Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 सप्टेंबर 2026

    September 30, 2026

    नकारातून साकार

    September 29, 2026

    गोष्ट दोन प्रवाशांची…

    September 29, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, September 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » गोष्ट दोन प्रवाशांची…
    ललित

    गोष्ट दोन प्रवाशांची…

    किरण कृष्णा बोरकरBy किरण कृष्णा बोरकरSeptember 29, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखन, किरण कृष्णा बोरकर, लेखक किरण कृष्णा बोरकर, लेखक किरण बोरकर, सहनशीलता, अन्नाचे महत्त्व, वस्तूंचे महत्त्व, नागरिक अधिकार, अन्नाची नासाडी, सैनिकांची शिस्त, सैनिकांची तडजोड, सर्वसामान्यांची बेपर्वाई
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दोघेही एकाच बोगीतून प्रवास करीत होते. पहिला शांत बसून एकटक बाहेरील दृश्य पाहत होता… तर दुसरा सतत काहीतरी हालचाल करीत होता. अखेर दुसऱ्याने मौन तोडले…

    “शी… किती गरम होतेय. बोगीतील एसी काहीच कामाचा नाही. थोडा वाढवावा लागेल…” असे बोलून पहिल्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरचे शांत भाव हाच ‘होकार’ समजून त्याने अटेंडन्टला एसी वाढविण्यास सांगितले.

    “खरोखर, या भारतात राहायचे म्हणजे एक शिक्षाच आहे. सरकारला भरमसाठ कर द्यायचा, पण त्याबदल्यात काही मिळत नाही.”

    पहिला नुसता हसला. इतक्यात अटेंडन्ट परत जेवणाची ऑर्डर घ्यायला आला. दुसऱ्याने “मेन्यू काय?” असे विचारले. मेन्यू ऐकताच तोंड वाकडे केले. नाईलाज झाल्यासारखे ‘नॉन-व्हेज’ची ऑर्डर दिली. पहिल्याने मात्र काही न विचारता ‘व्हेज’ सांगितले.

    “यांना धड जेवणही ठेवता येत नाही चांगले…” थोड्या वेळाने जेवण आले. दुसऱ्याची जेवणाबरोबर बडबडही चालू होती. कंटाळून दुसऱ्याने अर्धे अन्न टाकून दिले. पहिला मात्र ताटात एकही कण न ठेवता जेवला. दुसऱ्याची बिसलरी पाण्याची ऑफर नाकारत स्वतःच्या बाटलीतील पाणी प्यायला.

    रात्री झोपताना दुसऱ्याने बेडवरील चादर बदलायला लावली… ब्लॅंकेट बदलून घेतले. पहिला मात्र तसाच बेडवर पसरला.

    “आपण कुठे निघालात?” दुसऱ्याने पहिल्याला प्रश्न केला.

    “घरी…” पहिल्याने मोजकेच शब्द उच्चारले.

    “मी एक उद्योजक आहे… भारतातील प्रमुख ठिकाणी माझी ऑफिसेस आहेत. त्यामुळे सतत प्रवास करत असतो. पण कर भरूनही सरकार आम्हाला पुरेसा लाभ देत नाही म्हणून चिडतो. तुम्ही काय करता?”  दुसऱ्याने विचारले.

    हेही वाचा – वधू-वर सूचक मंडळ

    “मी भारतीय सैन्यदलात एक सैनिक आहे,” पहिला अजूनही शांत होता.

    “अरे वा, सैनिक! फारच छान… खूप अभिमानाची गोष्ट आहे ही. देशाच्या रक्षणासाठी चोवीस तास डोळ्यांत तेल घालून शत्रूवर लक्ष ठेवून असता…” दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता…

    “पण एक विचारू?  खूपच सहनशील आणि अबोल वाटता तुम्ही. इथे जे काही चालते त्याविषयी काहीच बोलला नाहीत?”

    “काय बोलायचे?” पहिल्याने शांतपणे विचारले…

    “या एसीबद्दल बोलू. राजस्थानमधील वाळवंटात 46℃ मध्ये हातात एके 47 घेऊन दोन-दोन दिवस उभा राहिलोय मी… यापेक्षा भीषण गर्मी तुम्ही अनुभवली आहे का?   मी नुकताच सियाचीनमधून येतोय. तीन महिने सीमेच्या रक्षणासाठी होतो तिथे. उणे 15℃ वातावरण होते. चहूकडे बर्फच बर्फ. हरवून जाऊ नये म्हणून एकमेकांच्या कमरेला दोरी बांधून होतो. समुद्रसपाटीपासून दहा हजार फूट बर्फात उभे होतो. कसली करमणूक नाही. हवाबंद डब्यातील अन्न पुरवून पुरवून खायचे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब करावा लागायचा. खाली आलो तेव्हा वजन घटले होते. तिथे सर्व कामे आम्हालाच करावी लागायची. त्या तीन महिन्यांत आम्हाला प्रत्येक गोष्टीचे महत्व कळले. आता इथे आल्यावर कळते, तुम्ही किती सुखी आहात. तुम्हाला अन्नाची पर्वा नाही… तुम्हाला पाहिजे तसे वातावरण हवे… पाहिजे ते कपडे हवे… तुम्ही फार भाग्यवान आहात. कारण तुम्ही कर भरता, त्यामुळे मागण्याचा तुम्हाला अधिकार आहे.”

    “नाही हो, तसे नाही… .माफ करा… पण इथे ती परिस्थिती नाही ना! आणि जे शक्य आहे ते मागण्याचा अधिकार नक्कीच आहे आम्हाला. आम्ही खूप तुमचा आदर करतो…” दुसरा ओशाळवाणे हसत म्हणाला.

    हेही वाचा – टिपिकल

    “नाही हो, मी तुम्हाला मुळीच दोष देत नाही. मला ज्या गोष्टीची सवय झालीय, त्यातच मी राहतो… तुम्हीही तसेच राहता… पण दरवेळी या देशात काहीच होणार नाही, असे बोलू नका… तुम्हीही अप्रत्यक्षरीत्या हातभार लावू शकता. उदाहरणार्थ, हे जे अन्न तुम्ही फेकून दिलेत, त्या अन्नात अजून एक जण जेवला असता. खूपजणांची मेहनत त्या मागे आहे. तुम्हाला तर नेहमी गरम अन्न मिळते, पण आमचे अन्न आधी विमानातून, मग गाडीतून, मग घोड्यावरून, नंतर काहीजणांच्या पाठीवरून आमच्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे त्याचा वापर योग्यरितीने करावा लागतो…” पहिला हसत हसत म्हणाला.

    “माफ करा सर, यापुढे वागताना, बोलताना योग्यती काळजी घेईन मी…” दुसऱ्याने पहिल्याला नमस्कार करून डोक्यावरील दिवा बंद केला.

    Avatar photo
    किरण कृष्णा बोरकर

    किरण कृष्णा बोरकर - मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदविका. विविध विषयांवरील पुस्तकांचे समीक्षण समाजमाध्यमांवर प्रकाशित. विश्वविक्रमी काव्यवाचन सोहळ्याचे आयोजन. आदिवासी मुलांसाठी वाचनालय स्थापना. समाजाने आपल्याला खूप काही दिलंय आता समाजाला काहीतरी दिलं पाहिजे या हेतूने कॉलेजमधील मित्रांसोबत "स्टार्ट गिव्हिंग फाऊंडेशन"ची स्थापना. मुंबईतील रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी मित्रांसोबत "ज्ञानसेवा फाऊंडेशन" सुरुवात केली. पूरग्रस्त, दरड कोसळणे आणि इतर नैसर्गिक आपत्तीवेळी मदतीचा हात. ‘गोष्टी तुमच्या आमच्या’ पुस्तकास 'साहित्यसंपदा पुस्तक रत्न' पुरस्कार. कोकण साहित्य मराठी परिषद, कल्याण यांच्यातर्फे 'उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार'. स्टार्ट गिव्हिंग फाऊंडेशनच्या कार्याबद्दल ‘अष्टगंध पुरस्कार’. साहित्यिक सहभागाबद्दल कोकणदीप मासिक यांचा ‘कोकणदीप प्रेरणा पुरस्कार’. मोबाईल नं : 9969277054 / ईमेल: k.borkar1@gmail.com

    Related Posts

    नकारातून साकार

    September 29, 2026 ललित

    तो भेटलाच नसता तर…

    September 29, 2026 ललित

    गणेशोत्सव अन् बालपणीच्या आठवणी

    September 28, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    नकारातून साकार

    By दिलीप कजगांवकरSeptember 29, 2026

    राजने आई-बाबांना शिवाजीनगर बसस्थानकावर लाल परीमध्ये बसवलं आणि तो घरी परतला. घरी येताना त्याच्या मनात…

    तो भेटलाच नसता तर…

    September 29, 2026

    गणेशोत्सव अन् बालपणीच्या आठवणी

    September 28, 2026

    मॅग्नोलिया

    September 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 सप्टेंबर 2026

    September 30, 2026

    नकारातून साकार

    September 29, 2026

    गोष्ट दोन प्रवाशांची…

    September 29, 2026

    तो भेटलाच नसता तर…

    September 29, 2026

    केतू… आपला आतला आवाज

    September 29, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अनादि जे मुक्तता, आपुली असे पंडुसुता

    September 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 453
    • अवांतर 214
    • आरोग्य 152
    • पंचांग आणि भविष्य 605
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 958
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 सप्टेंबर 2026

    September 30, 2026

    नकारातून साकार

    September 29, 2026

    गोष्ट दोन प्रवाशांची…

    September 29, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.