दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 25 ऑक्टोबर 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 03 कार्तिक शके 1948; तिथि : चतुर्दशी 11:56; नक्षत्र : रेवती 19:21;
- योग : हर्षण 17:21; करण : विष्टि 22:52;
- सूर्य : तुळ; चंद्र : मीन 19:21; सूर्योदय : 06:35; सूर्यास्त : 18:10;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
कोजागरी पौर्णिमा
पौर्णिमा प्रारंभ सकाळी 11:56
आकाश दीपदान
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
पेडल सायकलचे संशोधक पिअर लालमेंट
टीम अवांतर
पेडल सायकलचे संशोधक पिअर लालमेंट यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1843 रोजी फ्रान्समधील नॅन्सी जवळ पोंट-ए-मॉसन येथे झाला . 1862 मध्ये नॅन्सीमध्ये बाळांच्या गाड्या बनवण्याचे काम करत असताना लालमेंट यांनी एका व्यक्तीला डॅडी हॉर्स चालवताना पाहिले. डॅडी हॉर्सला सायकलचे पूर्वज मानले जाते आणि त्यामध्ये चालकाला स्वतः चालून वाहन पुढे न्यावे लागत असे. लालमेंट यांनी या पाहिलेल्या गोष्टीत बदल करून पुढच्या चाकाच्या हबला जोडलेले रोटरी क्रँक मेकॅनिझम आणि पेडल्स असलेले ट्रान्समिशन जोडले आणि अशा प्रकारे पहिली खरी सायकल तयार केली.
हेही वाचा – माहेर… जिथे लेकीचं वय वाढतं, पण मन लहानच राहतं!
1863 साली ते पॅरिसला आले आणि तिथे त्यांचा ऑलिव्हियर बंधूंशी संपर्क आला असे मानले जाते. ऑलिव्हियर बंधूंना त्यांच्या शोधात व्यावसायिक क्षमता दिसली. ऑलिव्हियर बंधूंनी दोन चाकी सायकलचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी पिएर मिशो यांच्यासोबत भागीदारी केली.
या सायकलींच्या उत्पादनासाठी लालमेंट यांनी 1864 साली नव्याने तयार केलेल्या डिझाइनचा वापर केला गेला की मिशो यांच्या दुसऱ्या डिझाइनचा यावर अजूनही वाद सुरू आहे. एका मत प्रवाहानुसार लालमेंट यांनी स्वतः मिशो यांच्याकडे काही काळ कर्मचारी म्हणून काम केलेले असू शकते. त्या काळात अशुद्ध लोखंडापासून बनलेल्या चाकांचा हा शोध प्रचंड लोकप्रिय झाला आणि लोकांनी त्याला ‘बोनशेकर’ (Boneshaker) असे संबोधले, कारण त्याचे लोखंडी आणि लाकडी चाक खडबडीत रस्त्यांवरून जाताना खूप धक्के द्यायचे. मार्गारेट गुरॉफ यांच्या ‘द मेकॅनिकल हॉर्स’ नावाच्या पुस्तकातील सायकलींचे नावीन्य आणि त्यांची सुरुवातीची अस्थिरता या दोन्ही मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
लालमेंट जुलै 1865 मध्ये फ्रान्स सोडून अमेरिकेला गेले आणि कनेक्टिकटमधील ॲन्सोनिया येथे स्थायिक झाले, जिथे त्यांनी त्यांच्या सायकलची एक सुधारित आवृत्ती तयार केली आणि तिचे प्रात्यक्षिक देखील दाखवले. न्यू हेवनचे जेम्स कॅरोल यांच्या आर्थिक मदतीने, त्यांनी एप्रिल 1866 मध्ये पेडल सायकलसाठी सर्वात पहिला आणि एकमेव अमेरिकन पेटंट अर्ज दाखल केला. 20 नोव्हेंबर 1866 रोजी त्यांचा पेटंट अर्ज मंजूर झाला. आणि पेडल सायकलचे पेटंट त्यांना मिळाले.
हेही वाचा – ब्रेड आवडतो? मग विकत घेताना ‘या’ गोष्टी नक्की तपासा…
त्यांच्या पेटंटमधील रेखाचित्रात लंडनच्या डेनिस जॉन्सनने बनवलेल्या डँडी-हॉर्सच्या शैलीशी मोठे साम्य असलेले एक यंत्र दाखवले आहे , ज्याची फ्रेम सर्पिलाकार आहे. मात्र त्यात दोन गोष्टींमुळे फरक होता, पहिली म्हणजे पेडल आणि क्रँकची भर, आणि दुसरी म्हणजे फ्रेमच्या वर एक पातळ लोखंडी पट्टी होती जी स्प्रिंग म्हणून काम करत होती, ज्यावर त्यांनी अधिक आरामदायक प्रवासासाठी सॅडल बसवले होते. पेटंट मिळून देखील आपल्या यंत्राचे उत्पादन करण्यासाठी अमेरिकन उत्पादकांना रस नाही हे लक्षात आल्यावर, लालमेंट 1868 मध्ये पॅरिसला परतले.
मात्र त्याच वेळी मिशो सायकलींमुळे फ्रान्समध्ये सायकलींची पहिली लाट येत होती , आणि हीच लाट नंतर उर्वरित युरोप आणि अमेरिकेतही पोहोचली. लालमेंट 1880 पूर्वी कधीतरी पुन्हा अमेरिकेत परतले खरे मात्र यावेळी कारण वेगळेच होते. अल्बर्ट पोप या अमेरिकन व्यावसायिकाने प्रतिस्पर्धी सायकल विक्रेत्यांविरुद्ध खटले दाखल केले, आणि नंतर प्रति युनिट 10 डॉलरच्या रॉयल्टी शुल्काच्या बदल्यात ते खटले मागे घेण्यास सहमती दर्शवली. या खटल्यात लालमेंट यांचे पेटंट देखील अडकले. पुढे त्यांनी आपल्या पेशंटचे हक्क पोप यांना विकले. 29 ऑगस्ट 1891 रोजी लालमेंट यांचे बोस्टन मधील वास्तव्यात निधन झाले.
डेव्हिड व्ही. हर्लिही यांनी 11 ते 16 ऑक्टोबर, 1993 रोजी बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे झालेल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग इतिहास परिषदेत पुरावा सादर केला की लॅलेमेंट यांनाच डॅन्डी घोड्याला पेडल लावण्याचे श्रेय दिले पाहिजे. त्यामुळे बॉस्टनच्या बाईक नेटवर्कचा फॉरेस्ट हिल्स ते बॅक बे पर्यंत साउथवेस्ट कॉरिडॉर पार्कमधून जाणाऱ्या साडेतीन मैलांचा भागाला पियरे लालमेंट बाईक पाथ असे नाव देण्यात आले. याशिवाय 2005 मध्ये लालमेंट यांचे नाव युनायटेड स्टेट्स बायसायकलिंग हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले.


