Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माधवच्या मनात शंकेची पाल चुकचुकली…

    October 2, 2026

    सासूबाईंनी उमाला माहेरी जाण्यापासून थांबवलं…

    October 2, 2026

    विदर्भातील ‘हाडपक्या’ (मस्कऱ्या) गणपतीचा 239 वर्षांचा इतिहास!

    October 2, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, October 3
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » खरी साधना आणि ध्यान
    अध्यात्म

    खरी साधना आणि ध्यान

    डॉ. शिरीष कुलकर्णीBy डॉ. शिरीष कुलकर्णीOctober 1, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, अध्यात्म साहित्य, शिरीष कुलकर्णी, अध्यात्मिक शिरीष कुलकर्णी, माया, द्वैत अद्वैत, आद्य शंकराचार्य माया, ज्ञानाचा प्रकाश, सत्यज्ञान, खरी साधना, साधना आणि ध्यान
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माया / भाग – 6

    अध्यात्मामधला ज्ञानप्रवास तसेच अभ्यास आनंददायी आणि मनःशांती देणाराच ठरतो. आम्ही ज्ञानेश्वरी पारायणाला बसायचो. तेव्हा तिथे आलेले वारकरी संप्रदायातील एक हरी मामा, आम्हाला सांगायचे की, काहीही समजले नाही तरी, सतत श्रद्धेने ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न करायचा. याचा अर्थ असा की, आपल्याला केवळ ज्ञानाची लालसा असेल, आपण ज्ञानग्रहणासाठी पात्र असू, तर ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्यापर्यंत पोहोचतेच. योग्य वेळ आली की, सगळे ज्ञान आपले आपल्याला मिळतेच! पण हे कोणी सांगितलेय, तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे. आपण या जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या तत्त्वज्ञानाकडे वळण्यापूर्वी श्रीमद्भगवद्गीतेतील एका अत्यंत महत्त्वाच्या श्लोकाचे स्मरण करू!

    ज्ञानाचा हा सगळा डोलारा ज्या एका भक्कम पायावर उभा आहे तो पाया म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले तत्त्वज्ञान!

    श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्धयानं विशिष्यते।

    ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम्॥

    – भगवद्गीता

    या श्लोकात साधनेचे अत्यंत सुंदर स्पष्टीकरण स्वतः भगवान श्रीकृष्णांनी दिलेले आहे.

    आपण केवळ यांत्रिकपणे केलेल्या अभ्यासापेक्षा भक्ती आणि श्रद्धेने केलेले वाचन महत्त्वाचे आहे. त्याहून तत्वाचे ज्ञान असणे, हे श्रेष्ठ आहे. नुसत्या ज्ञानापेक्षा त्या ज्ञानाच्या आधारे एकाग्रतेने केलेले ध्यान अधिक श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग सर्वात श्रेष्ठ आहे; कारण आपण फलाची आसक्ती एकदा सोडून दिली की, माणसाला तत्काळ अत्यंत निर्मळ, पवित्र अशी शांती प्राप्त होते. कर्मफलांचा त्याग केल्यावर माणूस पापरहित होतो. कारण त्याच्या मनात मी कर्ता आहे आणि मला हे फळ हवे आहे, हा अहंकार मुळी उरतच नाही.

    आत्माहमिदमैक्येन

    देहात्मत्वं प्रणश्यति।

    त्यजत्येव मनुष्यत्वं

    देहभावात् विमुच्यते॥

    – गीताव्रत

    मी आत्मा आहे, हे अत्यंत पवित्र ज्ञान जेव्हा माणसाच्या मनोहृदयातून विश्वासाने ठाम होईल, तेव्हा आत्मा म्हणजे देह हा आपला जो चुकीचा आणि संकुचित भाव असतो, तो समूळ नष्ट होतो.

    हेही वाचा – अज्ञानाची रात्र संपते, तेव्हा…

    ही अवस्था एकदा प्राप्त झाली की, त्या साधकाची इच्छा असो वा नसो, तो मी केवळ एक सामान्य मनुष्य आहे, या मर्यादित भावनेतून आपोआप मुक्त होतो. ‘मनुष्यत्व’ हे केवळ या हाडामांसाच्या देहाशी, आपल्या मोक्ष प्राप्तीच्या उद्दिष्टापर्यंतच संबंधित आहे. मुळात आपण मनुष्य जन्म घेतला आहे, तो उद्धारासाठी! याच जन्मी प्रत्यक्ष ईशतत्वापर्यंत जाण्यासाठी! आत्म्याचे खरे स्वरूप तर अनंत आणि वैश्विक आहे.

    पावसाचा एक छोटासा थेंब जोवर आकाशातून खाली पडत असतो, तोवर त्याला स्वतःचे एक वेगळे अस्तित्व असते. तो थेंब आहे, हीच त्याची ओळख असते. पण एकदा तो थेंब अथांग समुद्रात जाऊन पडला आणि समुद्राच्या पाण्यात मिसळला की, मग त्याला त्याचे स्वतःचे असे ‘वेगळे वाटत असणारे’ थेंबपण उरत नाही. तो थेंब आता साक्षात अथांग समुद्रच होऊन जातो. थेंब असताना आपण समुद्र होणार आहोत, याची जाणीव त्या थेंबाला नसते… ही जाणीव करून देण्याचे कार्य अध्यात्म करते.

    अगदी तसाच हा ज्ञानी साधक देहभावाच्या पलीकडे जाऊन ब्रह्मभावात कायमचा स्थिरावतो. त्याला मग संसारातील लहानसहान गोष्टी मान-अपमान, सुख-दुःख अजिबात त्रास देऊ शकत नाहीत. कारण, तो स्वतःला एका अत्यंत विराट आणि वैश्विक स्वरूपात पाहू लागतो. त्याचे ‘मी’ पण गळून पडते आणि तो विश्वाशी एकरूप होतो.

    अग्निर्यथा हि पाके स्यात्

    साक्षान्मुक्तेस्तथा मतम्।

    विना ज्ञानं न सिध्यति

    साक्षान्मुक्तिः कदाचन॥

    – गीताव्रत

    आपल्याला अत्यंत साधे पण तितकेच मार्मिक उदाहरण देऊन साधना एक मोठा सिद्धांत समजावून सांगते.

    स्वयंपाकघरात जेव्हा आपण अन्न शिजवण्यासाठी जातो, तेव्हा आपल्याला अनेक गोष्टींची गरज असते. पाणी हवे असते, तांदूळ हवे असतात, भांडे हवे असते आणि मसालेही हवे असतात. पण या सर्व गोष्टी असल्या आणि प्रत्यक्ष कारण असलेला अग्नीच नसेल, तर ते अन्न कधी शिजेल का? अग्नीशिवाय अन्न शिजणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही. अगदी त्याचप्रमाणे जीवनात मुक्ती मिळवण्यासाठी अनेक साधनांची आवश्यकता असू शकते, पण साक्षात आणि मुख्य कारण केवळ ज्ञानच आहे. मनुष्य आयुष्यभर अनेक गोष्टी करतो. तो भरपूर दानधर्म करतो, कडक उपवास करतो, अनेक प्रकारची व्रतवैकल्ये करतो किंवा केवळ पूजाअर्चा करत राहतो. या सर्व गोष्टींमुळे त्याचे अंतःकरण कदाचित शुद्ध होईल, पण मुक्ती कधीच मिळणार नाही.

    ज्ञानाशिवाय मुक्ती कधीच प्राप्त होऊ शकत नाही, कारण मानवाचे मूळ बंधन हे अज्ञानामुळे आहे. आपण जेव्हा अंधारात दोरीचा साप पाहतो, तेव्हा तो घालवण्यासाठी लाठीकाठी आणून किंवा मंत्र म्हणून काहीही उपयोग होत नाही. तिथे केवळ प्रकाशाचीच व्यवस्था आधी करणे आवश्यक असते. निर्माण झालेल्या प्रश्नावर निश्चित उत्तर आहे. भीती संपण्यासाठी आणि तो प्रश्न सुटण्यासाठी, तो साप नसून दोरी आहे याच ज्ञानाची गरज असते. दुसरे कुठले ज्ञान असून फायदा नाही.

    अध्यात्म मार्गावर चालत असताना, ज्या उद्दिष्टापर्यंत जायचे आहे, त्या उद्दिष्टाचा अंतिम ज्ञानापर्यंतचा प्रवास आपल्याला थोडा आधी समजला पाहिजे. ज्ञानाचा प्रकाश पडला की, अज्ञानाचा साप आपोआप नाहीसा होतो. विश्वास वाढतो!

    अभ्यासात् शुद्धते देही

    ज्ञानं व्याप्नोति च स्वतः।

    कतकरेणुवत् सर्वं

    मलं प्रक्षाल्य लीयते॥

    – गीताव्रत

    अज्ञानाने आणि विषयवासनांनी कलुषित झालेल्या या देहस्थ आत्म्याला शुद्ध करण्यासाठी सतत अभ्यासाची आणि चिंतनाची नितांत गरज असते. अभ्यास म्हणजे काय, तर पुन्हा पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाचे चिंतन करणे आणि मन बाह्य विषयांपासून आत वळवणे.

    शंकराचार्यांनी निर्मळीच्या ‘बी’चे अतिशय सुंदर आणि वैज्ञानिक उदाहरण दिले आहे. पूर्वीच्या काळी पाणी शुद्ध करण्यासाठी निर्मळीची बी वापरली जात असे. अत्यंत गढूळ पाण्यात जर निर्मळीच्या बीचे चूर्ण टाकले, तर ते चूर्ण पाण्यातील सर्व कचरा आणि माती हळूहळू खाली तळाला बसवते आणि पाणी पूर्णपणे स्वच्छ करते. यात सर्वात विशेष गोष्ट ही आहे की,  पाणी स्वच्छ केल्यानंतर निर्मळीचे चूर्ण स्वतः देखील त्या पाण्यात पूर्णपणे विरून जायचे. निर्मळीचे बी पाणी शुद्ध करण्याचे कारण आणि ते कार्य संपल्यानंतर स्वतःचे वेगळे अस्तित्व ते बी शिल्लक ठेवत नाही. अगदी त्याचप्रमाणे ज्ञानाचा सतत केलेला अभ्यास अंतःकरणातील सर्व अज्ञान आणि मलिनता घालवतो. आणि जेव्हा आत्मज्ञान पूर्णत्वाला पोहोचते तेव्हा शेवटी तो अभ्यासाचा प्रयत्नही तिथे विरून जातो आणि मागे उरते ते फक्त आपले शुद्ध चैतन्यमय स्वरूप. तिथे मग करणारा आणि करवून घेणारा, असा कोणताही भेद उरत नाही.

    संसारः स्वप्नतुल्यो हि

    रागद्वेषादिसंकुलः।

    अज्ञाने सत्यवद्भाति

    ज्ञाने सत्यं न किञ्चन॥

    – गीताव्रत

    आपण आजूबाजूला जे जग पाहतो, ते अनेक प्रकारची आसक्ती आणि द्वेषाने पूर्णपणे ठासून भरलेले आहे. ज्यांच्या विश्वासावर आपण मान सोपवावी, ते आपली मान कापून घेऊन जातात. आपल्या आसपास चोर, भ्रष्ट, व्यसनी, शिवराळ, क्रूर, हिंसक, स्वार्थी, लबाड अशाच माणसांचा भरणा थोडा जास्त प्रमाणावर झाला आहे. पण हे मोठ्या स्वप्नासारखे आहे. जेव्हा आपण रात्री गाढ झोपेत एखादे स्वप्न पाहत असतो, तेव्हा त्या क्षणी ते स्वप्न आपल्याला पूर्णपणे सत्य आणि खरेच वाटत असते. स्वप्नात जर आपल्या मागे एखादा वाघ लागला तर, आपल्याला खरोखरच घाम फुटतो, आपली धडधड वाढते. स्वप्नात लागलेली तहान आपल्याला खऱ्या पाण्यानेच भागेल, असे त्यावेळी ठामपणे वाटत असते. स्वप्नामध्ये आपण पाणी प्राशन देखील करतो, पण तहान भागत नाही. त्या पाण्याने तहान भागत नाही, तहान लागल्यामुळे आपली झोप उडते आणि आपण जागे होतो आणि मग पाणी पितो… मग तहान भागते. जाग आल्यानंतर ते पूर्ण स्वप्न एका क्षणात मिथ्या ठरते. जाग आल्यानंतरच तहान भागते. जाग आली, त्यामुळे खऱ्या पाण्याची आवश्यकता भासू लागते.

    तो वाघ, ती भीती, ते दुःख सगळे काही खोटे होते, हे आपल्याला जागे झाल्यावर कळते. पण कोणत्या भीतीमुळे तो वाघ स्वप्नात आला, ते काही लवकर कळत नाही. जोपर्यंत मनुष्य अज्ञानाच्या निद्रेत गाढ झोपलेला आहे, तोपर्यंत त्याला हा राग, द्वेष, लाभ, हानी, मानापमान यांनी भरलेला संसार पूर्णपणे खरा वाटतो. तो त्यासाठी रडतो, भांडतो आणि आयुष्यभर संघर्ष करतो. पण अध्यात्म आणि साधनेच्या बळावर ज्ञानाचा प्रखर सूर्य उगवतो आणि सत्याची आंतरीक अनुभूती येते, तसे हे जग त्याचे सत्यत्व पूर्णपणे गमावून बसते. मग माणसाला आतून लख्ख प्रकाश पडल्यासारखे कळते की, “आपण आजवर ज्या गोष्टींसाठी रडलो, भांडलो आणि दुःखी झालो, त्या सर्व गोष्टी केवळ आभासी होत्या. जागे झालेल्या माणसाला जसे स्वप्नातील वाघाचे भय वाटत नाही, तसे ज्ञानी माणसाला संसाराचे भय उरत नाही.” जाग आल्यामुळेच आपल्याला खरे पाणी मिळते. जाग आल्यामुळे खरोखरी तहान भागते.

    हेही वाचा – आत्म्याचा खरा साक्षात्कार

    काष्ठद्वयस्य घर्षेण

    वह्निर्यद्वत् प्रजायते।

    ध्यानेन ज्ञानज्वाला हि

    दहत्यज्ञानमिन्धनम्॥

    – गीताव्रत

    दोन लाकडे जेव्हा आपण एकमेकांवर जोराने घासतो तेव्हा त्यातून अचानक अग्नी निर्माण होतो. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की, आपण तो अग्नी कुठे बाहेरून तिथे आणला का, नक्कीच नाही! तो अग्नी त्या लाकडातच आधीपासून सुप्तावस्थेत दडलेला होता. आपल्याकडून केवळ घर्षणाची प्रक्रिया उत्तम रीतीने झाल्यावर तो प्रकट झाला. अगदी तसेच खरे ज्ञान आपल्या सर्वांच्या आतच दडलेले आहे. ते कोणीही बाहेरून देण्याची आवश्यकता नसते. अगदी गुरूने देखील नाही. ज्ञानप्राप्तीसाठी आपल्याला कुठूनही बाहेरून काहीही आणायचे नाही. पण ते ज्ञान प्रकट करण्यासाठी आणि अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी ध्यानाचे घर्षण अत्यंत आवश्यक आहे. सततचे आणि एकाग्रतेने केलेले ध्यान, हीच ती घर्षणाची प्रक्रिया आहे, जी आत दडलेली ज्ञानाची ज्वाला प्रज्वलित करते. ही ज्ञानाची ज्वाला एकदा का प्रकट झाली की, ती काय करते, तर ती आधी आपल्या अज्ञानरूपी इंधनाला पूर्णपणे जाळून टाकते. लाकूड जळून गेल्यावर जसा फक्त अग्नी शिल्लक राहतो. तसा त्याला काही आकार नसतो किंवा रूप नसते तसे अज्ञान संपले की, फक्त शुद्ध आणि प्रकाशमान चैतन्य उरते. हे ध्यान म्हणजे आपल्या सत्य स्वरूपाच्या विचारात निरंतर मग्न राहणे होय.  उठता-बसता, चालता-बोलता ‘मी देह नसून एक अविनाशी आत्मा आहे,’ हे चिंतन मनात चालत राहणे म्हणजेच खरी साधना आणि ध्यान होय.

    ।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

    क्रमश:
    Avatar photo
    डॉ. शिरीष कुलकर्णी

    डॉ. शिरीष कुलकर्णी M.J. M.B.A.B.A. GDC&A., P.HD.... सहकार प्रशिक्षण केंद्रावर प्राचार्य म्हणून पाच वर्ष सेवा. कथा, कादंबरी, कविता, गझल, आध्यात्मिक चिंतन अशा विविध विषयावर 51 पुस्तके लिहिलेली आहे. कर्णधार हे व्यवस्थापनावरील पुस्तक, चौथा स्तंभ हे पत्रकारितेतील अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले पुस्तक, यासोबत संतसम्राज्ञी, संत सत्संग, विश्वाराधन, सजल, गीताव्रत साधना - 3 भाग प्रसिद्ध, हिंदोळा, अमात्र, नामसाधना, नासदीय, ईशोवास्य, कबीराऽ रे, संपादकीय, माया, ब्रह्मजिज्ञासा, Editorials, luminous thoughts हे इंग्रजी संपादकीय लेखा़चे पुस्तक, किंचितरेषा, साधनारंभ, खराखुरा कर्मयोग, संत मीराबाईंच्या जीवनावर सखोल अभ्यास करून लिहिलेली संत मीराबाईंवरील पहिलीच कादंबरी 'संतसम्राज्ञी'. या कादंबरीचे हिंदी, इंग्रजीतून अनुवादही झालेले आहेत. स्वर्गोपनिषद, वीणा आणि वाणी, गीताव्रत साधना ही पुस्तके विशेष उल्लेखनीय ठरली. संशोधन हा त्यांच्या साहित्यनिर्मितीचा मुख्य आत्मा आहे. सजल या गझल संग्रहास अरुण दाते यांनी प्रस्तावना दिली. बायबल, कुराण आणि भगवद्गीता यावर अभ्यासपूर्ण लेखमाला आणि पुस्तके प्रकाशित झाली. ‘मुस्लिम धर्म आणि अहिंसा’, ‘संत कबीर’, ‘येशू ख्रिस्त आणि अहिंसा’, ‘रूमी आणि अद्वैत सिद्धांत’ या विषयावर लेखन आणि व्याख्याने. 2016नंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेऊन साहित्यिक आणि अध्यात्मिक संशोधनासाठी पूर्ण आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय. महाराष्ट्र पत्रकार संघाचे, मुख्य राज्य संघटक म्हणून सलग पंधरा वर्षं सेवा. चित्रपट कथा-पटकथा, संवाद आणि गीतलेखन. काही चित्रपटासाठी त्यांची गाणी रवींद्र साठे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, अभिजीत कोसंबी, वैशाली चितळे, यांनी गायलेली आहेत. 14 चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका. ब्रह्मचैतन्यसाठी कथा-पटकथा आणि संवाद लेखन. कथालेखन, कादंबरी लेखन, कविता लेखनाच्या 40पेक्षा जास्त विनामूल्य कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून वीस वर्षं अविरोध सेवारत. लायन्स क्लब योगा आणि मेडिटेशन टेरिटरी चीफ म्हणून सेवा. दोन मंदिरे, अनाथ आश्रम, शाळा, ग्रंथालये, टेक्सटाइल मिलची उभारणी निरपेक्ष भावनेने विनामूल्य केली. लोकव्रत प्रकाशनाचे मानद सचिव म्हणून वीस वर्षे विनामूल्य सेवा. त्या माध्यमातून आजवर हजारो पुस्तके प्रसिद्ध केली. आजवर 1600हून अधिक मुखपृष्ठे तयार केली आहेत. 1500पेक्षा जास्त संपादकीय लेख आणि वृत्तपत्रासाठी तितकेच लेख लिहिलेले आहेत. अनेक वृत्तपत्रांतून स्तंभ लेखन केलेले आहे. स्त्री मुक्ती, समस्या निवारण केंद्र आणि कामगार चळवळीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण, भाऊ फाटक आणि सर्वोदय चळवळीचा प्रदीर्घ सहवास. भारतातील पहिल्या शासकीय पोलीस ठाण्यातील समस्या निवारण केंद्राचा सेक्रेटरी म्हणून सलग पंधरा वर्षे सेवा. अनेक साहित्य संमेलने, आणि ग्रामीण साहित्य संमेलनाची संकल्पना मांडून ती साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पाडली. स्त्रीभ्रूण हत्या, नकूसा नामबदल चळवळ, स्वयंसहायता बचत गट चळवळ यासाठी पाचशेहून अधिक बचत गट स्थापनेच्या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन आणि व्याख्याने. पन्नासहून अधिक सामाजिक आणि साहित्यिक पुरस्कार. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, दिल्ली यांच्या शुभहस्ते आणि पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या उपस्थितीत 'अक्षर वाड्.मय' पुरस्कार. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहीत. त्यांच्या सजल या पेजला 75 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : जैसा रंकु भ्रमला, म्हणे जा रे मी रावो आला

    October 2, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : हालविलिया जाये, निश्चळीं तरी होये

    October 1, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : अर्जुना तयापरी, सरली द्वैताची वारी 

    September 30, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : जैसा रंकु भ्रमला, म्हणे जा रे मी रावो आला

    By Team AvaantarOctober 2, 2026

    अध्याय चौदावा आतां अज्ञानासारिखें । वस्तु आपणपेंचि देखे । परी रूपें अनेकें । नेणों कोणें…

    सार्थ ज्ञानेश्वरी : हालविलिया जाये, निश्चळीं तरी होये

    October 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अर्जुना तयापरी, सरली द्वैताची वारी 

    September 30, 2026

    केतू… आपला आतला आवाज

    September 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माधवच्या मनात शंकेची पाल चुकचुकली…

    October 2, 2026

    सासूबाईंनी उमाला माहेरी जाण्यापासून थांबवलं…

    October 2, 2026

    विदर्भातील ‘हाडपक्या’ (मस्कऱ्या) गणपतीचा 239 वर्षांचा इतिहास!

    October 2, 2026

    नवमांश आणि विवाह

    October 2, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : जैसा रंकु भ्रमला, म्हणे जा रे मी रावो आला

    October 2, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 02 ऑक्टोबर 2026

    October 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 457
    • अवांतर 215
    • आरोग्य 153
    • पंचांग आणि भविष्य 609
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 965
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माधवच्या मनात शंकेची पाल चुकचुकली…

    October 2, 2026

    सासूबाईंनी उमाला माहेरी जाण्यापासून थांबवलं…

    October 2, 2026

    विदर्भातील ‘हाडपक्या’ (मस्कऱ्या) गणपतीचा 239 वर्षांचा इतिहास!

    October 2, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.