Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पुन:श्च हरीओम

    November 2, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – प्रभाव, करिअर

    November 2, 2026

    उद्धार

    November 2, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, November 2
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » पुन:श्च हरीओम
    ललित

    पुन:श्च हरीओम

    अतुला प्रणव मेहेंदळेBy अतुला प्रणव मेहेंदळेNovember 2, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मी मराठी, अभिजात मराठी, अतुला प्रणव मेहेंदळे, अतुला मेहेंदळे, लेखिका अतुला प्रणव मेहेंदळे, पुन:श्च हरिओम, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, स्मिताचा निर्णय, अमोल स्मिता, अनाथाश्रमातील सेवा, समाजाचे देणे, सामाजिक भान,
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा,

    पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

    दोष ना कुणाचा…”

    हे बाबूजींचं गाणं ऐकत स्मिता खिडकीत विचार करत उभी होती. तिची पण अशाच प्रकारची अवस्था झाली होती. सौ. स्मिता अमोल तावडे एका खासगी शाळेत गणित विषयाची शिक्षिका होती. तिची साधारणतः 20-22 वर्षं नोकरी झाली होती. घरी तिचा नवरा अमोल तिला खूप सपोर्ट करणारा आणि अगदी प्रेमळ होता. अमोल लहान असतानाच तिचे सासरे गेले. तेव्हा तिच्या सासूबाईंनी खमकेपणाने अमोलला सांभाळलं. सासऱ्यांच्या जागी बँकेत कामाला लागून नोकरी केली. असं अमोल आपल्या आईविषयी सर्वांना अभिमानाने सांगायचा. त्यामुळे स्मिताच्या सासूबाईंना नोकरी करण्याचं महत्त्व माहिती होतं. त्याही नोकरी करत असताना आणि नंतर स्वेच्छानिवृत्त्ती घेतल्यावरही स्मिताला पूर्ण सहकार्य करायच्या.

    स्मिताचा मुलगा नीरवला त्यांनी खूप छान सांभाळलं. त्यामुळे स्मिताला एकमार्गी नोकरी करता आली. पण अचानक तीन वर्षांपूर्वी स्मिताच्या सासूबाईंना मणक्याचं कधीही भरून न येणार दुखणं निघालं आणि सगळं घर कोलमडलं. ज्या दिवशी त्यांना हे कळलं त्यानंतर आठवडाभर स्मिताने तारेवरची कसरत करून बघितली. तिला आजपर्यंत कायमच सासूबाईंचा भक्कम पाठिंबा होता, त्यामुळे सगळं एकटीने करायची वेळच आली नाही. शिवाय, सासूबाईंकडे म्हणावं तितकं लक्ष देता येत नव्हतं, याची बोच तिला सतावत होती. शेवटी आठवडाभराने तिने सगळ्यांना बसवून सांगून टाकलं, “आई, अमोल मी एक ठरवलं आहे आणि उद्या जाऊन त्या निर्णयाची पूर्तता करणार आहे.”

    हेही वाचा – अधिक मासाचं अनोखं वाण… जावयाकडून!

    स्मिताच्या सासूबाई म्हणजेच कुमुद ताई आणि अमोल एकमेकांकडे नुसतेच बघत बसले. तसंही कुणालाच काही दिवसांपासून काहीच सुचत नव्हतं. त्यात आता ही काय सांगते यावर दोघे विचार करत बसले. तेव्हा स्मितानेच सांगितलं, ” मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अजून नोकरीची चांगली 10-12 वर्षं शिल्लक आहेत. पण तरी मला हा निर्णय घेण्यावाचून काहीच पर्याय दिसत नाहीये. आई आता तुमच्या आजारपणात तुम्हाला माझी जास्त गरज आहे आणि त्यासाठी मी हा निर्णय घेत आहे. मीही आता विशीत नाहीये की, सगळीकडे हिरीरीने धावेन आणि शरीर काहीच कुरबुर करणार नाही… त्यामुळे मला नोकरी सोडण्याचा निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे.”

    तिच्या शेवटच्या शब्दांमध्ये असलेली हतबलता आणि डोळ्यांतून नकळत वाहणारी अगतिकता दोघांना खूप काही सांगून गेली. त्यावेळी कुमुद ताई आणि अमोल दोघांनी वेगवेगळे पर्याय सुचवले. पण हिला कुठल्याही बाईच्या ताब्यात सासूबाईंना द्यावं, असं वाटत नव्हतं. शेवटी कामाला ठेवलेली बाई आणि सून यात आपणच जास्त चांगलं करू हा विश्वास तिला होता. अखेर तो निर्णय तिने सगळ्यांच्या गळी उतरवलाच!

    सासूबाईंना कोण आनंद झाला. अशी सून मिळणं खरंच भाग्याचं. नाहीतर आजकाल कुठे करतात सूना. त्यात नोकरी सोडायला लागतेय म्हटल्यावर तर अजिबातच नाही! अमोल आणि नीरव आपापली नोकरी आणि शिक्षण सांभाळून जमेल तशी मदत करत होतेच. कुमुद ताई मात्र सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्यांना सुनेचं कौतुक सांगत रहायच्या. इतकं सगळं करूनही त्यांची तब्येत म्हणावी तशी सुधारत नव्हती, हीच काय ती चिंतेची बाब होती.

    सहा महिन्यांपूर्वी स्मिता आणि अमोल रात्री झोपेत असताना अचानक कुमुद ताईंचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. दोघे तडक पोहोचले आईच्या खोलीत. पण देवाजीच्या मनात वेगळेच होते. कुमुद ताईंचा जीव कुडीतून केव्हाच बाहेर पडला होता…

    हे सगळं आत्ता ही आठवून स्मिताला भरून येत होतं. त्यात बाबूजींच्या गाण्याचे बोल तिला आणिकच विद्ध करत होते. किती खरं आहे… आपण नोकरी सोडली, सासूबाईंना काय हवं नको ते सगळं केलं, पण त्यांच्या शेवटच्या क्षणी काही म्हणजे काही करू शकलो नाही आपण! खरंच, किती पराधीन आहोत आपण. आयुष्यभर नुसतंच मी आणि माझं करत बसतो पण जातानाचे क्षण कसे असतील, याबाबत काहीही आपल्या हातात नाही. ‘मी पणा’ इथेच सोडून जावं लागतं. असा निराश विचार करतच ती कामाला उठली.

    आताशा स्मिताला घर खायला उठत होतं. नीरव आणि अमोल दोघेही नोकरीवर जात होते. आणि अख्खा दिवस हिला भकास रिकामा वाटायचा. असं रिकामं बसण्याची सवयच नव्हती तिला पहिल्यापासूनच. काहीतरी वेगळं, नवीन करावं असं तिला सारखं वाटत होतं. याबाबत रात्री जेवण झाल्यावर तिने अमोलकडे विषय काढायचं ठरवलं. जेवणं झाली. थोड्या वेळाने नीरव त्याच्या खोलीत जाऊन झोपला. आता आजीची खोली त्याला मिळाली होती त्यामुळे तो खोलीतच जास्त असायचा. अमोल खिडकीतून बाहेर बघत उभा होता तेव्हाच स्मिताने विषय काढला…

    “अमोल, मला तुझ्याशी बोलायचं आहे.” त्यावर अमोल लगेच मागे वळून म्हणाला, “अगं, खरंतर मलाही तुझ्याशी परवापासून बोलायचं आहे. पण कसं बोलू तेच कळत नाहीये.”

    “का रे काय झालं? बोल ना. काही त्रास आहे का नोकरीत? जाऊदे अशीही दोन-तीनच वर्षं राहिली आहेत. काढ कशीतरी करत…” त्यावर अमोल म्हणाला, ” अगं कुठून कुठे पोहोचतेस तू! मला माझ्या नोकरीबद्दल नाही, तुझ्या नोकरीबद्दल बोलायचं आहे. तू घरात एकटीच असतेस. एखादी साधीशी नोकरी का नाही बघत तू. आपल्याला पैशांची गरज नाहीये, पण तुझा वेळ जाईल चांगला म्हणून म्हणतोय. आता आईची जबाबदारी पण नाहीये.”

    हेही वाचा – आईचं वाण…

    स्मिता अवाक् झाली… “अरे, कसली टेलीपथी आहे. मी ही याचबाबतीत बोलणार होते. नाही म्हणजे नोकरी करण्यासंदर्भात नाही… आणि आता अशीही मला या पन्नाशीत कोण देणार नोकरी. त्यापेक्षा माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. मी आशूसोबत काम करायचं, असं ठरवलं आहे.”

    अमोल विचारात पडला. त्यावर स्मिताच पुढे बोलली, “अरे असं काय? आशू म्हणजे अश्विनी रे… माझी मैत्रीण. तिने वर्षभरापूर्वीच मला तिच्या अनाथालयात मदतीला येशील का विचारलं होतं. तेव्हा आईंचं सगळं करायला लागायचं म्हणून मी नाही म्हणाले. पण तिला अशा मदतनीस सारख्याच लागतात. मी तिथे गेले तर माझा वेळ जाईल त्या मुलांच्यात आणि त्यांना माझ्या शिक्षकी पेशाचा छान उपयोग होईल. काहीतरी विषय शिकवता येईल मला. नाहीतर माझा हातखंडा असलेला विषय गणित आहेच. तो तर मुलांना भविष्याच्या दृष्टीने शिकवायला हवाच. मला ही छान वाटेल शिकवल्याने. शेवटी ज्ञानदान श्रेष्ठ दान. कशी वाटते आहे कल्पना?”

    अमोलला ही कल्पना खूप आवडली. त्याने हळूच स्मिताला जवळ घेत कानात कुजबुजला, “हो! तू नक्कीच जा तिकडे. होऊन जाऊदे आमच्या बाईसाहेबांचा पुन:श्च हरीओम! आता काय मॅडम म्हणतील ते ऐकायलाच लागेल. नाहीतर रात्र खराब जाईल ना माझी.” त्यावर स्मिता त्याच्या कुशीत शिरत म्हणाली, “चल चावट. तुला तर चान्सच हवा असतो मला चिडवण्याचा आणि जवळ घेण्याचा.”

    स्मिताच्या मनात आज बरेच वर्षांनी नवी आशा पल्लवित होत होती. पुन्हा त्याच जोमाने ती सज्ज झाली होती. तिला खात्री होती तिच्या सासूबाई असत्या, तर त्यांना स्मिताचा हा निर्णय नक्कीच आवडला असता…

    Avatar photo
    अतुला प्रणव मेहेंदळे

    अतुला प्रणव मेहेंदळे या ठाणे स्थित प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहेत. त्या 15 वर्षांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रात आहेत. शिवाय, त्या LLB शिकलेल्या आहेत. मराठी लेखनही गेली काही वर्ष करत आहेत. वाचन, जुनी गाणी ऐकणे, फिरणे असे इतर छंदही जोपासले आहेत. त्यांना लिखाणाची आवड आहे. त्यांच्या बऱ्याच कथांचं अभिवाचन वेगवेगळ्या ठिकाणी, Social media, You Tube इत्यादींवर केलं जातं. तसेच, दिवाळी अंक, वर्तमानपत्रात विविध कथा छापून येतात. त्यांना राज्यस्तरीय कथा स्पर्धेत पुरस्कार मिळाला आहे. काही ठिकाणी वक्तृत्व स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही बोलावले जाते. जे त्यांचा अनुभव अजूनच संपन्न करून जाते. आतापर्यंत 60हून अधिक कथा लिहून आणि प्रसिद्ध करून झाल्या आहेत. व्यावसायिक कथालेखन न करता समाजाला आवडेल, रुचेल आणि कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, या हेतूने लघुकथा लिहिल्या आहेत. वय कमी असूनही लिखाणाचा सुरू झालेला हा प्रवास असाच पुढेही सुरू राहो.

    Related Posts

    उद्धार

    November 2, 2026 ललित

    Bookshelf : ‘सेतू’… कथानकाची घट्ट वीण असलेली कादंबरी

    November 1, 2026 ललित

    आठवणींची पेटी… आकाशफुले

    November 1, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    उद्धार

    By डॉ. शिरीष कुलकर्णीNovember 2, 2026

    उत्तरार्ध सदानंदच्या मागे संकटे लागली होती. त्यात तो हतबल होता. तो पत्रिकेच्या घड्या उघडत होता…

    Bookshelf : ‘सेतू’… कथानकाची घट्ट वीण असलेली कादंबरी

    November 1, 2026

    आठवणींची पेटी… आकाशफुले

    November 1, 2026

    मिता आवडत होती, पण…

    October 31, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    पुन:श्च हरीओम

    November 2, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – प्रभाव, करिअर

    November 2, 2026

    उद्धार

    November 2, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : आधणीं घातलिया हरळ, होती अमृताचे तांदुळ

    November 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 नोव्हेंबर 2026

    November 2, 2026

    Bookshelf : ‘सेतू’… कथानकाची घट्ट वीण असलेली कादंबरी

    November 1, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 491
    • अवांतर 217
    • आरोग्य 167
    • पंचांग आणि भविष्य 659
    • फिल्मी 77
    • फूड काॅर्नर 263
    • मैत्रीण 34
    • ललित 1035
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    पुन:श्च हरीओम

    November 2, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – प्रभाव, करिअर

    November 2, 2026

    उद्धार

    November 2, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.