Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जोखीम

    November 23, 2026

    Recipe : घावन की आंबोळे… काय पसंत आहे?

    November 23, 2026

    जन्मकुंडलीतील 1ला भाव: जीवनाचा सखोल आरसा

    November 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, November 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सासू आणि आई… दोघी सारख्याच!
    ललित

    सासू आणि आई… दोघी सारख्याच!

    हेमा पाटीलBy हेमा पाटीलOctober 9, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी लेख, मराठी आर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, हे बंध रेशमाचे, हेमा पाटील, लेखिका उमा पाटील, उमाची सासू पारूबाई, उमाचे बाळंतपण, उमाचे पहिले बाळंतपण, जावई महेशराव, उमाची शाळा, कौटुंबिक कथा, पहिलटकरीण उमा
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 16

    सकाळी लवकर उठून उमाने स्वयंपाकपाणी आवरले. पारूबाई तिच्या लगबगीकडे पाहात होती, पण काही बोलली नाही.

    “आई, मी उमाला सोडायला जातोय माहेरी,” महेशरावांनी आईला सांगितले.

    “तिला म्हटलं हुतं की, इथंच ऱ्हा म्हनून. सांगितलं न्हाय का तिनं?”

    “तिनं सांगितलं होतं, पण मीच म्हटलं, जा आपली तुझ्या माहेरी. तसं पण पहिलं बाळंतपण माहेरीच असतंय ना? मग कशाला आपण त्रास घ्यायचा? करू दे की, तिच्या माहेरच्यांना!”

    महेशरावांनी घेतलेला पवित्रा उपयोगी पडला. पारूबाईचा नकार होकारात बदलला. जाईपर्यंत सुनेला “काळजी घे. इकडं तिकडं उंडगत बसू नगंस…” असे सल्ले पारूबाई देत होती. एकदाची सुटका झाली म्हणून उमाला आनंद झाला होता. त्या आनंदाच्या भरात ती ‘हो’ला ‘हो’ करत होती. एकदाची घराबाहेर पडल्यावर उमाने सुटकेचा निःश्वास सोडला. ते पाहून महेशरावांनी विचारले,

    “काय झालं? तुरुंगातून सुटका झाल्यासारखी निःश्वास सोडतेयस?”

    हेही वाचा – सासूबाईंची उमावर कृपादृष्टी

    “अहो, त्या जाऊ नकोस म्हणत होत्या ना! एकदाची परवानगी दिली म्हणून सोडला निःश्वास…”

    महेशरावांनी यावर काही विचारले नाही.

    महेशराव तिला सोडून लगेच परतले. तिला एकदम मोकळे मोकळे वाटले. सासरी नांदून आलेल्या लेकीला माहेरी आल्यावर असेच वाटते. आईने तिची अवस्था जाणली आणि तिला विचारले,

    “व्हय गं, तुला खायला काय बनवू?”

    “भजी बनवतेस का? मला खाऊ वाटतायत…” उमा म्हणाली. आईने तत्परतेने उठून सगळी तयारी केली आणि भज्यांचा पहिला घाणा तेलातून काढला की, डिश भरून उमाच्या समोर ठेवली. भजीची प्लेट उचलून तिने नाकापाशी नेली. खोल श्वास घेऊन आपल्या आत तो श्वास तिने आधी मुरवला आणि नंतर भजी तोंडात टाकली. भजी खाणाऱ्या लेकीकडे समाधानाने पाहणाऱ्या आईचे डोळे उगाचच पाण्याने भरून आले.

    सासरी सुबत्ता होती, पण ते सासर होते. सगळ्यांचे जेवण झाल्याशिवाय बायकांनी जेवायचे नाही, भले कितीही भूक लागली तरीही! इथे भज्याचा पहिला घाणा पुढ्यात आला. उमाला वाटले, आता काही दिवस आपण मुक्तपणे वावरू शकतो. सगळं विचारून करण्याची आता आवश्यकता नाही.

    हा तिचा भ्रम होता. तिकडे सासू आणि इकडे आई… दोघीही तिच्यावर करडी नजर ठेवून होत्या. ती हातीपायी नीट सुटावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. तिने हालचाल करावी यासाठी आत्तापर्यंत पारूबाई प्रयत्न करत होती,  आता ते काम उमाच्या आईकडे आले आहे, असे पुढच्या दोन दिवसांत उमाला वाटले.

    हेही वाचा – सासूबाईंनी उमाला माहेरी जाण्यापासून थांबवलं…

    “माहेरी आलो तरीही हा ससेमिरा आहेच…” असे वाटून उमा वैतागून गेली. इकडं जाऊ नगंस, तिकडं जायला नको… मग घरात बसून करायचं तरी काय? हा प्रश्न उमाला पडला. रात्री आई शेजारी कलंडताना तिने विचारले,

    “आई, आपल्या बिब्ब्याच्या झाडाला बिब्ब्या आल्या होत्या का?”

    “व्हय.. आल्या हुत्या. अजूनबी असत्याल झाडावर. का?”

    “काय नाही. झोप आता.”

    तिच्या डोळ्यासमोर ते बिब्ब्यांनी लगडलेले मनोहारी झाड आले. त्या झाडाचे चित्र नजरेसमोर तरळत असतानाच तिची झोप लागली. झोपेतही तिच्या स्वप्नात ते पिवळ्या धमक बिब्ब्यांनी लगडलेले झाड आले होते. ती समाधानाने त्या झाडाकडे पाहत होती.

    क्रमश:
    Avatar photo
    हेमा पाटील

    मी 58 वर्ष वयाची गृहिणी असून, मु. पो. चाफळ, ता. पाटण, जिल्हा सातारा येथे राहते. गेल्या 8 वर्षांपासून सतत लिहिते आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर लिखाण करते. काही काल्पनिक गोष्टी, कथा तसेच लघुकथा लिहिण्यास आवडतात. लिखाण हा छंद असला तरी माझ्यासाठी ते मन मोकळं करण्याचे साधन आहे. माझं लिखाण वाचकांना आवडतं हे लक्षात आल्यावर थोडा आत्मविश्वास वाढला आणि ‘स्वामित्व’ हे माझ्या कथांचं पहिलं पुस्तक 5 डिसेंबर 2025 रोजी प्रकाशित केलं. त्यानंतर चार महिन्यांत म्हणजे 12 एप्रिल 2026 रोजी ‘गुज अंतरीचे’ हे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले. हा कथासंग्रह वेलवेट कविशा पब्लिकेशन संस्थेच्या माध्यमातून झालेल्या वर्ल्ड रेकॉर्डचा एक भाग आहे. एका मंचावर विविध साहित्यिकांच्या पन्नास पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी त्याची नोंद घेतली.

    Related Posts

    जोखीम

    November 23, 2026 ललित

    Bookshelf : ‘कळ्यांचे नि:श्वास’ समाजाला ऐकायला भाग पाडणारा कथासंग्रह

    November 22, 2026 ललित

    सगेसोयरे…

    November 21, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    जोखीम

    By अतुला प्रणव मेहेंदळेNovember 23, 2026

    आज संयोगिताची एका डोळा हसू आणि एका डोळा आसू अशी अवस्था होती. आज तिच्या एकुलत्या…

    Bookshelf : ‘कळ्यांचे नि:श्वास’ समाजाला ऐकायला भाग पाडणारा कथासंग्रह

    November 22, 2026

    सगेसोयरे…

    November 21, 2026

    आठवणींची पेटी… निसर्ग अनुभवणं!

    November 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    जोखीम

    November 23, 2026

    Recipe : घावन की आंबोळे… काय पसंत आहे?

    November 23, 2026

    जन्मकुंडलीतील 1ला भाव: जीवनाचा सखोल आरसा

    November 23, 2026

    लेकीवरच्या प्रेमापुढे…

    November 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : हें पाहाणें ऐसें असे वीरा, जैसा न मोडलिया विहिरा

    November 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 नोव्हेंबर 2026

    November 23, 2026

    POPULAR CATEGORY

    [category_count_style]
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जोखीम

    November 23, 2026

    Recipe : घावन की आंबोळे… काय पसंत आहे?

    November 23, 2026

    जन्मकुंडलीतील 1ला भाव: जीवनाचा सखोल आरसा

    November 23, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.