Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मानसची क्लास ॲडमिशन

    October 21, 2026

    एन्ट्री आणि एक्झिट…

    October 21, 2026

    संपला गं नवरात्रौत्सव!

    October 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, October 22
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 ऑक्टोबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 ऑक्टोबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 21, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 21 ऑक्टोबर 2026; वार : बुधवार
    • भारतीय सौर : 29 आश्विन शके 1948; तिथि : दशमी 14:11; नक्षत्र : धनिष्ठा 19:46;
    • योग : गंड 24:32; करण : वणिज 26:35;
    • सूर्य : तुळ; चंद्र : मकर 06:59; सूर्योदय : 06:33; सूर्यास्त : 18:13;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    गायक आणि संगीतकार राम फाटक

    टीम अवांतर

    मराठीतील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार रामचंद्र कृष्णाजी ऊर्फ राम फाटक यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1917 रोजी झाला.  क्रमिक विद्याशिक्षण चालू असतानाच रामभाऊ यांनी पुण्यात राहून ग्वाल्हेर गायकीचे धडे घेतले. त्यांचा आवाज ऐकून बालगंधर्व यांनी त्यांना आपल्या नाटक कंपनीत येण्याचे निमंत्रण दिले. मात्र आपल्या शिक्षणाचे कारण देत त्यांनी बालगंधर्व यांना नकार दिला. नोकरी करत असतानाही त्यांची संगीताची ओढ कमी झाली नव्हती. 1945 मध्ये एचएमव्हीने त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका प्रकाशित केली आणि रामभाऊंना आपले जीवनाचे ध्येय सापडले.

    शिक्षणाने एम.ए., बी.टी. असलेल्या राम फाटक यांनी काही वर्षे शिक्षकी पेशा स्वीकारला. नंतर 1956 पासून पुढची 10 वर्षे नागपूर आकाशवाणी केंद्रावर तर त्यापुढील 10 वर्षे पुणे आकाशवाणीवर त्यांनी नोकरी केली. इथेच भास्करराव गोडबोले आणि जे.एल. रानडे यांच्या सारख्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. पुणे आकाशवाणी केंद्रावर असतानाच ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि नंतर स्नेह जुळला. सुधीर फडके यांच्या ‘गीतरामायण’मधील काही गाणी रामभाऊ यांनी गायली. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी त्यांनी शास्त्रीय संगीत गायिका बेगम परवीन सुलताना यांच्याकडून काही मराठी भावगीते देखील गाऊन घेतली.

    हेही वाचा – फक्त पोटच्या लेकरासाठी…

    1972 साली नवोदित गीतकार सुधीर मोघे यांच्या ‘सखी मंद झाल्या तारका’ या गीताला राम फाटक यांनी स्वरबद्ध करून भीमसेन जोशी यांच्याकडून हे गाणे गाऊन घेतले होते. पुढे हे गाणे अल्बममध्ये घेतले तेव्हा सुधीर फडके यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून प्रकाशित करण्यात आले.

    रामभाऊ यांनी ’संतवाणी’ या अल्बममधील ‘तीर्थ विठ्ठल’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘पंढरी निवासा’, ‘अणुरेणीया थोकडा’ हे पंडित भीमसेन जोशींकडून गाऊन घेतलेले अभंग खूपच लोकप्रिय झाले. याखेरीज ‘दिसलीस तू’, ‘डाव मांडून भांडून मोडू नको’ आणि ‘सखी, मंद झाल्या तारका’ ही सुधीर फडके यांनी गायलेली आणि राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेली भावगीते देखील प्रचंड गाजली.

    अनुष्टुभचा पु. शि. रेगे काव्य पुरस्कार, काव्यशिल्पचा बालकवी निसर्ग काव्य पुस्तक पुरस्कार, सावानाचा कवी गोविंद तसेच छंदोमयी काव्य पुरस्कार, पद्मगंधा प्रकाशनाचा पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना मिळाले. ‘स्वरयात्रा’ या नावाचे त्यांचे आत्मचरित्र देखील प्रसिद्ध झाले आहे. 26 सप्टेंबर 2002 रोजी त्यांचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आज तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल तसेच नवीन संधीही मिळू शकतात. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या कामांना अचानक गती येईल. कामाच्या ठिकाणी इतरांच्या मतांना तुमच्या प्रगतीमधील अडथळा बनू देऊ नका. स्थावर मालमत्तेसंबंधीच्या कागदपत्रांची सखोल तपासणी केल्यावरच पुढे पावले उचला. एखाद्या गोष्टीतील निष्काळजीपणा महागात पडू शकतो, म्हणून प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करा. आज, आत्मविश्वासासोबतच सतर्कता ही तुमची मोठी ताकद असेल.

    वृषभ – आज काहीतरी नवीन करून पाहण्याची तीव्र इच्छा होईल. तुमची विचार करण्याची सवय कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवेल. विद्यार्थ्यांसाठी  आजचा दिवस दिलासा देणारा आहे. मानसिक ताण कमी झाल्यामुळे एकाग्रता वाढेल आणि अपूर्ण राहिलेली ध्येये पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तुमचा शांत स्वभाव आणि समजूतदारपणा यामुळे दिवस अधिक चांगला बनेल.

    मिथुन – आज प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचला. वडिलांशी एखाद्या गोष्टीवरून मतभेद असले, तरी संवाद सुरू ठेवल्याने नात्यातील तणाव कमी होऊ शकतो. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळेल. गाडी चालवताना घाई करणे टाळा, स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला गांभीर्याने घेणे फायदेशीर ठरेल.  शहाणपणाने उचलेले पाऊल यशाच्या जवळ घेऊन जाईल.

    कर्क – आज जोडीदाराच्या करिअरमधील मोठ्या यशाची किंवा बढतीची बातमी मिळू शकते, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. एखाद्या विशेष प्रसंगाचे आज घरात सेलिब्रेशन होऊ शकते. स्वतःची ध्येये साध्य करण्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त मेहनत करावी लागू शकते. प्रत्येक मोठ्या यशामागे संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न असतात हे आज लक्षात ठेवा. प्रियजनांचा पाठिंबा आज तुमची शक्ती बनेल. तुमच्या मेहनतीचे फळ भविष्यात नक्कीच मिळेल.

    सिंह – आज, तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य यामुळे अनेकजण प्रभावित होतील. हाती घेतलेल्या कोणत्याही कामात स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. मात्र इतरांकडून काम करून घेण्यासाठी आणि त्यांना तुमची मते पटवून देण्यासाठी संयम तितकाच महत्त्वाचा आहे. अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवणे टाळा. एखादी कौटुंबिक बाब काहीशी चिंताजनक ठरू शकते, परंतु तुम्ही संयम आणि समजूतदारपणाने ती सोडवू शकता.

    कन्या – आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे. अशावेळी शांत राहणे फायदेशीर ठरेल. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्साहवर्धक बातमी मिळू शकते, ज्यामुळे त्यांच्या भविष्यातील योजनांना नवी दिशा मिळेल. दीर्घकाळापासून चालत आलेले कौटुंबिक गैरसमज दूर होतील आणि नातेसंबंध अधिक सलोख्याचे होतील,  आज स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. परिस्थिती हळूहळू अनुकूल होईल. कौटुंबिक पाठिंब्यामुळे पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळेल.

    तुळ – आज बडेजाव करण्याची एक छोटीशी इच्छा तुमचे बजेट बिघडवू शकते. एखादे सरकारी प्रकरण किंवा व्यवहाराशी संबंधित वादामुळे काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे, कागदपत्रे, हिशोब आणि महत्त्वाचे निर्णय घेताना अत्यंत सावधगिरी बाळगा. घरी एखाद्या प्रिय पाहुण्याच्या आगमनाने वातावरण प्रफुल्लित होऊ शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. अत्यावश्यक गरजांना प्राधान्य देणे आणि आपल्या आनंदाचा पुरेपूर उपभोग घेणे आज शहाणपणाचे ठरेल.

    वृश्चिक – बऱ्याच काळापासून प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पातील यशामुळे आज आनंद मिळेल. व्यावसायिकांना भागीदारीतून अविक नफा आणि जास्त संधी मिळू शकतात. व्यवसाय वाढवण्याची योजना आखत असाल, तर त्यावर गांभीर्याने विचार करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. नवीन वाहन खरेदी करण्याच्या कल्पनेलाही चालना मिळू शकते. तथापि, कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या गरजा आणि बजेटचा विचार करणे आवश्यक आहे.

    हेही वाचा – शितावरून भाताची परीक्षा

    धनु – आज उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्याची शक्यता आहे, तसेच व्यवसाय करणाऱ्यांनाही प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या सरकारी कामाच्या पूर्ततेच्या दिशेने सकारात्मक प्रगती होऊ शकते. संततीच्या करिअरबद्दल मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यासाठी गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आज अनेक संधी मिळतील परंतु निर्णय घेण्यापूर्वी त्यातील फायदे आणि धोके यांचा विचार नक्की करा.

    मकर – आज तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. त्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे. एखाद्या क्षुल्लक कारणावरून जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात, पण परस्पर संवाद आणि थोड्या संयमाने परिस्थिती निवळेल. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांचा आर्थिक परिस्थितीवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू मजबूत होत जाणार आहे. तुमचा संयम आणि व्यावहारिक दृष्टिकोन अनेक अडचणी कमी करू शकतो.

    कुंभ – गरजू लोकांना मदत केल्याने आज तुम्हाला मनःशांती आणि समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे आपले विचार शांतपणे आणि तर्कशुद्धपणे मांडा. आई तुमच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकते. अंगभूत समजूतदारपणा आणि मेहनत यामुळे तुम्ही ती चांगल्या प्रकारे पार पाडाल. सेवा, सहकार्य आणि जबाबदारी यांच्यात आज योग्य संतुलन राखा. इतरांना मदत करताना, स्वतःच्या कामासाठीही वेळ देणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून दिवसाच्या शेवटी तुम्हाला समाधान आणि आनंद होईल.

    मीन – वाढत्या खर्चामुळे आज तुमच्या आर्थिक चिंता वाढू शकतात, त्यामुळे अनावश्यक खरेदी पुढे ढकलणे आणि तुमच्या आर्थिक बाबींचे नियोजन करणे उत्तम ठरेल. कामाच्या व्यापात  विश्रांतीसाठी वेळ काढावा लागेल.  विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी पूर्वी झालेली एखादी चूक समोर आल्यास, घाबरून जाण्याऐवजी किंवा वाद घालण्याऐवजी, त्याची जबाबदारी स्वीकारा आणि परिस्थिती हाताळा. संयम, समजूतदारपणा आणि आत्मविश्वासाने पुढे जा, त्यामुळेच योग्य संधी साधता येईल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करणारे वास्तुदोष आणि त्यावरील उपाय

    October 21, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 ऑक्टोबर 2026

    October 20, 2026 पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – सार्वजनिक मत, संवाद

    October 19, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करणारे वास्तुदोष आणि त्यावरील उपाय

    By ज्योतिषी हृषिकेश पानकरOctober 21, 2026

    अशी परिस्थिती समजूया की घरातील खोली आधीपासूनच चुकीच्या ठिकाणी आहे. अशा वेळी काय करावे? जर…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 ऑक्टोबर 2026

    October 20, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – सार्वजनिक मत, संवाद

    October 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 ऑक्टोबर 2026

    October 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मानसची क्लास ॲडमिशन

    October 21, 2026

    एन्ट्री आणि एक्झिट…

    October 21, 2026

    संपला गं नवरात्रौत्सव!

    October 21, 2026

    नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करणारे वास्तुदोष आणि त्यावरील उपाय

    October 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अगा अज्ञानाचिया निदा, जो घोरत होता बदबदा

    October 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 ऑक्टोबर 2026

    October 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 477
    • अवांतर 217
    • आरोग्य 161
    • पंचांग आणि भविष्य 640
    • फिल्मी 75
    • फूड काॅर्नर 260
    • मैत्रीण 32
    • ललित 1009
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मानसची क्लास ॲडमिशन

    October 21, 2026

    एन्ट्री आणि एक्झिट…

    October 21, 2026

    संपला गं नवरात्रौत्सव!

    October 21, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.