… रोज सारखी तिला झोप येईना. तिच्या डोळ्यासमोर मुजुमदरांचा बंगला… गाड्या… उंची फार्निचर येत राहिले. हिऱ्याच्या अंगठ्या घातलेली आणि फळांचा ज्यूस पिणारी साधना दिसत राहिली… मर्सिडिझ गाडीतून फिरणारे मुजुमदार दिसू लागले…

    दुसऱ्या दिवशी तिचे शाळेत लक्ष लागेना. जेवण गोड लागेना… कसले काम करावेसे वाटेना… अमितच्या लक्षात आले.. सुमतीने मुजुमदारांचा बंगला पाहिला त्या दिवसापासून ती अस्वस्थ आहे… कदाचित तशी श्रीमंती तिला हवी असेल.. पण आपल्या पगारात तिला कसली सुखे देणार?

    शनिवारी अमित लवकर घरी आला.. तिला म्हणाला,

    “चल, आज थोडे फिरून येऊ… नवीन पार्क झाला आहे, तो पाहू… बाहेरच जेऊ.”

    ती पण खूश झाली. किती दिवसांत गाडीने नाहीच, पण पायी पण फिरायला गेलो नाही.. तिने तयारी केली आणि दोघे फुटपाथवरून हातात हात घेऊन चालू लागली… काळोख पडू लागला होता आणि रस्ते गाड्यांनी… माणसांनी भरून वाहत होते. वाटेत कपड्यांची, दागिन्यांची दुकाने दिसली की, तिचे आसूसलेले डोळे पुढे जात नव्हते.

    पार्कमध्ये जाण्यासाठी त्यांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जायचे होते… म्हणून ती सिग्नलजवळ थांबली. सिग्नल लागला म्हणून अनेक गाड्या थांबल्या होत्या… सिग्नल मिळण्याची वाट पाहात होत्या.. एवढ्यात तिचे लक्ष एका मर्सिंडीजकडे गेले… ती गाडी तिला ओळखीची वाटली.. वाकून पाहिले, तर मुजुमदारसाहेब मागील सीटवर होते आणि त्यांच्या अंगाला खेटून एक टंच तरुणी त्यांच्या खांद्यावर डोके टेकून होती..

    तिने अमितला हाताने गाडीतील मुजुमदार आणि तरुणी दाखवली.

    “तो बघ मुजुमदार, त्या पोरीसोबत मजा मारतोय… बिचारी साधना, घरात त्याची वाट पहात असेल.”

    “साधना काही वाट पहात नाही त्याची. ती एखाद्या तरुण मित्राच्या मिठीत असेल यावेळी…”

    ‘काय?” सुमती किंचाळली..

    “होय! हॆ हायफाय जीवन असेच असते… परत कधीतरी तुला साधना पण दिसेल अशीच…”

    सिग्नल लागला तशी दोघे पलीकडे गेली.. पार्कच्या कोपऱ्यावर एक फुलवाला गजरे-वेण्या घेऊन बसला होता. अमितने त्या गजरेवाल्याकडून मोगरीची एक वेणी विकत घेतली आणि तिथेच सुमतीच्या केसात माळली.

    दोघे पार्कमध्ये गेली.. हिरवळीवर बसली.. भेळवाल्याकडून भेळ घेऊन खाल्ली.. बर्फाचा गोळा संपवला.

    काळोख पडू लागला तशी दोघे निघाली. आता सुमती गप्प गप्प होती… मुजुमदरांचे अंतरंग तिला कळले होते. त्या मानाने आपण किती नशीबवान! आपला नवरा आपल्यासोबत आहे. घरात कामाला बाई ठेवायची म्हणून आपली काटकसर करू लागलाय… चहा बाहेर पिणे बंद केले.. दाढी, इस्त्री बाहेरचे बंद!

    रात्री ती नेहेमीसारखी गप्पा मारत जेवली. अमितने तिला भांडी घासायला, ओटा पुसायला मदत केली.. भांडी स्टॅन्डवर लावली. रात्री झोपायला गेली… तेव्हा तिच्या मनात परत साधनाचे विचार येत राहिले… कसले सुख आणि कसले काय? नवरा दुसऱ्या बाईबरोबर!? त्यापेक्षा आपण सुखी. पैसे कमी असले तरी एकमेकांबद्दल विश्वास आहे, प्रेम आहे… आज पार्कमध्ये जाताना मोगऱ्याची वेणी घेऊन दिली… एवढेच नाही सर्व लोकांसमोर केसात माळली…

    बाजूला झोपलेल्या अमितबद्दल तिच्या मनात प्रेम दाटून आले.. तिने केसातील मोगऱ्याची वेणी काढून छातीशी धरली आणि ती शांत झोपी गेली.

    Avatar photo
    प्रदीप केळुस्कर

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत. मोबाइल – 9307521152 / 9422381299

    Related Posts

    बिर्याणीच्या शहरात भात खाण्याची शिकवणी!

    November 28, 2026 ललित

    कडवटपणा पलीकडचे प्रेम

    November 28, 2026 ललित

    धोका चेहरा बदलून येतोय!

    November 27, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    बिर्याणीच्या शहरात भात खाण्याची शिकवणी!

    By पराग गोडबोलेNovember 28, 2026

    मध्यंतरी ऑफिसच्या कामासाठी बरीच फिरती सुरू होती. कधी मुंबईतच वेगवेगळ्या ठिकाणी, तर कधी पुण्याला. मजा…

    कडवटपणा पलीकडचे प्रेम

    November 28, 2026

    धोका चेहरा बदलून येतोय!

    November 27, 2026

    तुळशी विवाह : ऐक्याचा मंगल सोहळा…

    November 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 29 नोव्हेंबर 2026

    November 29, 2026

    सुख म्हणजे…

    November 28, 2026

    बिर्याणीच्या शहरात भात खाण्याची शिकवणी!

    November 28, 2026

    खरवस — पौष्टिक पारंपरिक पदार्थ

    November 28, 2026

    कडवटपणा पलीकडचे प्रेम

    November 28, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं लक्ष्याहूनि अनारिसे, बाण लक्ष्यीं शिवोनि जैसें

    November 28, 2026

    POPULAR CATEGORY

    [category_count_style]
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 29 नोव्हेंबर 2026

    November 29, 2026

    सुख म्हणजे…

    November 28, 2026

    बिर्याणीच्या शहरात भात खाण्याची शिकवणी!

    November 28, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.